ताज्या घडामोडीपिंपरी
आकुर्डीत विठ्ठल प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिरात १७५ जणांचा सहभाग

आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आकुर्डीतील विठ्ठल प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिविर घेण्यात आले. शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यात १७५ जणांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठान अध्यक्ष निखिल दळवी यांनी केले. यावेळी माजी आमदार गौतम चाबुकस्वार, संघटक उद्घाटन संजोग वाघेरे पाटील,माजी आमदार शहर प्रमुख सचिन भोसले, अनिता तुतारे,चेतन पवार, वैशाली मराठे, तुषार नवले, अमोल निकम, गोपाळ मोरे, वैभवी घोडके, कामिनी मिश्रा, समन्वयक प्रसाद शेट्टी, सविता वायकर, माजी नगरसेविका अजित शितोळे, महेश काटे, अजय लड्ढा, शहादाफ खान उपस्थित होते. अभिनव वायकर, अभिजीत सोनके, राहुल कांबळे,
ऋषिकेश घोरपडे, आकाश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.














