ताज्या घडामोडीपिंपरीसांस्कृतिक
स्वरश्री संगीत महोत्सवाचे 16 व 17 मार्चला आयोजन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वरश्री म्युझिक फाउंडेशनच्या वतीने येत्या 16 व 17 मार्च रोजी स्वरश्री संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात यंदाचा स्वरश्री पुरस्कार एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या संगीत विभाग प्रमुख डॉ. शीतल मोरे यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे संचालक नामदेव शिंदे यांनी दिली.
यंदाचे हे महोत्सवाचे सातवे वर्ष असून, हा संगीत महोत्सव औंध येथील पं. भीमसेन जोशी कलामंदिर येथे सायंकाळी चार वाजता होणार आहे. महोत्सवात पहिल्या दिवशी 16 मार्च रोजी गायक पं. शिवानंद स्वामी व गायिका सानिया पाटणकर यांचे शास्त्रीय गायन, राजन कुलकर्णी यांचे सरोद वादन होईल. दुसऱ्या दिवशी 17 मार्च रोजी गायिका श्रुती देशपांडे व पं. सुधाकर चव्हाण यांचे शास्त्रीय गायन व मोहसीन खॉं (धारवाड) यांचे सतार वादन होईल. रसिकांना शास्त्रीय गायन व वादन याचा विनामूल्य आस्वाद घेता येणार आहे.
ज्येष्ठ बासरी वादक पं. केशव गिंडे यांच्या हस्ते डॉ. शीतल मोरे यांना स्वरश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.