Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»हम सब जरांगे आणि आरक्षण आमच्या हक्काचे अशा घोषणांनाचा नारा पिंपरी चिंचवडमध्ये बुधवारी रात्री घुमला
ताज्या घडामोडी

हम सब जरांगे आणि आरक्षण आमच्या हक्काचे अशा घोषणांनाचा नारा पिंपरी चिंचवडमध्ये बुधवारी रात्री घुमला

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com25 January 2024Updated:25 January 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांची सुरू असलेली पदयात्रा बुधवारी रात्री दहा वाजता पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाली. या पदयात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. फुलांची उधळण करत एक मराठा, लाख मराठा, एकच मिशन मराठा आरक्षण या घाेषणेने परिसर दुमदुमून गेला. दुपारी बारा वाजता नियोजित असलेली पदयात्रा रात्री दहा वाजता शहरात दाखल होऊनही लोकांमधील उत्साह कायम होता. दरम्यान, पदयात्रेमुळे सकाळपासून शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला होता. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. लोणावळ्याच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांना जेवण देण्यात आले. भक्ती-शक्ती येथील छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पुतळ्याला जरांगे यांनी अभिवादन केले. चौकात मराठा बांधवांनी मोठी गर्दी केली होती. पदयात्रा जगताप डेअरी, डांगे चौक, चापेकर चौक, चिंचवड स्टेशन, खंडोबामाळ चौक, टिळक चौक भक्ती-शक्ती, देहूरोड, तळेगावदाभाडे मार्गे मध्यरात्री लोणावळ्याकडे रवाना झाली.

रात्री दहाच्या सुमारास लाखाेंचा संख्येने जरांगे-पाटील यांचे शहराच्या हद्दीत पिंपळेनिलख येथील रक्षक चाैकात आगमन झाले. जरांगे यांचे ठिकठिकाणी जेसीबी, क्रेनच्या सहाय्याने पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. मुस्लिम बांधवांनीही जरांगे यांचे स्वागत केले. लाखाे आंदाेलक त्यांच्या समवेत पदयात्रेत सहभागी झाले आहेत.

पुणे शहरातूनच पदयात्रेला बाहेर पडण्यासाठी रात्रीचे साडे नऊ वाजले. जरांगे-पाटील पुणे शहरात असतानाच नागरिक पिंपरी-चिंचवड मधील पदयात्रेच्या मार्गावर दाखल झाले हाेते. यात्रेतील नागरिकांचे स्वागत करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी मराठा बांधव, राजकीय पदाधिकाऱ्यांनी स्वागत कमानी, फलक उभारले हाेते. पदयात्रा जाण्याच्या मार्गाच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ध्वनीवर्धक उभारले होते. सायंकाळनंतर गर्दीत भर पडली. नागरिक भगव्या टोप्या परिधान करून, भगवे उपरणे गळ्यात घालून रस्त्यावर उतरले. रस्त्यावर गर्दी उसळली होती. जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या दोन्ही बाजूला आंदाेलकांसाठी विविध संस्थांच्या वतीने जेवण, नाष्टा, पाणी, राहण्याची साेय करण्यात आली.

महिला, युवकांची संख्या लक्षणीय

जरांगे-पाटील यांच्या आंदाेलनाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे. या आंदाेलनात प्रामुख्याने युवक, युवतींसह महिलांची संख्या लक्षणीय दिसून येत हाेती. पदयात्रेला पाठिंबा देण्यासाठी महिला, युवती रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर थांबल्या होत्या. पाठिंबा दर्शविण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील मराठा बांधव दुचाकी, पायी लाेणावळ्याकडे मार्गस्थ होताना दिसले.

पाेलिसांचा कडक बंदाेबस्त

मराठा आंदाेलक शहरात लाखाेंच्या संख्येने दाखल झाले. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पाेलीस आयुक्तालयाच्या वतीने तगडा बंदाेबस्त तैनात करण्यात आला हाेता. एक अतिरिक्त पोलीस आयुक्त, सहा उपायुक्त, १२ सहायक आयुक्त, ६० पाेलीस निरीक्षक, १०० सहायक निरीक्षक असे एक हजार २०० पाेलीस कर्मचारी तैनात करण्यात आले हाेते मराठा आरक्षणाचा लढा आता अंतिम टप्प्यात आला आहे. आता नाही तर कधीच नाही.. लढेंगे जितेंगे.. हम सब जरांगे आणि आरक्षण आमच्या हक्काचे..! अशा उस्फुर्त घोषणा देत सकल मराठा समाजाची पदयात्रा मुंबईकडे मार्गस्थ झाली आहे. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वात 20 जानेवारीला अंतरवाली सराटीतून निघालेला ही पदयात्रा बुधवारी लोणावळ्यात मुक्कामी आहे. या ठिकाणी जरांगे-पाटलांची तोफ धडाडणार असून ते काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष असणार आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी ॲड.संदीप चिंचवडे यांची निवड
Next Article मावळमध्ये विकास कामांचा धडाका, खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते साडे एकविस कोटींच्या कामाचे भूमिपूजन
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक  शत्रुघ्न (बापु) काटे,नगरसेविका  अनिता…

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.