श्री शाहू वाचनालयाच्या वतीने राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर
चिंचवड ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शाहूनगर येथील श्री शाहू वाचनालयाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा “राजर्षी शाहू गौरव पुरस्कार २०२४” देऊन सन्मान केला जाणार आहे.
एक मे रोजी महाराष्ट्र दिन, कामगार दिन, आणि जागतिक पुस्तक दिनाच्या पार्श्वभूमीवर सदर पुरस्कार जेष्ठ लोककलावंत वसंत अवसरीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील.
अध्यक्षस्थान पुणे विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह मा. सोपानराव पवार हे भूषवणार आहेत तर सुप्रिया चांदगुडे (जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ), अनुराधा गोरखे (मा. नगरसेविका) , रोहिदास शिंदे (जेष्ठ उद्योजक) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
पुरस्कार्थी पुढीलप्रमाणे आहेत : राजेश हजारे (कामगार क्षेत्र), शलाका कोंडावार (सामाजिक कार्य), जयश्री घावटे (शिक्षण क्षेत्र),
निलाक्षी काळे-सालके (मराठी भाषा संवर्धन), डॉ. जितेंद्र होले (पर्यावरण संवर्धन), डॉ. सुनिता निकम (नारी सन्मान), कु. अनन्या विजय पाटील (क्रीडा क्षेत्र)…
तसेच या प्रसंगी उल्लेखनीय वाचक म्हणून आर. जी. जुगदार , अनुराधा काटे , आर्यन भरगुडे, आदित्य तेलंगी यांचा वाचन संस्कार सन्मान केला जाणार आहे.