- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे डॉ.विश्वास यांचा सन्मान पुणे ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रख्यात कवी डॉ. कुमार विश्वास यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली. डॉ. कुमार विश्वास यांच्यासोबत ‘अपने अपने राम’ या त्यांच्या प्रसिद्ध कार्यक्रमातील कलाकार देखील उपस्थित होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने यांनी डॉ. कुमार विश्वास यांचे स्वागत केले. यावेळी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. सन्मानचिन्ह देऊन डॉ. विश्वास यांचा गौरव करण्यात आला. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण व रामलल्ला प्राणप्रतिष्ठा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मनोज जरांगे पाटील व महाराष्ट्र सरकार यांच्यात मराठा आरक्षण प्रश्नी कोणताही तोडगा निघाला नाही.त्या मुळे ठरल्या प्रमाणे मनोज जरांगे पाटील शनिवार दि.20 रोजी आपल्या लाखों मराठा बांधवांसह आंतरवाली सराटी येथून आंदोलनासाठी मुंबई कडे यायला निघाले आहेत.मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण 26 जानेवारी पासून मुंबईत सुरू होत आहे.मुंबई ला जाण्यासाठी मनोज जरांगे पाटील व लाखो आंदोलक येत्या बुधवारी दि.24 रोजी औंध मार्गे सांगवी फाटा येथे शहरात दाखल होत आहेत.तेथून पुढे जगताप डेअरी,काळेवाडी फाटा,डांगे चौक मार्गे चाफेकर चौक,चिंचवड स्टेशन येथे येणार आहेत.तेथून पुढे चिंचवड स्टेशन,आकुर्डी,निगडी,भक्ती शक्ती समुह शिल्प मार्गे आंदोलक लोणावळा येथे मुक्कामासाठी जाणार आहेत. सदर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आकुर्डी येथील निवासी भागातील धोकादायक भंगार मालाचे दुकान कायम स्वरूपी बंद करावे, अशी मागणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निखिल दळवी यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे. आकुर्डी प्रभाग क्रमांक १४ मुख्य रस्त्यावर सिद्धेश्वर क्लासिक बिल्डिंग समोर व कचिन टेलर शेजारी एक भंगार व्यावसायिकाचे दुकान आहे .या भंगार दुकानात काल (दि.१९) रात्री साडेसात वाजता स्फोट होऊन मोठी आग लागली . त्यानंतर किमान चार स्फोट झाले . या आगीमध्ये चार कामगार किंवा नागरिक भाजूंन जखमी झाले . वस्तुत: या भंगार शेजारी कचिन टेलर , सिएरा झेरोक्स , शेजारी समर्थ कॉम्लेक्स , मागे बंड़ेवार बिल्डिंग , गिराम…
– चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन; संस्कृती प्रतिष्ठान, शि. प्र. मंडळीतर्फे ‘अपने अपने राम’ रामकथेचे आयोजन पुणे ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “अखंड हिंदुस्थानातील रामभक्तांचे ५२७ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले स्वप्न पूर्ण होत असून, येत्या सोमवारी (दि. २२) जगातील सर्वात मोठा दीपोत्सव साजरा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत प्रभू श्रीराम विराजमान होतील. या दीपोत्सवात पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन विश्वविक्रमी कार्यक्रमाचे आयोजन करावे,” असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. त्यांच्या या आवाहनाला पुणेकरांनी आपल्या मोबाईलच्या टॉर्च ऑन करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे (शि. प्र.) आयोजित डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ…
– प्रखर हिंदूत्त्ववादी आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार – दि. २१ जानेवारी रोजी भक्ती-शक्ती चौक येथून प्रस्थान पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राम जन्मभूमी अयोध्येतील श्रीराम मंदिर राष्ट्रार्पण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य ‘रथयात्रा’ आयोजित केली आहे, अशी माहिती भाजपाचे प्रखर हिंदूत्ववादी आमदार महेश लांडगे यांनी दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. २२ जानेवारी २०२४ रोजी राम जन्मभूमी अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचे राष्ट्रार्पण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी देशभरामध्ये उत्सवाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. पिंपरी-चिंचवडमध्येसुद्धा राम मंदिर आणि श्रींच्या आगमनाचा उत्सव दिमाखदार होणार असून, रविवारी, दि. २१ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३ वाजता ‘रथयात्रा’…
पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी देशातील सर्व मंदिर परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवावे असे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या आवाहानाला प्रतिसाद देत मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (शनिवारी) चिंचवड येथील श्रीमान महासाधू मोरया गोसावी मंदिरात स्वच्छता मोहिम राबविली. मंदिर परिसर स्वच्छ धुवून काढला. आमदार उमा खापरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र देव, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, नारायण लांडगे या मोहिमेत सहभागी झाले होते. अयोध्येमध्ये २२ जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीतील सर्व मंदिरांची सफाई करून मंदिराना विद्युत रोषणाई केली जाणार आहे. मंदिरे विद्युत रोषणाईने…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील कलाश्री नृत्यशाळा,चिंचवडमधील स्थानिक कलाश्री नृत्यशाळा संस्थेच्या असावरी मधुकर बच्चे,व तन्वी राजू कोरे या मुलींनी चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिर परिसरात अयोध्येतील श्रीरामाला भरत नाट्यम सादर करून वंदन केले. याबाबत त्यांचे पालक मधुकर बच्चे व राजू कोरे यांनी सांगितले की,आमच्या मुलींनी अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहोळ्या निमित्त प्रभू श्रीरामाला वंदन करायचे आहे,त्यांची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही या दोघींना मोरया गोसावी मंदिर परिसरात दृक्श्राव माध्यमातून नृत्य सादर करा,आपण लहान वयात अयोध्येला तुम्हा दोघीना घेऊन जाऊ शकत नाही. त्यांनी अनोख्या पद्धतीने मोरया गोसावी मंदिरात राम वंदना सादर केली.या मुलींनी 100 व्या पिंपरी चिंचवड येथील…
पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा, श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान, यांच्या सहकार्याने १९९८ पासून कै. राम गणेश गडकरी करंडक स्पर्धेचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात येते. यंदा स्पर्धेच्या या रौप्यमहोत्सवी टप्प्यावर, कोहिनूर ग्रुपच्या सहकार्याने नाट्यपरंपरा जपण्याचा वसा राखत यंदा ही स्पर्धा ‘कोहिनूर करंडक’ या नावाने होत असून स्पर्धेत महाराष्ट्रासह, गोवा आणि बेळगाव येथील एकांकिकांचा समावेश असणार आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी उद्या (शनिवार, दि. 20) पासून सुरू होत असल्याची माहिती अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी गुरुवारी दिली. स्पर्धे विषयी माहिती देताना…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीराम जन्मभुमी मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळा आयोजित केला आहे, हा ऐतिहासिक सोहळा नागरिकांना पाहता यावा याचे साक्षीदार होता यावे त्या निमित्त रहाटणी पिंपळे सौदागर येथे नाना काटे सोशल फाऊंडेशन, उमेश काटे युथ फाऊंडेशन , सागर कोकणे युवा मंचचा वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दि २२/०१/२०२४ रोजी महादेव मंदिर पिंपळे सौदागर, श्री राम मंदिर रहाटणी येथे करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आज रहाटणी येथील श्री राम मंदीर येथे मंदीर व परिसराची सामुदायिक पध्दतीने स्वच्छता करण्यात आली तसेच यानंतर प्रभु श्री रामाची आरती देखील श्री विठ्ठल उर्फ नाना काटे व इतर उपस्थित मान्यवराचा यांच्या हस्ते करण्यात आली सोमवारी…
– गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या योजनेला गती पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने ‘प्रधानमंत्री आवास’ योजनेंतर्गत पिंपरी आणि आकुर्डी येथे उभारलेल्या प्रकल्पांतील लाभार्थी निश्चित करण्यासाठी उद्या शनिवार, दि. २० जानेवारी रोजी सोडत (लॉटरी) काढण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी यशस्वी पाठपुरावा केला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंर्गत पिंपरी आणि आकुर्डी येथे उभारलेल्या प्रकल्पातील एकूण ९३८ घरांसाठी अर्ज केलेल्या लाभार्थींना राज्य सरकारकडून ‘दिवाळी गिफ्ट’ मिळाले आहे. आरक्षण प्रयोजनामध्ये बदल करण्याच्या प्रस्तावाला राज्याच्या नगरविकास विभागाने मान्यता दिली असून, आता सोडतीचा (लकी ड्रॉ) मार्ग मोकळा झाला आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी यासाठी यशस्वी पाठपुरावा केला…
