ताज्या घडामोडीपिंपरी

शहरातील सरकारी कार्यालयाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सेफ्टी ऑडिट करा – सूरज बाबर

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे” औचित्य साधून पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील सरकारी कार्यालयाचे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सेफ्टी ऑडिट करण्याबाबत. प्रत्येक शासकीय कार्यालयाबाहेर सेफ्टी व फायर ऑडिट झाल्याचे प्रमाणपत्र लावण्यात यावे अशी मागणी  कृषी, पर्यावरण, शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटना अध्यक्ष सूरज बाबर यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी ४ ते ११ मार्च हा “राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह” पाळला जातो. औद्योगिक, रस्ता, ऊर्जा, पर्यावरण या सर्वच क्षेत्रांत सुरक्षा बाळगणे व त्या संदर्भात समाजामध्ये जनजागृती करणे आवश्यक झाले आहे.

आज पासून “राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह “चालू होत असून या कालावधीमध्ये वरील म्हटल्याप्रमाणे औद्योगिक, पर्यावरण बाबतीत ऊर्जा असेल व वाहतूक असेल याबाबतीत जनजागृती शासनामार्फत करण्यात यावी शक्य असेल तिथे प्रात्यक्षित (मॉकड्रिल) घ्यावे जेणेकरून नागरिकांमध्ये याची जनजागृती होऊन कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास कशाप्रकारे परिस्थिती हाताळावी याची माहिती नागरिकांना असेल व कोणतीही अनुचित प्रकार/ दुर्घटना घडणार नाही व यामुळे नागरिकांची तसेच स्थावर मालमत्तेची हानी होणार नाही.

पिंपरी-चिंचवड शहर व पुणे शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जाते या औद्योगिक नगरीमध्ये बहुतांश प्रमाणात सरकारी कार्यालयात आहेत व या कार्यालयांमध्ये नागरिकांची वर्दळ खूप मोठ्या प्रमाणात असते. आपण आज जर पाहिले तर मंत्रालयासारख्या कार्यालयाला आग लागण्याचे प्रकार घडले आहेत व असे जर प्रकार घडले तर वित्तहानी, डॉक्युमेंटेशन नष्ट होणे तसेच त्याबरोबर जीवित होण्याचाही प्रकार होऊ शकतो म्हणून आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची व पुणे महानगरपालिकेची सर्व क्षेत्रीय कार्यालय, एमआयडीसी कार्यालय, एलआयसी कार्यालय, वाय सी एम हॉस्पिटल, पोलीस कार्यालय, पीएफ ऑफिस, महावितरणचे कार्यालय, विविध विमा कार्यालय, पासपोर्ट ऑफिस, शहरातील बसस्थानके, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय, रेशनिंग ऑफिस, सहकारी संस्थांचे ऑफिसेस, साखर संकुल, न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय ,विभागीय आयुक्त कार्यालय, ससून ,वायसीएम, औंध यासारखी मोठमोठाली हॉस्पिटल्स, रेल्वे कार्यालय,पिंपरी चिंचवड व पुणे शहरातील सर्व शाळा व कॉलेजेस, आज आपण जर पाहिले तर काही कार्यालयांना दुसरे एक्झीटस नाही आग लागल्यास अधिकारी किंवा नागरिक दुसऱ्या मार्गाने कसे जाणार याचाही प्रश्न उद्भवतो, काही ठिकाणी आग लागल्यास फायर एक्सटींग्विषर बसवले गेले नाहीत, फायर फायटिंग सिस्टीम योग्य चालते की नाही, वेळोवेळी चेक केली गेली आहे की नाही याची खातरजमा करणे गरजेचे आहे, त्याच बरोबर कार्यालयामध्ये आग लागल्यास सिलिंगला स्प्रिंकल व्यवस्था आहे की नाही हे पण पाहणे गरजेचे आहे, वेळोवेळी मॉकड्रील घेणे गरजेचे आहे, आज आपण जर पाहिले तर हे सर्व फक्त कागदोपत्री करतात की काय असा प्रश्न संभवतो .

वरील सर्व कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांबरोबरच नागरिकांची वर्दळ असते व प्रत्येकाच्या आज जीवनाशी निगडित प्रश्न असल्याकारणाने याचे वेळेच्या वेळेवर सेफ्टी ऑडिट व संकटकाळी बचाव प्रशिक्षण होणे गरजेचे आहे.

पुणे जिल्ह्यातील वरील सर्व कार्यालयांची तसेच इतरही कार्यालयांची वेळेच्या वेळेवर सेफ्टी व फायर ऑडिट करून घेणे जेणेकरून अधिकारी वर्ग व नागरिक सुरक्षित राहतील, असे निवेदनात म्हटले आहे .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button