ताज्या घडामोडीपिंपरी

चिखलीत मातृ मंदिर वर्धापन दिन उत्साहात साजरा

Spread the love

 

चिखली,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिखली येथील प्रज्ञानबोधिनी इंग्लिश मीडियम शाळेमध्ये उभारण्यात आलेल्या मातृ मंदिर चा वर्धापन दिन उत्साहात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद केंद्राच्या संचालिका अरुणा मराठे, संस्थापक व कार्यवाह यादवेंद्र जोशी, प्राचार्य अपर्णा गोवंडे व राजेंद्र ठाकूर शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

भारताच्या मातृभूमीच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली भारताच्या गौरवाची स्तुती स्तोत्रे म्हणण्यात आली. अतिथींच्या हस्ते मातृभूमीची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्वांनी उपासना केली. विद्यार्थ्यांनी पद्य सादर केले व सुमुख जोशी या विद्यार्थ्याने विवेकानंदांच्या उताऱ्याचे वाचन केले. शिक्षिका नीता शिवतारे यांनी विवेकानंदांच्या संदेशाचे वाचन केले.
प्रमुख पाहुणे व यादवेंद्र जोशी आणि राजेंद्र ठाकूर यांनी मार्गदर्शन केले

श्रीमती मराठेताई,म्हणाल्या की”मुले ही देशाचे आधारस्तंभ आहेत. घेतलेल्या विषयाचा परिपूर्ण अभ्यास करावा. देशाला बलवान तेजस्वी व राष्ट्रप्रेमी युवक हवे आहेत. ध्येय ठरवा. वागण्यामध्ये नियमितपणा आवश्यक आहे. प्राणायामाने बुद्धी स्थिर होते. आपले आयुष्य आपणच घडवायचे आहे.
मोबाईलच्या आहारी जाऊ नका. मन मनगट व मेंदू बलशाली बनवा! तुम्हीच भारताला विश्वगुरू बनवणार आहात असे त्या ंना उद्देशून म्हणाल्या

आपल्या समारोप पर भाषणात श्री जोशी म्हणाले की”मोठी स्वप्ने पाहणे व ती पूर्ण करण्याकरता दरवर्षी प्रेरणा घेत राहिले पाहिजे. सातत्याने काम केले पाहिजे. यासाठीच शाळेत मातृ मंदिर उभारले आहे. देशाच्या उत्कर्षासाठी आपले आयुष्य समर्पित करायचे आहे. अनेक क्षेत्रात देशाला पुढे नेले पाहिजे. चांगल्या गोष्टींची सुरुवात आपल्यापासूनच करा. चांगला नागरिक बना व समाजातील सुखदुःखात सहभागी व्हा. समाजाच्या सुखदुःखात आपण सहभागी व्हायला हवे.

ते पुढे म्हणाले की, स्वदेश स्वधर्म व स्वभाषा यांचा अभिमान धरायला हवा. संस्कृतीचा वारसा जपा. छत्रपती शिवरायांना सुखी यांचा व परकीयांचाही खूप विरोध झाला तरीही त्यांनी खूप मोठे काम केले. अनेक देशातल्या स्वातंत्र्यवीरांना शिवरायांपासून प्रेरणा मिळाली आहे.

प्रास्ताविक व परिचय अपर्णा गोवंडे यांनी करून दिला. नीता शिवतारे यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button