ताज्या घडामोडीपिंपरीमावळ

मावळ लोकसभेच्या विकासासाठी, समस्या सोडवण्यासाठी ‘मशाल’ लक्षात‌ ठेवा – संजोग वाघेरे पाटील

Spread the love

— शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा प्रचार‌ दौरा
— खालापूर परिसरातील गावांमध्ये
दौर्‍यास उत्स्फूर्त प्रतिसाद !

खालापूर,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघात ज्यांना संधी दिली, त्यांनी स्वतःसाठी काम केले. मतदारसंघासाठी आणि मतदारसंघातील नागरिकांकडे दुर्लक्ष केले. मावळच्या विकासासाठी, गाव पातळीवरील विविध समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेच्या “मशाल” चिन्हाचे बटन दाबून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला साथ द्या, असे आवाहन उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी खालापूर मावळ परिसरातील मतदारांना केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी वडगाव मावळ परिसरात गावभेट दौरा केला. या दौर्‍यामध्ये परिसरातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जागोजागी वाघेरे पाटलांचे जंगी स्वागत करण्यात आले. माता भगिनींनी त्यांचे औक्षण करत स्वागत केले. या वेळी वडगाव जिल्हा परिषद वॉर्ड प्रमुख कार्यकर्ते शिवसेना नेते उत्तम भोईर एकनाथ पिंगळे, सचिन मते, उत्तम भोईर, अध्यक्ष वडगाव विभागाचे अध्यक्ष सुनील थोरवे, पंचायत समिती अध्यक्ष गोरख रसाळ, राजेश मेहेतेतर, जिल्हा सल्लागार एस. एम. पाटील, वाशिवली ग्रामपंचायतीचे महादेव गडगे, जयवंत पाटील, दशरथ पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अशोक मुंढे, कॉंग्रेसचे अनंत पाटील, शेकापचे अनंत जाधव, जनार्धन पवार, तळवली येथील संतोष मालकर, भगवान पाटील, युवासेनेचे मंगेश पाटील, भारती लोत, रिया मालुसरे, अंकुश बामणे, अविनाश अम्ले यांच्यासह ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, युवक, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते.

वडगाव येथील जिल्हा परिषद विभागातील तूपगाव, पाली, सारंग, असरोटी, वयाल, बोरिवली, वडगाव, कैरे, कोपरी, लोहोप, माजगाव, वारद, पौंध, आसरेवडी, धारणी, खरसुंडी, वडवळ, तांबटी या गावांना भेटी देत ग्रामस्थांशी सवांद साधला. यावेळी ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, युवक, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते. अनेक ठिकाणी कोपरा सभा पार पडल्या. या सभांमध्ये मावळ लोकसभेत शिवसेनेच्या उमेदवारास प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी गावांमधील प्रश्न आणि समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. युवा पिढीबाबत बोलताना ते म्हणाले की, देशात मोठ्या प्रमाणावर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरुणांनी पदवीऐवजी व्यावसायिक कौशल्यावर विश्वास ठेवायला हवा. येणार्‍या काळात बेरोजगारीची समस्या सोडविल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.

– मागील दोन निवडणुकीत मत देऊन चूकच केली; ग्रामस्थांचा भावना
विकास कामे होतील, गावाचा कायापालट होईल, म्हणून ग्रामस्थांनी त्यांना भरभरून मते दिली. मात्र, दहा वर्षांत कोणताच विकास झाला नाही. गावातील समस्या ‘जैसे थे’ आहेत. मते देऊन चूक केली, आज त्याचा पश्चाताप होत आहे, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. तळागाळातील सर्वसामान्यातला माणूस म्हणून संजोग वाघेरे पाटील यांची ओळख असून, येत्या निवडणुकीत त्यांना मत देवून लोकसभेत पाठवू, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button