सक्षम लोकशाहीसाठी बाबासाहेबांच्या विचारांची गरज : सतीश काळे
संभाजी ब्रिगेडच्या वतीने जयंती निमित्त अन्नदान
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संविधानाच्या माध्यमातून समता बंधुता आणि न्याय ही तत्वे रुजवत सक्षम लोकशाही निर्माण करण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून तसेच बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेला समाज निर्माण झाल्यास देशातील लोकशाही अधिक बळकट होईल असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने अभिवादन करण्यात आले.पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सतीश काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.या वेळी ते बोलत होते यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने अन्नदानाचा कार्यक्रम सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत घेण्यात आला. यावेळी अभिवादनासाठी जमलेल्या शहरातील नागरिकांनी अन्नदानास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.यावेळी या कार्यक्रमास संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष सतीश काळे,कार्याध्यक्ष वैभव जाधव,सचिव रावसाहेब गंगाधरे, संघटक संतोष पाडूळे उपाध्यक्ष विनोद घोडके,सहसचिव अभिषेक गायकवाड,स्वप्निल परांडे,सामाजिक कार्यकर्ते राहुल मदने,रत्नदीप पाडूळे,कैलास जाधव,बाळू पाडूळे,जिजाऊ ब्रिगेडच्या कल्पना गिड्डे,रोहिणी पाडूळे,कृष्णा वडणे,सचिन कांबळे,गणेश भोईर,अशोक सातपुते यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
सतीश काळे म्हणाले की, बाबासाहेबांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला. प्रवाहाबाहेरच्या लोकांना समाजात समानता मिळवून देण्याबरोबरच त्यांनी समाजसुधारणेसाठीही अनेक कामे केली.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन संघर्षांनी भरलेले होते.पण ते अवघ्या जगासाठी एक मूर्तिमंत उदाहरण बनले आहेत ज्यातून सर्वांनाच प्रेरणा मिळते असे काळे म्हणाले.