Author: maharashtrabreakingnews.com

हडपसर ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शेवटच्या माणसामध्ये आत्मभान जागवणाऱ्या महामानवाची शिकवण आपल्या आचरणात असावी. त्याचबरोबर बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत संविधान वाचवण्याची ताकद सर्वांना मिळो, अस प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज हडपसर येथे केलं महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त हडपसर येथे अभिवादन करताना डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी वानवडी येथील संविधान चौकात डॉ. कोल्हे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. तसेच सम्राट अशोक बोधी विहाराला भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. कोल्हे म्हणाले की, शेवटच्या रांगेतील शेवटच्या माणसाला आत्मभान देऊन त्याला जगण्याची ताकद आणि त्याच्या मनात स्वाभिमान पेरणाऱ्या महामानववाची शिकवण…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली. दि.१४ रोजी सकाळी ७.३० वाजता पिंपरी चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला संघ कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी पिंपरी चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा.जिल्हा संघचालक विनोद बन्सल, जिल्हा कार्यवाह महेश्वर मराठे, सामाजिक समरसता गतिविधीचे विलास लांडगे, प्रदीप पाटील यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते व स्वयंसेवक उपस्थित होते. समरसता गतिविधीतर्फे पाणपोई, व्याख्यान,वही पेन संकलन उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षी रा.स्व. संघाच्या समरसता विभागाच्या वतीने शहरात विविध कार्यक्रम, व्याख्यान,…

Read More

 पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती नेहरूनगर येथिल कोर्टात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पिंपरी न्यायालयाचे न्यायाधीश  व्ही.एन. गायकवाड ,   निवृत्त न्यायाधीश   बी.एन. वाघ साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष  ॲड.सुनिल कडुसकर, माजी अध्यक्ष ॲड.नाना रसाळ, अध्यक्षा ॲड.प्रमिला गाडे, उपाध्यक्ष ॲड. गोरख कुंभार, महिला सचिव ॲड. वर्षा तिडके यांचे हस्ते पुष्पहार अर्पण  करून आला तसेच यावेळी भारतीय राज्यघटनेच्या प्रतींचे वाटप करण्यात आले.  यावेळी जेष्ठ ॲड.बी.के.कांबळे,ॲड.अरुण खरात मामा, ॲड.पि.एस.कांबळे ॲड.संभाजी बवळे, ॲड.संभाजी वाघमारे, ॲड.सुनील माने,ॲड‌. नारायण थोरात,ॲड. राज जाधव, यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवासावर व्याख्यान देऊन विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी ॲड.मुकुंद ओव्हाळ,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “आम्ही भारताचे नागरिक, लोकशाही निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की आम्ही, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज,भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनात बळी न पडता मतदान करू” अशी शपथ हजारो नागरिकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या उपस्थितीत घेतली आणि १३ मे रोजी होणा-या मावळ लोकसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान करण्याचा निर्धार केला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथे भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यांच्या जयंती निमित्त विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात…

Read More

पिंपरी, चिंचवडमध्ये जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‌अभिवादन..! पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ख-या अर्थाने अभिवादन करायचे असेल, तर मनुवादी विचारसरणीचा विरोधात त्यांनी जी लढाई लढली. त्या लढाईसाठी त्यांनी सांगितलेल्या एकमेव निशस्त्र क्रांतीचा मार्ग असलेल्या मतपेटीतून मानवतावादी व संविधानवादी कार्यकर्ता या निवडणुकीत सजगतेने निर्णय घेईल, असे मत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मांडले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आणि मावळ लोकसभेचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी माध्यमांशी त्या बोलत होत्या. या…

Read More

संभाजी ब्रिगेडच्या वतीने जयंती निमित्त अन्नदान पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संविधानाच्या माध्यमातून समता बंधुता आणि न्याय ही तत्वे रुजवत सक्षम लोकशाही निर्माण करण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून तसेच बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेला समाज निर्माण झाल्यास देशातील लोकशाही अधिक बळकट होईल असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने अभिवादन करण्यात आले.पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सतीश काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.या वेळी ते बोलत होते यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने अन्नदानाचा कार्यक्रम सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत घेण्यात आला.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी चौकातील पुतळ्यास पुष्पहार वाहून आदरांजली अर्पण केली. खासदार बारणे यांच्या समवेत भाजपा नेते व माजी खासदार अमर साबळे, आमदार उमा खापरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख नीलेश तरस, भाजपा नेते सदाशिव खाडे, नामदेव ढाके, महेश कुलकर्णी, सुजाता पलांडे, आरपीआयचे माजी शहराध्यक्ष रमेश चिमूरकर, संदिपान झोंबाडे तसेच सरिता साने, निखिल येवले, हेमचंद्र जावळे, अंकुश कोळेकर, रवींद्र ब्रह्मे, संगीता कदम, रामभाऊ सुपेकर, तुकाराम कांचन, केशव सरोदे, माऊली जगताप, अक्षय नाळे,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती पिंपरी न्यायालयात उत्साहात  साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात वकील बार रूम मधील सर्व महापुरूषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून झाली. यावेळी विविध वकील मान्यवरांनी डॅा.बाबासाहेब आंबेडकर व भारताचे संविधान यावर व्याख्याण व मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाची सांगता संविधानाची प्रास्तवना वाचन करून झाली. त्यानंतर पिंपरी चौक येथील डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पिंपरी चिंचवड ॲड. बार असोसिएशनच्या वतीने पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित पिंपरी चिंचवड ॲड. बार असोसिएशन चे मा.अध्यक्ष ॲड.राजेश पुणेकर, मा.उपाध्यक्ष.योगेश थंबा,ॲड. नितीन क्षीरसागर,ॲड.शंकर घंगाळे तसेच मोठ्या प्रमाणात वकील बांधव उपस्थित…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डॉ बाबासाहेब आंबेकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त बुद्धराष्ट्र तरुण मित्र मंडळ राजीव गांधी नगर यांच्या वतीने व भाजपा शहराध्यक्ष मा.श्री शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतीक भवन पिंपळे गुरव येथे “ऒंकार मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल, पिंपळे गुरव यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबीर तसेच नागरीकांना पुर्णपणे मोफत डायलिसीस उपक्रम राबविण्यात आला. पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकऱ्यांना पुर्णपणे मोफत सेवा देण्यात आली. या वेळेस, हॉस्पीटलचे सर्वेसर्वा श्री. विजय खर्चे डॉ.देवयानी लोंढे , डॉ अमोल शेंडे, सोमनाथ बोडरे, व हॉस्पीटल स्टाफ तसेच मंडळातील कार्यकर्ते श्री. राघू साबळे – संजय गायकवाड, अनंत सरवदे, तानाजी पायाळ, सतिश…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी विधानसभा मतदार संघाचे मतदान अधिकारी यांचे पहिल्या प्रशिक्षणा (दुसऱ्या दिवसाचे) दरम्यान ३३ मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणुक निर्णय अधिकारी दीपक सिंगला उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान मतदानाचे दिवशी मतदान केंद्रावरील मतदानाचे कामकाज कसे करावे याचे नाट्य रुपात सादरीकरण करण्यात आले. यावेळी त्यांचे समवेत मावळ लोकसभा मतदार संघाचे समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे उपस्थित होते. सिंगला यांनी प्रशिक्षण कार्यक्रम दरम्यान मतदान यंत्राची पाहणी केली. मास्टर ट्रेनर व सेक्टर ऑफिसर यांनी एकावेळी प्रत्येकी ४० मतदार अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षणासाठी २० ठिकाणी मतदान यंत्र ठेवण्यात आल्याची माहिती अर्चना यादव यांनी दिली. दोन दिवसांत सुमारे २००० अधिकारी कर्मचारी यांनी प्रशिक्षण घेतले.…

Read More