ताज्या घडामोडीपिंपरी
पिंपरी चिंचवड विद्यापीठात ‘अनंतम २०२४’ सांस्कृतिक महोत्सव साजरा ‘नाच गं घुमा’ या चित्रपटातील कलाकारांची उपस्थिती
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठात (पीसीयु) ‘अनंतम २०२४’ या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमास उपस्थित असलेल्या
‘नाच गं घुमा’ या चित्रपटातील कलाकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयुच्या प्रभारी कुलगुरू डॉ. मणीमाला पुरी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. ‘नाच गं घुमा’ चित्रपटातील कलाकार स्वप्नील जोशी, सुकन्या कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, मायरा वैकुल, अलाहाबाद येथील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. मुकुल सुताने आदी उपस्थित होते.
‘अनंतम -२०२४’ मध्ये कुलदीप सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चित्तथरारक ‘बाईक शो’ प्रस्तुत केला तसेच प्रसिद्ध बॅंड ‘एमएच ४३’ यांच्या संगीताच्या तालावर तरुणाई थिरकली, तर फॅशन शोला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. अंजू बाला यांनी केले.