मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांचे कडून भव्य चित्रकला स्पर्धा आयोजन

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – द हेड इंजुरी फाउंडेशन नवी दिल्ली यांच्यावतीने महाराष्ट्रात मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांचे कडून भव्य चित्रकला स्पर्धा भव्य निबंध स्पर्धा व भव्य ट्रॅफिक प्रश्नावली सोडवणे याचे आयोजन करण्यात आले.
शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमाचे महत्त्व कळावे व त्यांना वाहतुकीच्या चिन्हांचे तोंड ओळख व्हावी व त्यांना रस्ता सुरक्षा चे महत्व कळावे या उद्देशाहून पुणे शहरात 4000 शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धा भव्य निबंध स्पर्धा भव्य ट्रॅफिक क्वीज प्रश्नमंजुषा आयोजन करण्यात आले त्या अंतर्गत सौ गुलाब बाई कटारिया प्राथमिक विद्यामंदिर पर्वती पुणे 9 या शाळेमध्ये वरील झालेल्या स्पर्धा मधील प्रत्येक इयत्तेतील पहिले तीन क्रमांक विजेत्यांना ते आज भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला
*निबंध स्पर्धा*
*प्रथम क्रमांक* सार्थक संजय बेंडाळे
*द्वितीय क्रमांक* शर्वरी सुरेश पवार
*तृतीय क्रमांक* संस्कृती सुरेश मेने
*चित्रकला स्पर्धा**
*इयत्ता पहिली*
*प्रथम क्रमांक**आयुष अनिल जैस्वार
*द्वितीय क्रमांक**रिया मारुती सरोदे.
*तृतीय क्रमांक* अन्वी अमोल पवार
*चित्रकला स्पर्धा इयत्ता दुसरी*
*प्रथम क्रमांक* आयुष मंगेश परशुराम
*द्वितीय क्रमांक* प्रज्ञा दत्ता पाटोळे
*तृतीय क्रमांक* गौरी सुनील पाटोळे
*चित्रकला स्पर्धा इयत्ता तिसरी*
*प्रथम क्रमांक* दुर्वेश योगेश नेवरेकर
*द्वितीय क्रमांक* प्रणव प्रशांत दूरकर
*तृतीय क्रमांक* संस्कृती पवन राठोड
*चित्रकला स्पर्धा इयत्ता चौथी*
*प्रथम क्रमांक* शर्वरी विनय गराटे
*द्वितीय क्रमांक* सोहम राजेंद्र बटावले
*तृतीय क्रमांक* शुभम संदेश गायकर
*ट्रॅफिक प्रश्नमंजुषा विजेते*
*इयत्ता तिसरी*
*प्रथम क्रमांक* रुद्र शशिकांत महादेव
*द्वितीय क्रमांक* विराट आशिष कांबळे
*तृतीय क्रमांक* कनिष्का विजय निकम
*प्रश्नमंजुषा विजेते इयत्ता चौथी*
*प्रथम क्रमांक*
खुशी तानाजी पवार
*द्वितीय क्रमांक*
निर्वाण उमेश महामुनी
*तृतीय क्रमांक*
सोहम राजेंद्र बतावले
वरील शालेय विद्यार्थी यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल वळीव प्रमुख पाहुणे दत्तात्रय शेलार सर विश्वस्त नंदादीप एज्युकेशन सोसायटी
प्रमुख पाहुणे भाग्यश्री पाटील व कांचना आवारे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पुणे प्रमुख उपस्थिती राजू घाटोळे अध्यक्ष मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य व मुख्याध्यापिका सविता सुनील मरे उपस्थित होते सदर प्रसंगी 124 शालेय विद्यार्थ्यांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाला ओंकार जाधव सुरज देवकर पंढरीनाथ बुरगाटे शालेय शिक्षिका व पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते
भारतात होणारे रस्ते अपघात कमी करण्याचे उद्देशातून व शालेय जीवनापासून रस्ता सुरक्षा चे महत्व विद्यार्थ्यांना कळावे या हेतूने वरील *ट्रॅफिक प्रश्नमंजुषा भव्य चित्रकला स्पर्धा भव्य निबंध स्पर्धा* आयोजन द हेड इंजुरी फाउंडेशन नवी दिल्ली यांच्यामार्फत करण्यात आले पुणे शहरातील 25 शाळांमध्ये वरील स्पर्धाचे सर्व साहित्य द हेड इंजुरी फाउंडेशन नवी दिल्ली यांनी उपलब्ध करून दिले पुण्यामध्ये या सर्व स्पर्धा यशस्वीपणे राबवण्याचे काम मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी केले 25 शाळांमध्ये झालेल्या या स्पर्धांमध्ये 4000 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला त्यातील पहिल्या शाळेचा निकाल आज जाहीर करून विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली हा उपक्रम राबवण्यासाठी सेफ इंडिया ओरिसा व मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी विशेष मेहनत घेतली वरील सर्व स्पर्धांचे प्रथम तीन क्रमांक चे परीक्षण सौ सविता सुनील मरे मुख्याध्यापिका यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या शिक्षिकांनी केले केले हा संपूर्ण उपक्रम पुणे शहरामध्ये राबवण्यासाठी प्रमुख मार्गदर्शन व प्रोत्साहन माननीय संजीव भोर प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी केले.













