Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मावळ तालुक्यात शिवसेना ‘उबाठा’ला मोठे खिंडार पडले असून तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. काळेवाडी येथे झालेल्या शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीच्या मेळाव्यात हा शिवसेना पक्षप्रवेश झाला. खासदार बारणे यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले. ‘उबाठा’ गटाचे मावळ उपतालुकाप्रमुख व माजी सरपंच चंद्रकांत भोते, ओव्हळे गावचे विद्यमान उपसरपंच समीर कराळे, उबाठा शाखाप्रमुख विजय भोते, माजी सरपंच मनोहर भोते, गणेश भोते, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भोते, नवनाथ भोते, उबाठा परंदवडी शाखाप्रमुख विकास जगदाळे, गणेश भोते, कचरेवाडी येथील संतोष कचरे, मधुकर कचरे, रामदास कचरे आदींसह…

Read More

लोणावळा, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महायुती सरकारने 2,500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे पुणे लोणावळा लोहमार्गाच्या चौपदरीकरणाचा विषय मार्गी लागला आहे, अशी माहिती मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी-आरपीआय-रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज दिली. खासदार बारणे यांच्या प्रचारासाठी लोणावळा येथे महायुतीच्या घटक पक्षांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात ते बोलत होते. बैठकीस लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, माझी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, भाजपचे शहराध्यक्ष अरुण लाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विलास बडेकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू खांडभोर, लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन मार्फत परिसरातील नागरिकांसाठी मोफत साई चौक येथी रॉयल सिनेमा याठिकाणी “स्वातंत्र्यवीर सावरकर” या चित्रपट शो चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांनी यावेळी हजेरी लावत या चित्रपट बाबत संवाद साधला. “स्वातंत्र्यवीर सावरकर” या चित्रपटाच्या माध्यमातून सावरकरांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना दाखवण्याचा प्रयत्न या एका चित्रपटातून करण्यात आले आहे. यावेळी श्री शत्रुघ्न (बापु) काटे यांनी आलेल्या नागरिकांसोबत संवाद साधित विचार व्यक्त केले के ” या चित्रपटाचे आयोजन करण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे स्वातंत्र्य संग्रामात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेला प्रवास, त्यांचे योगदान आणि अंदमानच्या काळापाणी येथे…

Read More

श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव २०२४ – तृतीय पुष्प पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘जागर स्त्रीशक्तीचा… सूर गृहलक्ष्मीचा!’ हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडेकर यांच्या शिष्या ज्योती गोराणे आणि त्यांच्या सहकारी यांनी ‘स्वर जोर्तिमय शाम’ या भक्तिसंगीताच्या मैफलीच्या माध्यमातून बुकॉऊ वुल्फ कॉलनी पटांगण, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड), चिंचवडगाव येथे सोमवार, दिनांक ०८ एप्रिल २०२४ रोजी तृतीय पुष्पाची गुंफण केली. श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाने पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव २०२४चे आयोजन केले होते. ज्येष्ठ स्वामीभक्त मधू जोशी, मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे (पाटील), उपाध्यक्ष दीपक टाव्हरे, सचिव संजय आधावडे, सहसचिव मीनल देशपांडे,…

Read More

पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांची राष्ट्रीय मजदुर कॉंग्रेस (इंटक) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी डॉ. कैलास कदम यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हिंद कामगार संघटना (इंटक) व पुणे जिल्हातील इंटक संलग्न सर्व कामगार संघटना, कामगार, पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक यांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. हिंद कामगार संघटना कार्यालय,खराळवाडी, पिंपरी येथे संत तुकाराम महाराज यांचे वंशज व देहू संस्थान अध्यक्ष श्री पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते तसेच पद्मश्री सुभेदार मुरलीकांत पेटकर यांच्या अध्यक्षतेखाली व हिंदू धर्मगुरू ब्रवाहन वाघ, मुस्लिम धर्मगुरू मौलाना अब्दुल गफार अशरफी, ख्रिश्चन धर्मगुरू सुधीर पारकर, शिख धर्मगुरू ग्यानीजी रविंदर सिंग, बौद्ध…

Read More

तळेगाव दाभाडे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तळेगाव दाभाडे येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांचे दर्शन घेत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी (मंगळवारी) तळेगावकरांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. दरवर्षी गुढीपाडव्याला ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांचा उत्सव साजरा केला जातो. त्यानिमित्ताने खासदार बारणे यांनी तळेगावमध्ये येऊन श्री डोळसनाथ महाराजांचे आशीर्वाद घेतले. त्यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे मावळ तालुका प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे, मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, भाजपचे शहराध्यक्ष अशोक दाभाडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, मावळ तालुका संघटक सुनील तथा मुन्ना मोरे तसेच रामभाऊ सावंत, शहर प्रमुख…

Read More

मराठी नववर्षाच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्याकडून शुभेच्छा..! पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघात पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी “मशाल” पेटवून आपल्याला विकासाची, जनसेवेची आणि जनकल्याणाची गुढी उभारु, असे आवाहन करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. लोकसभा निवडणुकांचे वारे देशात आणि राज्यात वाहत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. गुढीपाडवा आणि नववर्षाच्या निमित्ताने मावळ लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना शुभेच्छा देताना त्यांनी सर्वांच्या साथीने…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीमसृष्टी स्मारकाशेजारील मैदानात महानगरपालिकेच्या वतीने दि. ११ ते १५ एप्रिल २०२४ या कालावधीत विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. ११ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १०.४५ वाजता प्रबोधन पर्वाचे उद्घाटन आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या प्रबोधन पर्वात महानाट्य, लाईव्ह कॉन्सर्ट, गीत गायन, पोवाडे, कव्वाली, एकपात्री नाट्यप्रयोग, मतदान जनजागृती अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रबोधन पर्वात सहभागी होऊन कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. गुरुवार दि.११ एप्रिल…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “१३ मे रोजी होणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत आम्ही लोकशाही प्रती जागरूक राहू तसेच जात, समुदाय, भाषा वा इतर कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता निर्भीडपणे मतदानाचा हक्क बजाऊ ” अशी शपथ आकुर्डी येथील श्री खंडेराया भाजी मंडईच्या १०५ गाळेधारकांनी घेतली तसेच या निवडणूकीत १०० टक्के मतदान करण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.       लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली  स्वीपमार्फत मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत.त्याचाच भाग म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा पुणे…

Read More

ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. निळकंठ मालाडकर यांच्या ‘स्वानंदी’ कथासंग्रह आणि ‘राजस’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)    समाजात वावरत असताना लेखक वास्तववादी घटना, अनुभव ग्रहण करतो आणि त्याचेच प्रतिबिंब आपल्या लेखणीतून उतरवतो. तसेच दैनंदिन जीवनात शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, नैसर्गिक याबरोबरच वैचारिक प्रगल्भता याचे प्रतिबिंब डॉ. मालाडकर यांच्या लेखणीतून उतरले आहे. ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्या क्षेत्रात काम करता त्याचा प्रभाव तुमच्या विचारसरणीवर होतो. मालाडकरांच्या लेखणीतून वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष राजन लाखे यांनी केले.   ज्येष्ठ वैज्ञानिक, साहित्यिक डॉ. निळकंठ मालाडकर यांच्या ‘स्वानंदी’ कथासंग्रह आणि ‘राजस’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन शनिवारी येथे करण्यात आले. यावेळी कर्नल…

Read More