Author: maharashtrabreakingnews.com

रोबोटिक सायन्स मध्ये विद्यार्थ्यांचा वाढता कल – डेव्हिड प्रकाश पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भारतातील युवा पिढी अत्यंत हुशार आणि जिज्ञासू आहे. त्यांना तंत्रज्ञान आत्मसात करून त्यामध्ये संशोधन व विकास करण्याची आवड असते. त्यामुळे रोबोटिक सायन्स मध्ये शिक्षण घेऊन नवनवीन प्रयोग, संशोधन करण्यावर विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. अशा मुलांमधील संशोधन वृत्ती वाढीस लागली पाहिजे या उद्देशाने भारतीय रोबोकप ज्युनिअर फाऊंडेशन कार्यरत आहे असे प्रतिपादन भारतीय रोबोकप ज्युनिअर फाऊंडेशनचे चेअरमन डेव्हिड प्रकाश यांनी केले.     पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मध्ये इंडियन रोबोकप ज्युनिअर फाउंडेशनच्या सहकार्याने ‘इंडियन रोबोकप ज्युनिअर चॅम्पियनशिप – २४’ दोन…

Read More

पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- कोरोना महामारीनंतर दुपारच्या वेळेत बंद झालेली पुणे-लोणावळा लोकल अखेर बुधवारपासून पुन्हा धावण्यास सुरुवात झाली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिल्लीतून हिरवा झेंडा दाखविला. लोकल सुरू झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त करत खासदार बारणे यांचे आभार मानले. लोणावळा रेल्वे स्थानक येथे उद्घाटन सोहळा झाला. राज्यमंत्री दानवे आणि खासदार बारणे दिल्लीतून सहभागी झाले होते.  मंडल रेल प्रबंधक इंदू दुबे यांच्यासह रेल्वेचे अधिकारी स्थानकावर उपस्थित होते. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, कोरोना साथीच्या कालावधीत रेल्वेची सेवाच बंद करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर टप्प्या-टप्प्याने रेल्वे सुरू केल्या. पुणे-लोणावळा…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिरो मोटो कॉप कंपनीच्या सामाजिक बांधिलकीतून क्रेझ इंग्लिश मीडियम स्कूल कोल्हेवाडी खडकवासला पुणे येथे 500 शालेय विद्यार्थ्यांना मोफत हेल्मेट वाटप हिरो मोटोकॉप कंपनीच्या सामाजिक बांधिलकीतून करण्यात आले या उपक्रमात इंडियन हेड इंजुरी फाउंडेशन नवी दिल्ली व सेफ इंडिया ओरिसा या संस्थेचा आयोजनामध्ये महत्त्वाचा वाटा होता महाराष्ट्र राज्यातील 5000 हेल्मेट वाटपाची महत्त्वाची जवाबदारी मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी यशस्वीरित्या पार पडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे संचालक सागर कोल्हे यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रूपाली चाकणकर अध्यक्ष राज्य महिला आयोग व प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांनी भूषवले, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अनिल वळीव रस्ता…

Read More

वाल्हे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आवडते मज मनापासुनी शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाहीत हे सत्य आहे. याच पार्श्वभूमीवर वाल्हे येथील रयत शिक्षण संस्थेचे महर्षी वाल्मिकी विद्यालयात 1974 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा सुवर्ण महोत्सवी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  माजी आयुक्त हनुमंत पवार, निवृत्त शिक्षक एस.आर.माने, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, सरपंच अतुल गायकवाड, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य प्रमोद शहा, विष्णू चौधरी, गिरीश पवार, महर्षी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जळीतग्रस्तांवर उपचारासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने थेरगाव येथे बांधलेल्या रुग्णालयातील एक मजला कायम स्वरुपी करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत यापूर्वीच मंजूर कऱण्यात आला आहे. आता अशाही परिस्थितीत पुन्हा नव्याने याच विषयावर काथ्याकूट सुरू झाला आहे तो प्रथम बंद करा आणि जिथे करण्याचे ठरले आहे तिथेच तो बर्न वार्ड तातडिने करा, अशी आग्रही मागणी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी केली आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना त्याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी दिले. आग लागून निष्पाप लोकांचा त्यात मृत्यू झाल्याच्या तीन मोठ्या दुर्घटना गेल्या सहा महिन्यांत या शहरात घडल्या. तळवडे येथील अवैध कारखान्यातील आगीत १४ महिलांचा होरपळून…

Read More

 पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- लोणावळा ते पुणे दरम्यान धावणाऱ्या लोकलचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आज (बुधवारी) उद्घाटन होणार आहे. लोणावळा रेल्वे स्थानक येथे दुपारी अडीच वाजता उद्घाटन होणार आहे. दानवे ऑनलाइन हिरवा झेंडा दाखविणार आहेत. मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे देखील ऑनलाइन उपस्थित असणार आहेत. याबाबतची माहिती मंडल रेल प्रबंधक इंदू दुबे यांनी दिली. कोरोना साथ सुरु होण्यापूर्वी पुणे-लोणावळा दरम्यान लोकल गाड्यांचे संचालन व्यवस्थित सुरु होते. कोरोना साथीच्या कालावधीत रेल्वेची सेवाच बंद करण्यात आली. कोरोनानंतर आता देशात पूर्वीप्रमाणे सर्व रेल्वे सुरु झाल्या आहेत. कोरोना साथीच्या अगोदर पुणे-लोणावळा दरम्यान सकाळी साडे अकरा ते दुपारी अडीच वाजताच्या कालावधीत…

Read More

चिंचवड  ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भोसरी येथील क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटरमध्ये क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया पुणे शाखेच्या वतीने कायझेन स्पर्धा 2024 यामध्ये 58 कंपन्यांतील 469 स्पर्धकांनी सहभाग घेतला. एकूण 194 नामांकन प्राप्त झाले. या स्पर्धेचे उद्घाटन एव्हीपी फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्सचे जितेंद्र राणा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी लर्निंग अ‍ॅण्ड ट्रेनिंग विभागाचे प्रमुख पी.एम. साजीकुमार, क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश काळोखे, कौन्सिल सदस्य अनंत क्षीरसागर, विजया रूमाले उपस्थित होते. समारोप सत्रात प्रमुख पाहुणे कमिन्स इंडिया लिमिटेड (कोथरूड) प्लांट मॅनेजर राजेंद्र कुलकर्णी, प्रिमियम ट्रान्समिशन प्रा.लि.चे कार्पोरेट क्वॉलिटी अ‍ॅण्ड इएचएस प्रमुख अजय कुमार यांचा क्वॉलिटी सर्कल फोरम…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) माहिती तंत्रज्ञान विभाग आणि आयईईई (IEEE) पुणे सेक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि.२) एक दिवसीय ब्लॉकचेन विषयी तज्ञ मार्गदर्शकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी नऊ वाजता या कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. यात सहभागी होण्यासाठी ऑनलाइन गुगल फॉर्म द्वारे विद्यार्थी,  शिक्षक नावनोंदणी करू शकतात. ब्लॉकचेन संदर्भातील नवीन संकल्पना, ब्लॉकचेन क्षेत्रात सध्या कार्यरत असणाऱ्या इंडस्ट्री मधील तज्ज्ञांशी संवाद साधणे त्याचप्रमाणे, प्रत्यक्ष ब्लॉकचेन क्षेत्रात काम करत असताना अनुभवांचे आदान-प्रदान, मार्गदर्शन या परिषदेत होईल अशी माहिती समन्वयक, माहिती तंत्रज्ञान पीसीसीओई विभागप्रमुख आणि आयईईई (IEEE) पुणे सेक्शन ब्लॉक…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे गुरव येथील द रायझिंग स्टार एज्युकेशन या इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन निळू फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी छोट्या मुलांनी विविध कलाविष्कार सादर करीत उपस्थित सर्वांची मने जिंकली. या स्नेहसंमेलनासाठी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या सर्वांनीच लहानपण देगा देवा.. याची अनुभूती घेतली. डॉ. विवेक मुगळीकर (एसीपी) प्रकल्प अधिकारी डॉ. प्रेम हनवटे, उपनिबंधक सुमीत थोरात, सत्यशोधक फिल्मचे लेखक – दिग्दर्शक प्रवीण तायडे, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण घरडे, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, गुणवंत कामगार सुभाष चव्हाण, पर्यावरणतज्ज्ञ तानाजी एकोंडे, ह. भ. प. अशोकमहाराज गोरे, मुंबई येथील सेंट्रल रेल्वे हेडक्वार्टरचे पर्सनल ऑफिसर…

Read More

राज्यात लोकसभेच्या ४५ हून अधिक जागा जिंकण्यासाठी भाजपाची जोरदार तयारी पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  गेल्या १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा सरकारने गरीब कल्याण, महिला सक्षमीकरण, अंतर्गत सुरक्षा, सांस्कृतिक उन्नती आणि जगामध्ये भारताचा गौरव वाढविण्यासह विकासाच्या सर्व आयामांवर अतुलनीय कार्य केले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची विकासाची दृष्टी गरीबांच्या कल्याणाकडे घेऊन आणि सरकारने केलेली विकासकामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या निर्देशानुसार “गाव चलो अभियान” सुरू करण्यात आले आहे. या अभियानातंर्गत देशभरातील ७ लाख बूथवर कार्यकर्ते २४ तास कार्यरत राहणार आहेत. या अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बळ देण्यासाठी येत्या ४ ते ११ फेब्रुवारीदरम्यान पिंपरी चिंचवड शहरामध्ये “गाव चलो अभियान” बूथ पातळीवर सुरुवात करण्यात येत आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष…

Read More