- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
सर्व जप्त मालमत्तांचे लिलाव होणार! गत वर्षीच्या वसुलीचा टप्पा ओलांडला पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने जप्त केलेल्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी लिलावासाठी काढलेल्या मालमत्तांची यादी वर्तमान पत्रात प्रसिद्ध केली आहे. सील केलेल्या सर्व मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यामुळे मालमत्ता धारकांनी त्वरित थकीत कर भरून जप्तीची कारवाई टाळावी असे आवाहन कर संकलन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच कर संकलन विभागाने गतवर्षीच्या उत्पन्नाचा आताच टप्पा ओलांडला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात 6 लाख 15 हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. सर्वेक्षणातही नोंदणी नसलेल्या मालमत्ताही मोठ्या संख्येने आढळून येत आहेत.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक महिला दिनानिमित्त दुर्गा ब्रिगेड संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे दुर्गाशक्ती पुरस्कार समारोह साजरा करण्यात आला. यावेळी सुप्रिया बडवे संचालिका बेलराईज इंडस्ट्रीजच्या, हिंदवी पाटील लावणी सम्राज्ञी. डॉ सत्वशीला शिरोळे संचालिका फिटवेल गॅसकेंट प्रायव्हेट लिमिटेड, यांना इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर ,आमदार उमा खापरे, उपायुक्त अजय चारठणकर , अभिनेते विनायक भावे दुर्गा ब्रिगेड संघटनेचे अध्यक्षा दुर्गा भोर यांच्या हस्ते देण्यात आला . तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा या ठिकाणी सन्मान करण्यात तसेच यावेळी महिला दिनानिमित्त लकी ड्रॉ द्वारे उपस्थित भाग्यवान विजेत्या महिलांना दहा पैठण्या देण्यात आला. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आमदार उमा खापरे, उपआयुक्त…
‘एमआयटी एडीटी’च्या कर्तृत्ववान महिला पुरस्कारांचे वितरण पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महिला आता कुठल्याही क्षेत्रात मागास राहिलेल्या नाहीत. मुली आज शिकत आहेत, प्रत्येक क्षेत्रात आपला वेगळा असा ठसा उमठवत आहेत. असे असले तरीही अनेक तालुक्यात मुलींची संख्या अद्यापही कमी आहे. तसेच कामाच्या ठिकाणी आजही महिलांना दुजाभावाचा सामना करावा लागतो. त्यात एक महिला सहजासहजी दुसऱ्या महिलेचे कौतुक करत नाही. त्यामुळे आज मी सर्वांना सांगेल की, महिलांनो एकमेकींचे भरभरून कौतुक करा, असे आवाहन महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापती डाॅ.निलम गोऱ्हे यांनी केले. त्या एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्याचा आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रम व त्यानिमित्त आयोजित कर्तृत्ववान महिला पुरस्कारांचे वितरण समारंभात बोलत होत्या. याप्रसंगी, मुंबई आयकर आयुक्त डाॅ.पल्लवी दराडे, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या…
पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – असंघटित क्षेत्रातील कामगारांना केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून संरक्षण दिले जात आहे. बांधकाम कामगार बांधवांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्य सरकारने अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. या योजनांमधून कामगारांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक तसेच आरोग्यविषयी लाभ दिले जात असून, आर्थिकदृष्टया समृध्द होण्यासाठी मोदी सरकारच्या योजनांचा लाभ घ्या, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले. बांधकाम कामगार श्रमिक सेना यांच्या मार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने मिळणाऱ्या संसारी भांड्यांचे वाटप पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी उपस्थित बांधकाम…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) सामाजिक न्याय महिला विभागाच्या वतीने मध्यवर्ती पक्ष कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे “जागतिक महिला दिन” निमित्त शहराध्यक्ष अजित दामोदर गव्हाणे व महिला अध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांच्या मार्गदर्शनात सामाजिक न्याय महिला विभागाच्या वतीने कर्तुत्ववान महिलांचा गौरव करून महिला दिन साजरा करण्यात आला. पुनम अनंत अंभिरे यांनी अत्यंत गरिब परिस्थितीतून मेहनतीने मुलीचे शिक्षण पूर्ण करून तिला परभणी जिल्हा आरोग्य अधिकारी पदापर्यंत पोहचवून एक आदर्श माता म्हणून काम केले आहे. गवळण रोहिदास कांबळे यांनी आपल्या मुलाचे अत्यंत गरिब व हालाकीच्या परिस्थितीतून वकीलीचे शिक्षण पूर्ण करून त्यास सक्षम केले, त्याबद्दल एक आदर्श…
पीसीईटीच्या एस. बी. पाटील आर्किटेक्चर कॉलेज मध्ये माईंड गेम्स स्पर्धा संपन्न पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच मैदानी खेळाला ही महत्त्व दिले पाहिजे. त्यामुळे शारीरिक, मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत होते, असे प्रतिपादन पीसीसीओईचे उपसंचालक डॉ. नीलकंठ चोपडे यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिजाईन येथे माईंड गेम्स इनडोअर स्पोर्ट्स स्पर्धांच्या उद्घाटन डॉ. चोपडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम व स्पॉट स्केचिंग आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिजाईनचे प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे, प्राध्यापक व…
पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी-चिंचवड युवा सेनाच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्त सामाजिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. साफसफाईचे काम करणाऱ्या 200 महिलांना साड्या वाटप केले. थेरगाव येथे झालेल्या कार्यक्रमाला सरिता श्रीरंग बारणे , युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव विश्वजित बारणे, शिवसेनेच्या महिला शहर संघटीका सरिता साने,युवतीसेना शहर संघटीका रितू कांबळे, आयोजिक सायली साळवी, रंजना साळवी, अर्चना गुरव, इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात जवळपास 300 महिलांची उपस्थिती होती. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या महिलांबरोबरच कष्टकरी महिला, सफाई कर्मचारी महिलांना साड्या देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. कविता सतीश गुख, डॉ. ऋतुजा मयूर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘झाडे लावा, झाडे जगवा,’ या संदेशाची प्रभावी अंमलबजावणी करून पर्यावरणा संदर्भात भरीव कार्य केल्याबद्दल मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार यांचा गौरव करण्यात आला. माईर्स एमआयटी येथे आयोजित ग्रीन महाराष्ट्र परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत वृक्षमित्र अरुण पवार यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी निवृत्त विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, निवृत्त सचिव किरण कुरुंदकर, एमआयटी’चे कार्यकारी संचालक राहुल कराड, उद्योजक शिवशंकर लातुरे, मिलिंद पाटील, उद्योजक प्रशांत इथापे, योगेश भोसले, नितीन असालकर, रोहित सरोज, संतोष शिंग,नितीन चिलवंत आदी उपस्थित होते. परिषदेमध्ये अरुण पवार करत असलेल्या वृक्षारोपण, वृक्ष संगोपन या कार्याची दखल घेत कौतुक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमख आदित्य ठाकरे यांनी पिंपरी-चिंचवड विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पद, नाव व कंसात कार्यक्षेत्र पुढीलप्रमाणे : विधानसभा युवा अधिकारी – विशाल नाचपल्ले (चिंचवड विधानसभा), शुभम महादेव मुळे (पिंपरी विधानसभा ). शहर समन्वयक : उमेश डोके (पिंपरी-चिंचवड शहर). उपशहर युवा अधिकारी : मयूर प्रभाकर पवार (पिंपरी-चिंचवड शहर), रोहन कैलास वाघेरे (पिंपरी-चिंचवड शहर), निखिल उमाकांत दळवी (पिंपरी -चिंचवड शहर), भाऊसाहेब श्रीराम जाधव (पिंपरी-चिंचवड शहर), सुमित रमेश निकाळजे (पिंपरी-चिंचवड शहर), तुषार अशोक भुजबळ (पिंपरी-चिंचवड शहर), संदीप बबन लोंढे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर येथील कुंदन इस्टेट या सोसायटीमध्ये नवीन सौर पॅनल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. या नूतन सौर पॅनल यंत्रनेचे उदघाटन नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी हे सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल सोसायटी चेअरमन श्री ऋषी पाटील व त्यांचे सहकारी मित्रांचे अभिनंदन केले. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले की, “भविष्यात ऊर्जेचे पर्याय शोधणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठी सौर ऊर्जा हा अतिशय चांगला पर्याय आहे. घराच्या छतावर जर सोलर पॅनेल बसवले तर वीजबिलाच्या खर्चापासून सुट्टी मिळू शकते. विशेष म्हणजे तुम्ही स्वतःच्या खर्चाने आणि सरकारच्या…
