सौरऊर्जा वापर म्हणजे बचतीचा समृद्धी महामार्ग – शत्रुघ्न काटे
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर येथील कुंदन इस्टेट या सोसायटीमध्ये नवीन सौर पॅनल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.
या नूतन सौर पॅनल यंत्रनेचे उदघाटन नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी हे सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल सोसायटी चेअरमन श्री ऋषी पाटील व त्यांचे सहकारी मित्रांचे अभिनंदन केले.
यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले की, “भविष्यात ऊर्जेचे पर्याय शोधणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठी सौर ऊर्जा हा अतिशय चांगला पर्याय आहे. घराच्या छतावर जर सोलर पॅनेल बसवले तर वीजबिलाच्या खर्चापासून सुट्टी मिळू शकते. विशेष म्हणजे तुम्ही स्वतःच्या खर्चाने आणि सरकारच्या सबसिडीच्या मदतीने सोलर पॅनेल घराच्या छतावर लावू शकता. सरकार देखील तुम्हाला या अभियानात पुढाकार घेत मदत करत आहे.
अलीकडच्या काळात कमी खर्च आणि शुद्ध उर्जेचा पर्याय म्हणून सोलार पॅनल सारख्या घटकांना प्राधान्य दिले गेले पाहिजे. तसेच या उदघाटन प्रसंगी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी परिसरातील सर्व गृहनिर्माण संस्थानी अश्या सोलर पॅनल उभारणी बाबत पुढाकार घ्यावा असे आवाहन केले आहे.
यावेळी सोसायटी पदाधिकारी व रहिवासी उपस्थित होते.