Author: maharashtrabreakingnews.com

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या ग्रंथालयात पुस्तकं भेट पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त वीज कर्मचारी अभियंता सेनेचे प्रादेशिक सल्लागार संतोष सौंदणकर यांच्या पुढाकारातून पुण्यातील रास्ता पेठ मुख्य कार्यालयातील महावितरणच्या ग्रंथालयासाठी पुस्तके भेट देण्यात आले. यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार व औद्योगिक संबंध अधिकारी पुणे शिरीष काटकर, वीज कर्मचारी अभियंता सेनेचे प्रादेशिक अध्यक्ष मनोहर शिंदे व सुरज भराटे उपस्थित होते. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक पटलावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा पडलेला प्रभाव अतुलनीय आहे. असंख्य लोकांच्या हृदयात त्याच्या पाउल खुणा दडलेल्या आहेत. त्या खुणा कुठलीही शक्ती मिटवू शकत नाही. त्यांचे विचार नेटाने आणखी…

Read More

पुणे ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणेचे स्कूल ऑफ बायोइंजिनियरिंग सायन्स अँड रिसर्चतर्फे नुकतीच बायोइंजिनियरिंगमधील अलीकडील ट्रेंड्स (ICRTB2024) या विषयावर ७वी आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न झाली. या परिषदेच्या निमित्ताने जागतिक तज्ञ, संशोधक आणि विद्वान मंडळी बायोइंजिनियरिंगमधील नवीनतम प्रगती जाणून घेण्यासाठी एकत्र आले होते. या परिषदेत बायोसेन्सर्स, जैव-प्रेरित साहित्य, बायोमेडिकल इमेजिंग, वैद्यकीय रोबोटिक्स, क्लिनिकल डायग्नोस्टिक्ससाठी बायोमटेरियल्स, पर्यावरण निरीक्षण, नॅनोमटेरिअल्स, ड्रग डिलिव्हरी सिस्टम, बायोमटेरिअल्स, जैव खते आणि जैव कीटकनाशके, बायोरिमेडिएशन, वैद्यकीय आणि परिधान करण्यायोग्य उपकरणे यासह विविध थीम्सचा समावेश करण्यात आला होता. आयआयएसईआर पुणेचे संचालक प्रा. सुनील भागवत, प्रा. जेरेमी सिम्पसन, यूसीडी कॉलेज, डब्लिन आयर्लंड, डॉ. कर्स्टन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी येथील डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या वतीने आयोजित ‘शहाण्णव कवितांच्या संग्रहाचा* प्रकाशन सोहळा’ साहित्यिक, कवी व मान्यवरांच्या उपस्थितीत आज उत्साहात संपन्न झाला.  या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पी डी पाटील  (कुलपती- डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ, पुणे , कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रदीप दाते कार्याध्यक्ष ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन) तसेच  कवितासंग्रहाचे प्रकाशन डॉ. सदानंद मोरे (अध्यक्ष ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन), डॉ. श्रीपाल सबनीस (अध्यक्ष ८९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन), लक्ष्मीकांत देशमुख (९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन),राजन लाखे (कवी कट्टा प्रमुख ९६ वे अखिल भारतीय…

Read More

‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ शब्दधन काव्यमंचाचा उपक्रम पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “समाज आणि शासनाने विचारवंत, कलावंत आणि साहित्यिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे!” अशी अपेक्षा प्रा. डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी शांतिबन गृहरचना संस्था, चिंचवड येथे व्यक्त केली. शब्दधन काव्यमंच आयोजित ‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ या उपक्रमांतर्गत प्रा. डॉ. राजेंद्र कांकरिया आणि त्यांच्या सुविद्य पत्नी छाया कांकरिया या साहित्यिक दांपत्याचा ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार शिवाजीराव शिर्के यांच्या हस्ते हृद्य सन्मान करण्यात आला. शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक, उपाध्यक्ष सुभाष चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यिकांची याप्रसंगी उपस्थिती होती. प्रा. डॉ. राजेंद्र कांकरिया आपली साहित्यिक वाटचाल कथन करताना पुढे…

Read More

लोणावळा, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – समाजाचे खूप प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी ही एकजूट कायम ठेवा शेवटच्या माणसाला आरक्षण भेटेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी रोखठोक भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. दरम्यान महाराष्ट्र शासनाने चर्चेसाठी कोणाला पाठवण्याऐवजी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी चर्चा करायला यावे. मुंबईला जाण्यापूर्वी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा. आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत असे सांगितले. जरांगे पाटील यांच्या वाकसई चाळ येथील सभेला लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते. नजर जाईल तिथपर्यंत मराठाच मराठा समाज दिसत होता. तीन वाजता सकल मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघाल्याने राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाकसई चाळ येथे मनोज जरांगे पाटील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभू श्री राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठापना सोहळा निमित्त कॅप्रिसिओ सोसायटी येथे उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. यामध्ये मंगल आरती, प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण, महाप्रसाद असे आयोजन करण्यात आलेले होते. यादरम्यान सर्व सोसायटी सभासदांनी एकत्र येत कलश यात्रा देखील काढलेली होती. भगवा रंगाची थीम यावेळेस ठेवण्यात आलेली होती. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविलेला पाहायला मिळाला. या सोहळ्याचे आयोजन सोसायटी मधील ज्येष्ठ सभासद, श्री.रावलजी, सोनीजी, सोसायटी अध्यक्ष- प्रज्वलजी, अण्णा आहेरेजी, आनंदजी, संदीपजी, इंडीवरजी, गौरव राजपूत यांनी केलेले होते.

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- मराठा आरक्षणासाठी भगवे वादळ घेऊन लाखो लोकांसह मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांचे अजित गव्हाणे मित्र परिवाराच्या वतीने चिंचवड स्टेशन परिसरात जंगी स्वागत करण्यात आले. पुण्याहून पिंपरी चिंचवडकडे निघालेल्या मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. चिंचवड स्टेशन येथे पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी पोहोचलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे अजित गव्हाणे मित्र परिवाराच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. बॉम्बे सिलेक्शन शेजारी उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर काही वेळ जरांगे पाटील थांबले होते. यावेळी क्रेनच्या सहाय्याने जरांगे पाटलांना तब्बल 25 फुटी हार घालण्यात आला. यावेळी अजित गव्हाणे मित्र परिवाराकडून मोर्च्यात सहभागी बांधवांना 10 हजार पाणी बॉटल तसेच…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ तालुक्यात विकास कामांचा सपाटा सुरूच ठेवला आहे. अंदर मावळमधील डोंगरवाडी ते धनगर पठार अति दुर्गम भागातील नागरिकांसाठी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, विविध विकास कामांचे लोकार्पण खासदार बारणे यांच्या हस्ते झाले. मावळमधील अनेक गावांमध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच रस्ते झाल्याने नागरिकांनी खासदार बारणे यांचे आभार मानले. खासदार बारणे यांनी अंदर मावळ भागातील गावांचा दौरा करत विविध विकास कामाचे भूमिपूजन, लोकार्पण केले. तहसिलदार विक्रम देशमुख, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, टाटा पावरचे फुलसुंदर साहेब, मनोहर म्हात्रे, सुनिल मोरे, सरपंच छाया हेमाडे उपस्थित होते. तसेच वेहरगांव दहिवली,मळवली,वाकसई देवघर व लोणावळा शहरातील तुंर्गाली भागातील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांची सुरू असलेली पदयात्रा बुधवारी रात्री दहा वाजता पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाली. या पदयात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. फुलांची उधळण करत एक मराठा, लाख मराठा, एकच मिशन मराठा आरक्षण या घाेषणेने परिसर दुमदुमून गेला. दुपारी बारा वाजता नियोजित असलेली पदयात्रा रात्री दहा वाजता शहरात दाखल होऊनही लोकांमधील उत्साह कायम होता. दरम्यान, पदयात्रेमुळे सकाळपासून शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला होता. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. लोणावळ्याच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांना जेवण देण्यात आले. भक्ती-शक्ती येथील छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पुतळ्याला जरांगे यांनी अभिवादन केले. चौकात मराठा बांधवांनी मोठी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी ॲड.संदीप चिंचवडे यांची निवड करण्यात आली.त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार अण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले.

Read More