ताज्या घडामोडीपिंपरी

वाकडच्या शुभम थिटे यांचे ‘यूपीएससी’ परीक्षेत यश -दिशा फाऊंडेशनकडून सत्कार 

Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील सहायक पोलिस फौजदार भगवान कैलास थिटे यांचे चिरंजीव शुभम भगवान थिटे यांनी ३५९ वी रँक मिळवीत ‘यूपीएससी’ परीक्षेत यश संपादन केले. वाकडच्या कावेरीनगर पोलिस वसाहतीत राहणाऱ्या शुभम यांचा दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी घरी जाऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी दिशा सोशल फाउंडेशनचे माजी अध्यक्ष गोरख भालेकर, जगन्नाथ (नाना) शिवले, कार्याध्यक्ष राजेंद्र करपे, माजी कार्याध्यक्ष सचिन साठे, उपाध्यक्ष संतोष बाबर, सचिव संतोष निंबाळकर, खजिनदार नंदकुमार कांबळे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. शुभमचे वडील सहाय्यक पोलिस फौजदार भगवान थिटे, शुभमच्या आई वनिता तसेच गौतम दळवी आदी यावेळी उपस्थित होते.
     विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा दिशा सतत गौरव करत असते. त्यातून इतरांनाही प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळावे, हा दिशाचा मुख्य हेतू असतो.
——–चौकट———-
माझ्या मुलाने त्याला ज्यामध्ये आवड होती, त्यामध्ये यश संपादन केले. याचा मला खूप आनंद वाटतो. त्याने खूप मेहनत घेतली आहे. त्याच्या कष्टाचे चीज झाले. वडील म्हणून मला त्याचा खूप अभिमान आहे. प्रयत्नातून त्याने स्वतःला सिध्द केलं.
– भगवान थिटे
–चौकट–
जे ठरवलं, ते मिळवलं. यशस्वी व्हायला आतून आवड लागते. जे करायचं ते मन लावून करायचं. खूप मेहनत घेतली. देशसेवा करण्याची संधी मिळाली. याचा आनंद वाटतो. जो संयम राखला त्याचे चीज झाले आहे. प्रयत्न करीत राहिले तर यश हमखास मिळते.
– शुभम भगवान थिटे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button