Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उद्यानामधील तुटलेली खेळणी दुरुस्त करणे व मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा उचलून उद्यान साफसफाई करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना उपशहर प्रमुख निखिल दळवी यांनी उद्यान अधीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक – १५ आकुर्डी पंचतारा नगर मधील पांढरकर उद्यान मध्ये मोठ्या प्रमाणात कचरा व नारळाच्या झाडाच्या फांद्या तुटून पडल्या आहेत बऱ्याच दिवसान पासून या नारळाच्या झाडाच्या फांद्या व कचरा या उद्यान मध्ये पडून आहे या उद्याना कडे उद्यान विभागाचे लक्ष नाही सदर उद्याना मधील बरीच खेळणी तुटली आहेत एक घसर कुंडी तुटल्या मुळे कडून ठेवली आहे.…

Read More

‌ पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कै गणपतराव जगताप प्रतिष्ठान पिंपळे गुरव यांच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शनिवार दिनांक १३|०४|२०२४ रोजी सांयकाळी भिम गीतांचा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या गीतांचा भव्य कार्यक्रम पिंपळे गुरव येथील कै.काळूराम जगताप तलावाशेजारील मैदानावर मा.विजय उलपे यांच्या अंतर्गत महाराष्ट्राच्या प्रथम महिला शाहीर सीमा पाटील , भीमगायक जॉली मोरे ,महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक पुण्याचा राघू अर्थात राहुल शिंदे यांच्या भरदार गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला .कार्यक्रमाच्या सुरवातीस सीमा पाटील आणि सहकलाकरानी ‘बुद्धम् शरणम् गच्छामि, धम्मम शरणम् गच्छामि, संगम शरणम् गच्छामि, हे गीत गाऊन महामानवांना अभिवादन केले. सीमा पाटील यांनी आपल्या…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठात (पीसीयु) ‘अनंतम २०२४’ या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.    पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमास उपस्थित असलेल्या ‘नाच गं घुमा’ या चित्रपटातील कलाकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयुच्या प्रभारी कुलगुरू डॉ. मणीमाला पुरी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. ‘नाच गं घुमा’ चित्रपटातील कलाकार स्वप्नील जोशी, सुकन्या कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, मायरा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडीतील भुयारी मार्गात टवाळखोर दिवसा ढवळ्या दारू पिण्यासाठी बसतात. रात्रीच्या वेळेस येथे दारू पिणा-यांचे प्रमाण वाढते. त्यामुळे भुयारी मार्गाच्या ठिकाणी दोन सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी माजी नगरसेविका शर्मिला बाबर यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेकडे केली आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, निगडी मधील मुंबई-पुणे हायवे वरील नवीन झालेल्या भुयारी मार्गाचे नुकतेच उद्घाटन होऊन तो रस्ता नागरिकांसाठी खूला करण्यात आलेला आहे. या भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूस मिळून एकूण 8 शाळा आहेत. तसेच नागरिकांना हायवे ओलांडून पलीकडे जाणे धोकादायक होते. म्हणून हा भुयारी मार्ग बांधण्यात आला. परंतु, या भुयारी मार्गामध्ये…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने मानवंदना देत पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या त्यांच्या अनुयायींना मोफत बंद बाटलीतील मिनरल पाण्याचे वाटपाचे उद्घाटन सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक, पोलीस हवालदार पांडुरंग जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी मुख्य संयोजक ख्वाजा हुसेन कुरेशी, यांचे विशेष कौतुक केले सुमारे पाच हजाराहून अधिक पिण्याच्या पाण्याचे बाटलीचे वाटप मुख्य संयोजक ख्वाजा हुसेन कुरेशी, बाबू कुरेशी, सतीश गोडेराव, महाराज तुकाराम सूर्यवंशी ,,गुलाम जिलानी, चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलाम अली भालदार आदींनी पिण्याच्या पाण्याचे…

Read More

– शीख बांधवांची भेट घेऊन साधला संवाद देहूरोड (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी देहूरोड येथील श्री गुरु सिंग सभा गुरुद्वाराला सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी शीख बांधवांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधत मावळ लोकसभा निवडणुकीत पाठबळ देण्याचे आवाहन केले. संजोग वाघेरे पाटील यांच्यासमवेत देहूरोड येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरद पवार ) गटाचे अध्यक्ष मिकी कोचर, कार्याध्यक्ष महेश केदारी, समीर सतेलु, कैलास गोरवे, शिवाजी दाभोळे, रेणू रेडी, महिला अध्यक्षा बॉबी डीका, देहूरोड शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहराध्यक्ष भरत नायडू, रमेश जाधव, मावळ…

Read More

— शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा प्रचार‌ दौरा — खालापूर परिसरातील गावांमध्ये दौर्‍यास उत्स्फूर्त प्रतिसाद ! खालापूर,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघात ज्यांना संधी दिली, त्यांनी स्वतःसाठी काम केले. मतदारसंघासाठी आणि मतदारसंघातील नागरिकांकडे दुर्लक्ष केले. मावळच्या विकासासाठी, गाव पातळीवरील विविध समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेच्या “मशाल” चिन्हाचे बटन दाबून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला साथ द्या, असे आवाहन उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी खालापूर मावळ परिसरातील मतदारांना केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी वडगाव मावळ परिसरात गावभेट दौरा केला. या दौर्‍यामध्ये परिसरातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जागोजागी वाघेरे पाटलांचे…

Read More

कासारवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ज्येष्ठ नागरिकांबरोबर कॅरम खेळत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज दुपारी प्रचाराच्या धामधुमीत थोडा ‘विरंगुळा’ अनुभवला. खासदार बारणे यांनी कासारवाडी भागात माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. या दौऱ्यात कासारवाडी ज्येष्ठ नगरिक संघाच्या विरंगुळा केंद्रासही त्यांनी भेट दिली. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ॲड. संजय गोडसे, सचिव रघुनाथ काजळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी खासदार बारणे यांनी ज्येष्ठ नागरिकांना केंद्र शासनाच्या महत्वपूर्ण निर्णयांची व योजनांची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित असून देशाचे अभूतपूर्व वेगाने प्रगती होत आहे. त्यामुळे…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एस.एन.बी.पी. विधी महाविद्यालय व पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशन आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय मोफत कायदेविषयक शिबिर येलवाडीगाव, देहू येथे पार पडले. यामध्ये ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. येलवाडी गावाच्या यात्रेमध्ये पहिल्यांदाच असा उपक्रम राबवल्यामुळे ग्रामस्थांमध्ये याविषयी उत्सुकता होती. शिबिरात त्यांचे कायदेविषियक प्रश्न आणि शंकांचे निरसन झाल्यामुळे ते खुश होते. याप्रसंगी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, सचिव ॲड. धनंजय कोकणे, सहसचिव ॲड. उमेश खंदारे, ॲड. शंकर घंगाळे तसेच एस.एन.बी.पी विधी विद्यालयाचे शिक्षक स्वप्निल जाधव, विजयदीप मुंजनकर, येलवाडीगावचे माजी सरपंच नितीन ताटे आणि…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज देशभरात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली जातीय पिंपरी चिंचवड शहरातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी , सलग अठरा तास अभ्यास करण्याचा उपक्रम राबविलाय. शिकल्या शिवाय संघटित होता येत नाही आणि संघटित झाल्या शिवाय संघर्ष करता येत नाही या बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण,नाचून नाही तर वाचून डॉक्टर बाबासाहेबांची जयंती साजरी करत असल्याचं विद्यार्थ्यांनी म्हंटलय. तर प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणारे हे विद्यार्थी आरक्षणाचा विचार न करता अभ्यास करत स्वतला सिद्ध करतायत ही कौतुकाची बाब असल्याचं सांगत राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना स्पर्धा…

Read More