मतदान प्रशिक्षणादरम्यान निवडणुक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांची हजेरी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी विधानसभा मतदार संघाचे मतदान अधिकारी यांचे पहिल्या प्रशिक्षणा (दुसऱ्या दिवसाचे) दरम्यान ३३ मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणुक निर्णय अधिकारी दीपक सिंगला उपस्थित होते.
प्रशिक्षणादरम्यान मतदानाचे दिवशी मतदान केंद्रावरील मतदानाचे कामकाज कसे करावे याचे नाट्य रुपात सादरीकरण करण्यात आले. यावेळी त्यांचे समवेत मावळ लोकसभा मतदार संघाचे समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे उपस्थित होते.
सिंगला यांनी प्रशिक्षण कार्यक्रम दरम्यान मतदान यंत्राची पाहणी केली. मास्टर ट्रेनर व सेक्टर ऑफिसर यांनी एकावेळी प्रत्येकी ४० मतदार अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षणासाठी २० ठिकाणी मतदान यंत्र ठेवण्यात आल्याची माहिती अर्चना यादव यांनी दिली.
दोन दिवसांत सुमारे २००० अधिकारी कर्मचारी यांनी प्रशिक्षण घेतले. पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख यांनी प्रशिक्षणाचे सादरीकरण केले.