- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने केजी टू पीएचडी अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक जडणघडण होत असताना त्यांचा शारीरिक व मानसिक विकास देखील उत्कृष्ट व्हावा यासाठी पीसीईटीच्या सर्व शाखांमध्ये उच्च दर्जाच्या पायाभूत क्रीडा सुविधा उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे कुस्ती स्पर्धेचे यजमानपद पिंपरी चिंचवड तंत्रनिकेतन विद्यालयाला मिळणे कौतुकास्पद आहे असे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे म्हणाले. इंटर इंजिनियरींग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्टस् असोसिएशन च्या वतीने आयोजित डी-१ झोनल कुस्ती स्पर्धेचे यजमानपद पिंपरी चिंचवड पाॅलीटेक्निकने भुषविले. भोसरी येथील पै. मारुतीराव लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्र येथे आयोजित केलेल्या या स्पर्धांचे उद्घाटन पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “पिंपरी-चिंचवड महापालिकेचा महापौर भाजपचाच असेल,” असा ठाम विश्वास भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केला होता आणि अखेर तो प्रत्यक्षात उतरला आहे. भाजपकडून महापौरपदासाठी रवि लांडगे तर उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचा महापौर निश्चित झाला आहे. तसेच, शर्मिला बाबर यांचाही निवड निश्चित मानली जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर पदासाठी रवी लांडगे आणि उपमहापौर पदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी भाजपाचे नेते आमदार महेश लांडगे, चिंचवडचे आमदार शंकर जगताप, सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, अमित गोरखे, युवा मोर्चा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) च्या वतीने महाराष्ट्र राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थिकलश दर्शनाचा कार्यक्रम आज मंगळवार, दि. 03 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम पिंपरी येथील मुंबई-पुणे महामार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक प्रांगणात सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत होणार असून, नागरिकांसाठी अस्थिकलश दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला आजी-माजी खासदार, आमदार, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत. अस्थिकलश दर्शनानंतर अजितदादा पवार यांच्या अस्थींचे देहू येथील इंद्रायणी नदीत विधीवत विसर्जन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरासाठी भाजपच्या वतीने महापौरपदासाठी रवी लांडगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महापौर म्हणून रवी लांडगे यांच्या माध्यमातून महापालिकेच्या सभागृहातून शहरासाठी सर्वंकष विकासाचे निर्णय होतील आणि शहराच्या प्रगतीची घोडदौड कायम राखली जाईल असा विश्वास निवडणूक प्रचार प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी सोमवारी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर पदासाठी रवी लांडगे आणि उपमहापौर पदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे, भोसरीचे आमदार महेश लांडगे, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, अमित गोरखे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे,…
महापौरपदी रवि लांडगे निश्चित, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचा अर्ज पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने महापौर आणि उपमहापौर पदासाठी आपली उमेदवारी अधिकृतपणे दाखल केल्याने शहराच्या राजकारणात भाजपची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. महापौरपदासाठी बिनविरोध नगरसेवक रवि लांडगे यांचा अर्ज दाखल करण्यात आला असून, उपमहापौरपदासाठी नगरसेविका शर्मिला बाबर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजपकडे महापालिकेत स्पष्ट बहुमत असल्याने रवि लांडगे यांची महापौरपदी निवड निश्चित मानली जात आहे. यावेळी आमदार महेश लांडगे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करत सांगितले की, पिंपरी-चिंचवड शहराच्या शाश्वत विकासासाठी गावकी-भावकीतील मतभेद दूर करून सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीत निर्माण झालेले…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराच्या शाश्वत विकासाचा संकल्प घेवून आम्ही काम करीत आहोत. महापालिका निवडणुकीपूर्वी गावकी-भावकीतील मतभेद दूर करुन एकोप्याने शहराच्या विकासात योगदान देण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. विधानसभा निवडणुकीत झालेले मतभेद बाजूला ठेवून आम्ही महापालिका निवडणुकीत एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी भूमिका भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली. पिंपरी- चिंचवड महानगरपालिका महापौरपदासाठी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडून बिनविरोध नगरसेवक रवि लांडगे यांचा अर्ज भरण्यात आला. त्यानंतर उपमहापौरपदासाठी नगरसेविका शर्मिला बाबर यांचा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे, चिंचवडचे आमदार शंकर जगताप, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून रवी लांडगे आणि उपमहापौरपदासाठी शीतल शिंदे यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या दोघांचे नाव निश्चित केले आहे. आज (सोमवारी) दोघेही उमेदवारी अर्ज दाखल केला करणार आहेत. भाजपची एकहाती सत्ता असल्याने दोन्ही उमेदवारांची निवड निश्चित मानली जात असून शुक्रवारी (६ फेब्रुवारी) अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होईल. पिंपरी-चिंचवड महापालिकेत दुसऱ्यांदा भाजपची एकहाती सत्ता आली आहे. भाजपचे ८४ नगरसेवक निवडून आले आहेत. महापाैर पदाचे आरक्षण खुल्या (सर्वसाधारण) प्रवर्गासाठी राखीव झाल्याने भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी होती. महापौर, उपमहापौरपदासाठी सोमवारी ( २ फेब्रुवारी) दुपारी तीन ते पाच ही अर्ज दाखल करण्याची मुदत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्र सरकारने सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प देश, राज्य तसेच पिंपरी-चिंचवड शहराच्या आर्थिक विकासाला गती देणारा असल्याचे मत शिवसेना पिंपरी-चिंचवड जिल्हा संघटक संतोष सौदणकर यांनी व्यक्त केले आहे. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, रोजगारनिर्मिती तसेच मध्यमवर्गीय व कामगार घटकांसाठी दिलेल्या तरतुदी महत्त्वपूर्ण असून त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणार आहे. विशेषतः शहरांच्या विकासासाठी करण्यात आलेल्या तरतुदींमुळे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत रस्ते, वाहतूक, आरोग्य व नागरी सुविधा अधिक सक्षम होतील, असे त्यांनी नमूद केले. उद्योग, एमएसएमई, स्टार्टअप्स आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या तरतुदींमुळे आर्थिक चक्र अधिक गतिमान होईल. महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि दुर्बल घटकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या योजनांमुळे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्रीय अर्थमंत्री यांनी आज लोकसभेत सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 चे भारतीय मजदूर संघाने (BMS) सखोल व चिकित्सक परीक्षण केले असून, हा अर्थसंकल्प आर्थिक वाढीचा दावा करणारा असला तरी देशातील कोट्यवधी कामगारांच्या मूलभूत प्रश्नांकडे पूर्णतः दुर्लक्ष करणारा असल्याची ठाम भूमिका संघटनेने मांडली आहे. पहिल्यांदाच रविवारी सादर झालेल्या या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास व कौशल्य प्रशिक्षणावर भर देण्यात आला असला, तरी उपजीविका, वेतन, नोकरीची हमी व सामाजिक सुरक्षा या अत्यावश्यक मुद्द्यांवर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अँड. अनिल ढुमणे यांनी केला आहे. कंटेनर उत्पादन, मेगा टेक्सटाईल पार्क, क्रीडा साहित्य निर्मिती,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेकडून शहरातील स्वच्छता व्यवस्थापन अधिक बळकट करण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. या मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने व्यापक जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत. त्याच अनुषंगाने नागरिकांनी घरगुती कचरा चार प्रकारांत विलगीकरण करूनच कचरा संकलनासाठी येणाऱ्या घंटागाडीला द्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल व सहायक आयुक्त अमित पंडित यांच्या अधिपत्याखाली शहरातील सर्व प्रभागांमध्ये ही जनजागृती मोहीम वेगाने राबवली जात आहे. या मोहिमेत घराघरांत संपर्क, फलक, पत्रके, समाजमाध्यमांद्वारे संदेश, तसेच स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने…
