ताज्या घडामोडीपिंपरीमावळ

वडगावला पोटोबा महाराजांचे आशीर्वाद घेऊन बारणे यांच्या मावळातील प्रचाराचा शुभारंभ

Spread the love

 

वडगाव मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वडगाव मावळ येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज यांच्या चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त आशीर्वाद घेऊन मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी (मंगळवारी) मावळ तालुक्यातील प्रचाराचा शुभारंभ केला.

खासदार बारणे यांनी काल (सोमवारी) उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आज मावळ तालुक्यापासून त्यांनी प्रचाराच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात केली. त्यांच्या समवेत आमदार सुनील शेळके, भाजपचे मावळ तालुका निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, राष्ट्रवादीचे नेते सुभाष जाधव, गणेश आप्पा ढोरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर तसेच प्रवीण चव्हाण, सुनील चव्हाण, अविनाश चव्हाण, ॲड. अशोक ढमाले, अरुण चव्हाण, मनोज ढोरे, अविनाश बवरे, दीपक बवरे, अरविंदपंत पिंगळे, चंद्रशेखर भोसले चऱ्होलीकर, तुकाराम ढोरे, सुधाकर ढोरे, अनंता कुडे, मारुती चव्हाण सुनील ढोरे, सुनील मोरे, रवींद्र देशपांडे, नवनाथ हारपुडे आदी पदाधिकारी व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*मदन बाफना यांची भेट*

माजी राज्यमंत्री मदन बाफना व खासदार बारणे यांची श्री पोटोबा महाराज मंदिराच्या दारात भेट झाली. देवाच्या दारीच आपली भेट झाली, असा मिश्किल शेरा बाफना यांनी यावेळी मारला व बारणे यांना शुभेच्छा दिल्या.

वडगावचे नगराध्यक्ष मयूर ढोरे तसेच सुनील चव्हाण, पंढरीनाथ ढोरे यांच्या निवासस्थानी खासदार बारणे यांनी सदिच्छा भेट दिली. पाच पावली खंडोबा मंदिर तसेच विजय मारुती मंदिर येथे जाऊन त्यांनी दर्शन घेतले. वडगावच्या बाजारपेठेतून प्रचार फेरी काढून त्यांनी मतदारांशी संपर्क साधला. ठिकठिकाणी औक्षण व सत्कार करून बारणे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

*विकासासाठी सहकार्याचे ग्रामस्थांना आवाहन*

कान्हे येथील श्री भैरवनाथ महाराज व श्री हनुमान जयंती उत्सवातही बारणे यांनी हजेरी लावली. त्यावेळी आमदार सुनील शेळके तसेच रवींद्र भेगडे, प्रशांत ढोरे, गुलाब म्हाळसकर, निवृत्ती शेटे, रवींद्र देशपांडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते होते. ग्रामस्थांच्या वतीने किशोर सातकर, गिरीश सातकर, राजेंद्र सातकर, सतीश सातकर, बंडोबा सातकर, उत्तम सातकर, देवराम सातकर, स्वप्नील मोढवे, लक्ष्मण ठाकर आदींनी बारणे यांचे स्वागत केले.

आमदार शेळके म्हणाले की, ही गावकी-भावकीची, नात्यागोत्यांची निवडणूक नाही तर देश कोणाच्या हातात द्यायचा, यासाठी मतदान करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश झपाट्याने प्रगती करत आहे. देशहितासाठी त्यांनाच पुन्हा पंतप्रधान करणे आवश्यक आहे. खासदार बारणे यांना दिलेले मत हे मोदींना दिलेले मत असणार आहे.

कान्हे येथील रेल्वे उड्डाणपूलाबाबत ग्रामस्थांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन खासदार बारणे यांनी केले. मावळात आणखी औद्योगिक विकास होणार असून त्याद्वारे मावळातील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असे बारणे यांनी यावेळी सांगितले. देशातील नागरिकांनी विकासाला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

*कामशेतमध्ये प्रचार फेरी*

कामशेत बाजारपेठेतून प्रचारफेरी काढून खासदार बारणे यांनी मतदारांना अभिवादन केले. ढोल-ताशांच्या दणदणाटात निघालेल्या या प्रचारफेरीत आमदार सुनील शेळके, भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊ गुंड, निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे तसेच गुलाब म्हाळसकर, राजाराम शिंदे, निलेश दाभाडे, विजय शिंदे, सरपंच रुपेश गायकवाड, शंकर शिंदे, बाळासाहेब गोरे, संतोष कुंभार, मीनाताई माऊकर, जनाबाई पवार, सुरेखा बच्चे, सारिका शिंदे, सुवर्णा कुंभार, निवृत्ती टाकळकर, जितेंद्र बोत्रे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कामशेतकडे जात असताना नायगाव येथे ग्रामस्थांनी बारणे यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्ला येथे दीपक हुलावळे, सचिन हुलावळे, प्रदीप हुलावळे, वाकसाई येथे माजी सरपंच मारुती येवले तसेच भरत येवले, प्रतीक देसाई, विजय देसाई यांच्या निवासस्थानी खासदार बारणे यांनी सदिच्छा भेट दिली. टाकवे खुर्द येथील श्री काळभैरवनाथ मंदिर येथे उत्सवानिमित्त भेट दिली. त्यावेळी आमदार सुनील शेळके, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब नेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने सरपंच तुशांत ढमाले, किसनराव गरुड, संदीप गरुड, सुधीर गरुड, पांडुरंग गरुड, विश्वास ढमाले यांनी खासदार बारणे यांचे स्वागत केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button