- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सांगवीतील फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन या संस्थेच्या वतीने आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत पुण्याच्या सोहम चाकणकर या खेळाडूने फिनिक्स श्री २०२४ हा किताब पटकावला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे औचित्य साधून सांगवीतील फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने या शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जुन्या सांगवीतील एकता चौकात झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन भाजप नेते सचीन साठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फिनिक्स संस्थेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक संतोष कांबळे, हर्षल ढोरे, इंडियन बॉडी बिल्डींग अँड फिटनेस फेडरेशनचे खजिनदार राजेश सावंत, पुणे शहर बॉडी बिल्डिंगचे अध्यक्ष राजेंद्र नांगरे, बॉडी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्र १३, यमुनानगर, निगडी येथील कै. मीनाताई ठाकरे जलतरण तलाव आणि प्राधिकरण येथील छत्रपत्ती शिवाजी महाराज जलतरण तलाव नागरिकांसाठी तात्काळ खुला करण्यात यावा अशी मागणी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. लवकरात लवकर हे जलतरण तलाव खुले न झाल्यास मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील चिखले यांनी दिला आहे. पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र १३, यमुनानगर, निगडी येथील कै. मीनाताई ठाकरे जलतरण तलावाचे दुरुस्तीचे काम होऊन वर्षभर लोटले आहे. तरी देखील प्रशासनाकडून नागरिकांना वेठीस धरण्याचे काम चालू आहे. काम पूर्ण झाले असताना…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरात अनधिकृतपणे सुरु असलेल्या तसेच हवा आणि ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरत असलेल्या आर.एम.सी. (रेडीमिक्स क्राँक्रीट) प्लॅन्ट वर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून कारवाई करण्यात आली. शहरातील आर.एम.सी. (रेडीमिक्स क्रॉक्रीट) प्लॅन्ट मधून मोठ्या प्रमाणात उडणा-या धूळीमुळे नागरिकांना श्वसनाचा तसेच त्या प्रकल्पांमधून निघणाऱ्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत असून त्याबाबत महापालिकेच्या पर्यावरण विभागास तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन महापालिकेने मे.एस.व्ही.टी.एन.कंन्स्ट्रक्शन प्रा.लि. तर्फे सोमानी टॉवर्स, प्लॉट नं. २५, गायकवाडनगर, पुनावळे पुणे तसेच ऐश्वर्यम हमारा, आर.एम.सी. (रेडीमिक्स क्रॉक्रीट) प्लॅन्ट चिखली येथे प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील तसेच महापालिकेकडील ना-हरकत दाखला व इतर अनुषंगिक आवश्यक असणारी परवानगी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील सहायक पोलिस फौजदार भगवान कैलास थिटे यांचे चिरंजीव शुभम भगवान थिटे यांनी ३५९ वी रँक मिळवीत ‘यूपीएससी’ परीक्षेत यश संपादन केले. वाकडच्या कावेरीनगर पोलिस वसाहतीत राहणाऱ्या शुभम यांचा दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी घरी जाऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दिशा सोशल फाउंडेशनचे माजी अध्यक्ष गोरख भालेकर, जगन्नाथ (नाना) शिवले, कार्याध्यक्ष राजेंद्र करपे, माजी कार्याध्यक्ष सचिन साठे, उपाध्यक्ष संतोष बाबर, सचिव संतोष निंबाळकर, खजिनदार नंदकुमार कांबळे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. शुभमचे वडील सहाय्यक पोलिस फौजदार भगवान थिटे, शुभमच्या आई वनिता तसेच गौतम दळवी आदी यावेळी उपस्थित होते. विविध क्षेत्रात…
चर्चगेट येथे नवे कार्यालय प्रस्तावित : नागरिकांसाठी स्थलांतर गैरसोयीचे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अनुसूचित जातीच्या नागरिकांना अन्यायाविरुद्ध दाद मागण्याकरिता पुण्यात ४३ वर्षांपुर्वी सुरू केलेले राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे कार्यालय मुंबईतील मरीन लाईन चर्चगेट येथील आलिशान निष्ठा भवन येथे स्थलांतरीत केले जाणार आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कार्यालयाचे कार्यक्षेत्र असलेल्या महाराष्ट्र व गोवा राज्यातील अनुसूचित जातीच्या नागरिकांना आता आपल्यावरील अन्यायाविरुद्ध दाद मागण्याकरिता थेट मुंबई गाठावी लागणार आहे. सुरुवातीला सुमारे १९८३ साली केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित पुण्यात हे कार्यालय सुरू झाले होते सध्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे. त्यानंतर २००६ मध्ये या कार्यालयाचे आकुर्डी यथील…
वडगाव मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वडगाव मावळ येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज यांच्या चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त आशीर्वाद घेऊन मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी (मंगळवारी) मावळ तालुक्यातील प्रचाराचा शुभारंभ केला. खासदार बारणे यांनी काल (सोमवारी) उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आज मावळ तालुक्यापासून त्यांनी प्रचाराच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात केली. त्यांच्या समवेत आमदार सुनील शेळके, भाजपचे मावळ तालुका निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, राष्ट्रवादीचे नेते सुभाष जाधव, गणेश आप्पा ढोरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर तसेच प्रवीण चव्हाण, सुनील चव्हाण, अविनाश…
सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे ३४ वे वर्ष पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गांधी पेठ तालीम मित्र मंडळ ही पिंपरी चिंचवड शहरातील एक सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करणारी अग्रगण्य संस्था आहे. गतवर्षीप्रमाणे या संस्थेच्या वतीने जिजाऊ व्याख्यानमालेचे (वर्ष ३४ वे) आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी सात वाजता, पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते होणार आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प बुधवारी (दि. २४) माईंड पॉवर ट्रेनर व जेष्ठ समुपदेशक डॉ. दत्ता कोहिनकर हे “मनाची अमर्याद शक्ति व तणावमुक्ती” या विषयावर मार्गदर्शन करून गुंफणार आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे व व्याख्यानमालेचे समन्वयक सुहास पोफळे यांनी…
– आदित्य ठाकरे, माणिकराव ठाकरे, अमोल कोल्हे, रोहित पवारांची उपस्थिती – महाविकास आघाडीच्या असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापुरुषांना अभिवादन करून आणि आराध्य दैवतांच्या मंदिरात आशिर्वाद घेऊन, तसेच भव्य दुचाकी रॅली, पदयात्रेने जोरदार शक्तीप्रदर्शन करीत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी आज, मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. आकुर्डी येथील मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे संजोग वाघेरे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत आमदार रोहित पवार, कॉंग्रेसचे आमदार संजय जगताप, जिल्हाप्रमुख माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शेतकरी कामगार पक्षाचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – २०१९ मध्ये मावळ लोकसभेत अजित पवारांना मोठा धक्का बसला होता. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा पराभव केला होता. मात्र, आता तेच अजित पवार श्रीरंग बारणेंचा प्रचार करताना दिसत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे. ते पिंपरीत पत्रकारांशी बोलत होते. रोहित पवार म्हणाले की, संजोग वाघेरे यांच्या बाजूने आजचे वातावरण आहे. वाघेरे हे नवीन खासदार असतील. अजित पवार हे शरद पवार यांना वडील मानायचे. त्यांना सोडून स्वतःच साम्राज्य आणि कारवाईपासून लपून राहण्यासाठी महायुती आणि भाजपसोबत अजित पवार गेले…
– अंधकार दूर करण्यासाठी मावळमधून संजोग वाघेरेंना विजयी करा – संजोग वाघेरे यांचा अर्ज भरताना महाविकास आघाडीचे जोरदार शक्तिप्रदर्शन पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशात ते चारशेपार म्हणत असले, तरी भाजप दोनशे देखील पार करणार नाही. भाजपला, गद्दारांना, महाराष्ट्र व्देष करणा-यांना मतदान करणार नाही, ही भूमिका आज मतदार घेत आहेत. तुमचे एक मत इतिहास घडविणारे आणि देशातील सरकार बदलणारे ठरणार आहे. देशातील अंधकार दूर करण्यासाठी मावळ लोकसभेतून मशाल चिन्हासमोरील बटण दाबून संजोग वाघेरे यांना विजयी करा, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे अधिकृत…
