Author: maharashtrabreakingnews.com

पनवेल, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पनवेल विधानसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांमध्ये काम करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी (मंगळवारी) खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी व मित्र पक्षांच्या महायुतीचे बळ अधिक वाढले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी व मित्र पक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या पनवेल येथील संपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. खासदार बारणे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. त्यावेळी शिवसेनेचे पनवेल विधानसभा जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, महिला सेनेच्या उरण विधानसभा जिल्हाप्रमुख मेघाताई दमडे, युवा सेनेचे राज्य सचिव तसेच शिवसेनेचे उरण विधानसभा उपजिल्हाप्रमुख रुपेशदादा पाटील, पनवेल तालुका प्रमुख रुपेशदादा ठोंबरे, पनवेल ग्रामीणच्या तालुकाप्रमुख मंदाताई जंगले…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम परवाना आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी महसुली उत्पन्नात ८०४ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मागील वर्षीपेक्षा या उत्पन्नामध्ये २० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. २०२३-२४ आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या सहामाहीत, विभागाच्या महसुलात घट झाली होती. जेथे उत्पन्नाच्या केवळ २८ टक्के म्हणजेच २२४ कोटी रुपये जमा झाले होते. त्यानंतरच्या तिमाहीमध्ये महापालिकेने धोरणांची परिणामकारकता दाखवून उत्पन्नात उल्लेखनीय बदल घडवून आणले. तिसऱ्या तिमाहीत विभागाच्या उत्पन्नात २४ टक्के वाढ दिसून आली. तर डिसेंबर २०२३ अखेरीस उत्पन्नात ४१५ कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली. कोट – गेल्या तिमाहीत उत्पन्नामध्ये ४८ टक्क्यांनी वाढ आर्थिक वर्षातील कामगिरीमध्ये…

Read More

चिखली,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिखली येथील प्रज्ञानबोधिनी इंग्लिश मीडियम शाळेमध्ये उभारण्यात आलेल्या मातृ मंदिर चा वर्धापन दिन उत्साहात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद केंद्राच्या संचालिका अरुणा मराठे, संस्थापक व कार्यवाह यादवेंद्र जोशी, प्राचार्य अपर्णा गोवंडे व राजेंद्र ठाकूर शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. भारताच्या मातृभूमीच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली भारताच्या गौरवाची स्तुती स्तोत्रे म्हणण्यात आली. अतिथींच्या हस्ते मातृभूमीची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्वांनी उपासना केली. विद्यार्थ्यांनी पद्य सादर केले व सुमुख जोशी या विद्यार्थ्याने विवेकानंदांच्या उताऱ्याचे वाचन केले. शिक्षिका नीता शिवतारे यांनी विवेकानंदांच्या संदेशाचे वाचन केले. प्रमुख पाहुणे व यादवेंद्र जोशी आणि राजेंद्र…

Read More

मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करण्यासाठी निवडणूक कामकाजासाठी नेमलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे लक्ष द्यावे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी वृद्ध, अपंग, महिला यांचे मतदान त्वरेने होईल याची दक्षता संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दिपक सिंगला यांनी दिले. मावळ लोकसभा मतदार संघातंर्गत येणाऱ्या चिंचवड विधानसभेच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आज थेरगाव येथील स्व. शंकर गावडे कामगार भवन येथे सेक्टर अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सिंगला बोलत होते. चिंचवड विधानसभा मतदार संघातंर्गत सेक्टर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांना…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – स्वतः अंध असूनदेखील आपल्या दिव्यांगत्वावर मात करून ‘ॲसेसिबिलिटी’ या विषयावर परदेशात प्रबंधलेखन करून विद्यावाचस्पती (पीएच. डी.) संपादन करणार्‍या डॉ. शंतनू लडकत यांना नुकतेच स्काय चाईल्ड फाउंडेशनच्या वतीने पहिल्या कै. सुभाष गोरे स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, गणेश तलावाजवळ, निगडी प्राधिकरण येथे स्काय चाईल्ड फाउंडेशनच्या विशेष मुलांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून पिंपरी – चिंचवड महानगरपालिका सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या अध्यक्षतेखालील हा सन्मान करण्यात आला. माजी उपमहापौर शैलजा मोरे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर, फिटवेल गॅसकिटचे कार्यकारी संचालक चैतन्य शिरोळे, फाउंडेशनच्या संचालिका सोनाली पालांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना शैलजा मोरे…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – द हेड इंजुरी फाउंडेशन नवी दिल्ली यांच्यावतीने महाराष्ट्रात मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांचे कडून भव्य चित्रकला स्पर्धा भव्य निबंध स्पर्धा व भव्य ट्रॅफिक प्रश्नावली सोडवणे याचे आयोजन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमाचे महत्त्व कळावे व त्यांना वाहतुकीच्या चिन्हांचे तोंड ओळख व्हावी व त्यांना रस्ता सुरक्षा चे महत्व कळावे या उद्देशाहून पुणे शहरात 4000 शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धा भव्य निबंध स्पर्धा भव्य ट्रॅफिक क्वीज प्रश्नमंजुषा आयोजन करण्यात आले त्या अंतर्गत सौ गुलाब बाई कटारिया प्राथमिक विद्यामंदिर पर्वती पुणे 9 या शाळेमध्ये वरील झालेल्या स्पर्धा मधील प्रत्येक इयत्तेतील पहिले तीन क्रमांक विजेत्यांना…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज महायुतीतील घटक पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांची महाबैठक पार पडली.ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी भ्रमणध्वनी च्या माध्यमातून महिलांशी संवाद साधताना नावामध्ये वडिलांप्रमाणे आईच्या नावाचा उल्लेख करण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा आवर्जून उल्लेख केला, तसेच केंद्र सरकार च्या महिलांसाठीच्या विविध योजनांच्या यशस्वी अंमलबजावणी ची माहिती देताना हे सर्व आणि विकासाचे मुद्दे हे प्रचाराच्या केंद्रस्थानी असावेत असे सांगितले.यावेळी महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी सर्व भगिनींशी संवाद साधताना “महिलांकडून मोठ्या अपेक्षा असून त्यांनी स्वतंत्रपणे प्रचाराची यंत्रणा राबवावी आणि घरोघरी जाऊन केंद्र व राज्य सरकार ने महिलांसाठी चे घेतलेले निर्णय मतदारांपर्यंत पोहोचवावे असे आवाहन केले.” आम्ही एक परिवार…

Read More

– महापालिका प्रशासनाकडून शिल्पाचे काम प्रगतीपथावर पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बैलगाडा शर्यत आणि शेती-माती-संस्कृतीप्रति प्रचंड आग्रही असलेले भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आता महाराष्ट्रातील सर्वात मोठे बैलगाडा शर्यत शिल्प उभारण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून भोसरीत शिल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. हे शिल्प बैलगाडा शर्यतप्रेमी आणि नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. भोसरी विधानसभा मतदार संघातील आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र व भोसरी गावजत्रा मैदान परिसरात येथे ग्रामसंस्कृती, पारंपरिक क्रीडा प्रकार यासह बैलगाडा शर्यत अशी आकर्षक शिल्प उभारण्यात येणार आहेत. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून हे काम हाती घेण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग…

Read More

पनवेल, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- ‘अब की बार, चार सौ पार’, ‘फिर एक बार, मोदी सरकार’ अशा घोषणा देत, फटाक्यांची आतषबाजी करीत पनवेलमधील भाजप कार्यकर्त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप- राष्ट्रवादी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खासदार बारणे यांनी प्रथमच पनवेल येथे भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयास सदिच्छा भेट दिली. भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आदींनी त्यांचे स्वागत केले व तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्याबद्दल सत्कार केला. त्यावेळी बाळासाहेब पाटील, रामदास शेवाळे,…

Read More

मुंबई,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातून प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. त्यांच्या प्रचाराचा झंझावात राज्यात दिसून येणार आहे. येत्या १० एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी रामटेक येथे पहिली जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर १४ एप्रिलला दीक्षाभूमी येथे दर्शन व चंद्रपूर येथे जाहीर सभा प्रस्तावित आहेत, अशी माहिती भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ५ किंवा ६ एप्रिल रोजी विदर्भात सभा होणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि शीर्षस्थ नेत्यांच्या सभांचेही वेळापत्रक लवकच जाहीर होईल, असेही दरेकर म्हणाले. निवडणूक व्यवस्थापन समितीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर…

Read More