Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – यमुनानगर कॉर्नर भोसरी बस स्टॉप ह्या ठिकाणी रिक्षा रस्त्यावर उभ्या करून अवैध प्रवासी वाहतूक कायमस्वरूपी बंद करा अशी मागणी भाजपचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  निगडी येथील भोसरी बस स्टॉप यमुनानगर कॉर्नर ह्या ठिकाणी रस्त्यावर अवैध प्रवासी वाहतूक सुरू असून त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. नागरिकांना रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडी समस्या ला बळी पडावे लागत असून  यमुनानगर कॉर्नर भोसरी बस स्टॉप ह्या ठिकाणी पी एम पी एल बस स्टॉप असून मोशी तळवडे चिखली चाकण राजगुरुनगर शिंदे वासुली…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  विकसित भारत संकल्प यात्रेस मिळणारा प्रतिसाद पाहून केंद्र शासनाच्या सुचनेनुसार या यात्रेच्या दुसऱ्या पर्वास पिंपरी चिंचवड शहरात सुरूवात करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरात विकसित भारत संकल्प यात्रेच्या पहिल्या टप्प्यात सुमारे ३९ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी विविध महत्वाकांक्षी योजनांचा लाभ या माध्यमातून घेतला असून त्यामध्ये महिलांचा समावेश अधिक होता. आता दुसऱ्या टप्प्यात सदर वाहन यात्रा महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गंत ४२ ठिकाणी काढण्यात येणार असून या वाहनासह नागरिकांना मार्गदर्शन करणारे विविध कक्ष केंद्र शासनाच्या विविध योजनांचे लाभ देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याद्वारे लाभ देण्यात येणाऱ्या योजनांमध्ये आधार केद्र, आत्मनिर्भर स्वनिधी योजना, आयुष्मान कार्ड, महिला व बाल- कल्याण योजना, मागासवर्गीय…

Read More

पारंपरिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक, कौशल्य विकासाधारित शिक्षणावर भर पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) ३३ वर्षांपासून शैक्षणिक सेवा देण्याचे कार्य करीत आहे. पीसीईटी अंतर्गत शैक्षणिक संस्थांमधून आतापर्यंत हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. आता संस्थेने एक पाऊल पुढे टाकत पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) सुरू केले आहे. साते, वडगांव मावळ येथे विस्तीर्ण क्षेत्रात अत्याधुनिक शैक्षणिक सुविधांनी युक्त सुसज्ज, दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे, असे पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.     माध्यम प्रतिनिधींनी नव्याने सुरू झालेल्या पिंपरी चिंचवड विद्यापीठास (पीसीयु) बुधवारी भेट दिली. यावेळी कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन  आणि पारितोषिक वितरण  समारंभ  नटसम्राट निळू फुले नाट्य सभागृह येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पि.ची.म.न.पा महिला बाल विकास विभागाच्या माजी सभापती निर्मला कुटे, कल्चरल फौंडेशनचे विजय भिसे, कुरुळी ग्रामपंचायत उपसरपंच प्रतिभा कांबळे, नाट्यगृहाचे व्यवस्थापक प्रणव रोकडे,  संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सचिव संदीप चाबुकस्वार,मुख्याध्यापिका नाझनीन शेख, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना, रामायण नृत्य आणि गौतम बुद्धचा चरित्र पट यांनी सुरुवात झाली.  या वेळी वाडिया कॉलेजचे प्रिंसिपल डॉ. वसंत चाबुकस्वार, विरोधीपक्ष नेते नाना काटे, मां. नगरसेवक शत्रुघ्न काटे, मां. नगरसेवक चंद्रकांत…

Read More

भाजपा आमदार महेश लांडगे यांची मागणी – केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाच्या धर्तीवर आता पिंपरी-चिंचवड पोस्ट मुख्यालय निर्मिती करावी. ज्यामुळे शहर आणि परिसरातील पोस्ट ग्राहकांना सेवेचा लाभ घेता येईल आणि कामकाजात सुसूत्रता येईल, अशी मागणी भाजपा आमदार तथा शिरुर लोकसभा निवडणूक प्रमुख महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत केंद्रीय मंत्री, माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पुणे विभागीय पोस्ट कार्यालयाअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश आहे. मुख्य कार्यालयातूनच पुणे जिल्ह्याच्या पश्चिम, पूर्व आणि ग्रामीण भागाचा कामकाज सुरू आहे. यामुळे पुणे जिल्ह्याची लोकसंख्या दोन कोटींच्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी शहरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत केंद्र व राज्य या दोन्ही सरकारने केलेली कामे पोहोचवण्यासाठी ४ फेब्रुवारीपासून शहरात “घर चलो अभियान” राबविण्यात येत असून, या अभियानाला पिंपरी चिंचवड शहरवासियांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. या अभियानांतर्गत भाजपाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी त्यांच्याकडील सोपविलेले बूथ क्रमांक १०९, ११० आणि १११ वरील नागरिकांशी संवाद साधला. दोन सत्रांमध्ये बिजलीनगर, शिवनगरी, गिरिराज या भागातील ७० घरांमध्ये जावून मोदी सरकारच्या लोकोपयोगी योजनांची माहिती दिली. सकाळी ९ वाजता बूथ प्रमुख- विवेक चिटणीस यांच्या घरी चहा – नाष्टा करून अभियानाला सूरूवात झाली. पहिल्या सत्रात या भागातील ७०…

Read More

निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी भक्ती शक्ती बी आर टी मार्गाचे उदघाटन करा अन्यथा उद्घाटन करून रस्ता नागरिकांना वाहतूक सुरू करण्यासाठी खुला करण्याचा इशारा भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी आयुक्तांना केला आहे. भक्ती शक्ती बी आर टी ते रावेत रेल्वे उड्डाणपूल मुखाई चौक हा मार्ग काम संपुर्ण झाले असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी राजकीय नेते मंडळी उद्घाटनप्रसंगी उपस्थित रहात नाही म्हणून वाहतूक सुरू करण्यासाठी बंद ठेवण्यात आला. हजारो नागरिकांना रस्ता वापर करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी हा बी आर टी मार्ग बंद ठेवण्यात आला असून सदर रस्ता काम आठ वर्ष रखडलेले होते. सध्या निगडी भक्ती शक्ती बी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्हाच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर सरकार व निवडणूक आयोग यांच्या विरोधात पिंपरी-चिंचवड शहर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जोरदार निदर्शने केली. युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने यावेळी “महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार” आले शंभर गेले शंभर शरद पवार एक नंबर””आमचा पक्ष आमचे चिन्ह शरद पवार शरद पवार” या जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना इम्रान शेख म्हणाले “निवडणूक आयोगाचा आज आलेला निर्णय हा लोकशाहीची हत्या करणारा आहे. देशात सर्व राज्यात भाजप विरोधी पक्षांना संपवण्याचा डाव मोदी सरकारचा असून…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बाळासाहेब ठाकरे यांचा विचारानी प्रेरित होऊन ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणावर रुपीनगर, तळवडे, सहयोगनगर मधील नागरिकांसाठी भव्य असे महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भोसरी विधानसभा संघटक दादासाहेब सुखदेव (आप्पा) नरळे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची सुरूवात पूजनाने झाली. यावेळी शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य संघटक एकनाथ पवार, पिंपरी चिंचवड शहरप्रमुख सचिन भोसले, पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, पिंपरी चिंचवड युवासेना शहर प्रमुख चेतन पवार, उप जिल्हाप्रमुख रोमी सिंधू, उप जिल्हाप्रमुख निलेश मुटके, शहर संघटक संतोष सौंदणकर, विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट,…

Read More

आळंदीत भव्य जल्लोषात मिरवणूक आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कोणत्याही नेत्याला नि पक्षाला जुमानत नाही. मराठा आरक्षणासाठी देह ठेवण्याची वेळ आली तरी आता मागे पुढे पाहणार नाही.आता आरक्षण घेतल्या शिवाय एक इंच हि मागे हटणार नाही असा खणखणीत इशारा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा दौरा सुरु असून या दौ-यात तीर्थक्षेत्र आळंदीत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. नगरप्रदक्षिणा मार्गावरून भव्य मिरवणूक वाजत गाजत जल्लोषात फ्रुट वाले धर्मशाळा येथून हजेरी मारुती मंदिर मार्गे पोलीस चौकी समोरून नगरपरिषद चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज अर्ध पुतळा स्मारक येथे मिरवणुकीची सांगता झाली. येथे…

Read More