Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “प्रत्येकाने स्वतःच्या प्रामाणिक कामातून उज्ज्वल महाराष्ट्र घडवावा!” असे आवाहन पी.डी.सी.सी. बॅंकेचे जनरल मॅनेजर संजय शितोळे यांनी गणेशनगर, थेरगाव येथील खिंवसरा – पाटील शैक्षणिक संकुलात बुधवार प्रमुख अतिथी म्हणून केले. महाराष्ट्र दिन, कामगारदिन आणि शिक्षकेतर कर्मचारी पंडित गायकवाड यांचा सेवापूर्ती समारंभ अशा त्रिवेणी कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून ते बोलत होते. यावेळी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, शालासमिती अध्यक्ष नितीन बारणे, सेवानिवृत्त शिक्षिका माधुरी कुलकर्णी, शिक्षकेतर कर्मचारी पंडित गायकवाड, आशा गायकवाड, गोवर्धन गायकवाड, अनुराधा गायकवाड, अतुल आडे, चिंचवडविभाग मुख्याध्यापिका वर्षा जाधव, पालक, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते भारतमाता पूजन, ध्वजपूजन करण्यात आले. मुख्याध्यापक नटराज जगताप…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बारणे यांच्या विक्रमी विजयाचा निर्धार टीका करण्याऐवजी विरोधी उमेदवाराने केलेले काम दाखवावे – बारणे रावेत, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार हे शब्दाला पक्के आहेत. त्यांनी महायुतीला शब्द दिलेला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील विजयी होणाऱ्या उमेदवाराचेच काम करून स्वतःच्या राजकीय भविष्याची काळजी घ्यावी, असा सल्ला मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (शुक्रवारी) दिला. पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रावेत येथे आयोजित करण्यात आलेल्या माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल तथा…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान कोणी बदलू शकत नाही. कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर मी टर टर फाडून टाकेल. डरने की नही है बात आढळराव का बढाना है हात असे मत केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी हडपसर येथे व्यक्त केले. शिरुर लोकसभा मतदार संघ महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांची जाहिर सभा रामटेकडी, हडपसर येथे पार पडली. जेष्ठ नागरीक, माता भगिनी व तरुण तडफदार युवक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. प्रचंड गर्दी आणि जोरदार प्रतिसाद याठिकाणी सभेला लाभला. यावेळी आरपीआय पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, महाराष्ट्र संघटक…

Read More

पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – प्रीमिनेंट एजुकेशन अँण्ड रिसर्च असोसिएशन (PERA) अर्थात `पेरा` या खासगी विद्यापीठांच्या संघटनेच्या वतीने यंदा दि. २४, २५ व २६ मे २०२४ रोजी `सीईटी` परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस १९ मे असून, परीक्षेचा निकाल ३१ मे रोजी घोषित करण्यात येणार आहे, अशी माहिती `पेरा`चे अध्यक्ष व एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ.मंगेश कराड यांनी दिली. या परीक्षेसंदर्भात माहिती देण्यासाठी एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नालॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रा. डॉ. कराड बोलत होते. याप्रसंगी जीएसपीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.बी.बी. अहुजा, डी.वाय पाटील विद्यापीठ अंबीच्या कुलगुरू डॉ.सायली…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नृत्य दिनानिमित्त निगडी येथील नृत्यकला मंदिर व नृत्यतेज अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नृत्य महोत्सव गदिमा नाट्यगृह येथे संपन्न झाला. नृत्य गुरू तेजश्री अडीगे यांच्या मार्गदर्शनाखाली 29 वा नृत्य महोत्सवाचा समारोप प्रसंगी सिने कलाकार मयुरेश पेम, मनमित पेम, लावणी नृत्य दिग्दर्शक महेंद्र बनसोडे, बॉलीवूडचे नृत्यदिग्दर्शक जिवेंद्र गुजराती, प्रतिभा ग्रुप ऑफ इंस्टीट्यूटचे संचालक डॉ दीपक शहा, डॉ शाळीग्राम भंडारी, डॉ अनिकेत काळोखे आदी मान्यवर उपस्थित होते. 1999 मध्ये महानृत्य नाट्याची 79 व्या नाट्यसंमेलनाकरिता तेजश्री अडीगे यांनी निर्माण केलेल्या. या परंपराशील महाराष्ट्र नृत्य नाट्याच्या निर्मितीला 25 वर्ष पूर्ण झाली. या प्रित्यर्थ यावर्षीचा नृत्य महोत्सवात महाराष्ट्र हा…

Read More

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येथील कुरुळी ( ता.खेड ) येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी मिती चैत्र वद्य ८ शके १९४६ बुधवार १ मे आणि गुरुवार २ मे रोजी श्री कालभैरवनाथ महाराज व श्री खंडोबा महाराज यांचा उत्सव कुरुळी नगरीत साजरा होत आहे. कार्यक्रमाची रुपरेषा बुधवारी पहाटे श्रींची काकड आरती होईल. तदनंतर महापुजा, अभिषेक व आरती, श्रींना हारतुरे, मांडव डहाळे होणार आहे. त्या नंतर वाजता श्रींना चंदन उटी लावून श्री कालभैरवनाथ महाराजांच्या तांदळाला रुपाला मुर्ती रुप देण्यात येईल. पंरपरेनुसार आरती झाल्यानंतर महिलांना श्रींचे दर्शन घेण्यास मंदीरात प्रवेश देण्यात येईल. देवाचे १२ गाडे ओढण्याचा कार्यक्रम होईल. रात्री कै. विठाबाई…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने शुक्रवार, दिनांक ०३ मे २०२४ पासून स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे तीन दिवसीय छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सायंकाळी ठीक ७ वाजता होणाऱ्या या व्याख्यानांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. शुक्रवार, दिनांक ०३ मे २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अश्विनीकुमार उपाध्याय ‘देशहित में पॉंच नए कानून’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफतील. शनिवार, दिनांक ०४ मे २०२४ रोजी प्रसिद्ध लेखक आणि अभ्यासक तुषार दामगुडे यांच्याशी ‘सांप्रतकालीन सामाजिक – राजकीय व्यवस्था व अवस्था’ या विषयावर ऋषिकेश ‘ऋषि’ मुलाखतीच्या माध्यमातून सुसंवाद साधतील. रविवार, दिनांक ०५ मे…

Read More

शिरूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर हे निरीक्षक म्हणून गुरुवार ०२ मे रोजी शिरूर लोकसभेचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात गुरुवारी हॉटेल आरती एक्झिक्यूटिव्ह, प्रोटेक्ट कंपनीसमोर, एकता नगर, नाशिक हायवे, चाकण, पुणे येथे शिरूर लोकसभेतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. तसेच सकाळी ११ वाजता लोकसभा निवडणूक प्रबंधन समिती सोबत बैठक, दुपारी १२ वाजता जिल्हा मोर्चा आघाडी तील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, दुपारी २ वाजता सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, दुपारी ३ वाजता भाजपा कोअर कमिटीसोबत बैठक आणि दुपारी ४ वाजता महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी उत्तर पुणे जिल्ह्यातील…

Read More

चिंचवड ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शाहूनगर येथील श्री शाहू वाचनालयाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा “राजर्षी शाहू गौरव पुरस्कार २०२४” देऊन सन्मान केला जाणार आहे. एक मे रोजी महाराष्ट्र दिन, कामगार दिन, आणि जागतिक पुस्तक दिनाच्या पार्श्वभूमीवर सदर पुरस्कार जेष्ठ लोककलावंत वसंत अवसरीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील. अध्यक्षस्थान पुणे विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह मा. सोपानराव पवार हे भूषवणार आहेत तर सुप्रिया चांदगुडे (जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ), अनुराधा गोरखे (मा. नगरसेविका) , रोहिदास शिंदे (जेष्ठ उद्योजक) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पुरस्कार्थी पुढीलप्रमाणे आहेत : राजेश हजारे (कामगार क्षेत्र), शलाका कोंडावार (सामाजिक कार्य), जयश्री घावटे (शिक्षण…

Read More

खासदार बारणे यांच्या प्रचारासाठी आज आठवले यांची सभा पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- आरपीआय- मनसे- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज (बुधवारी) पिंपरी येथे जाहीर सभा घेणार आहेत. पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या शेजारील मैदानावर संध्याकाळी पाच वाजता आठवले यांची सभा होणार आहे. या सभेला महायुतीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. आठवले यांच्या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे…

Read More