- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
निरगुडे येथील नागरिकांकडून उत्साहात स्वागत जुन्नर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ऐतिहासिक व जागृत असणाऱ्या कुकडेश्वराचे दर्शन घेऊन आज जुन्नर तालुका दौऱ्याची सुरवात केली. यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. महिलांनी औक्षण करुन स्वागत केले.दौऱ्यात महिला, तरुण-तरुणी यांनी मोठा सहभाग घेतला.”शिवाजी दादा तुम आगे बढो, हम तुम्हा रे साथ है” असा नारा देत इथल्या नागरिकांनी महायुतीला प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा संकल्प केला. दरम्यान,शिवाजीराव आढळराव पाटील यांनी येथील अनेक पदाधिकाऱ्यांच्या घरी भेट दिली. दरम्यान, या प्राचीन मंदिराच्या संवर्धन व देखभाल दुरुस्तीसाठी पालकमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे आमदार अतुल बेनके, नेत्या आशाताई बुचके आम्ही सर्वांनी निधी मागितला असता अजित दादांनी जिल्हा नियोजन…
जुन्नर , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ जुन्नर शहरात भव्य बाईक रँली काढण्यात आली. रँली काढण्याच्या अगोदर छत्रपती शिवाजीमहाराज यांना अभिवादन केले. ग्रामदैवत सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेत रँलीस सुरवात केली. दरम्यान, या रँलीत महिला, तरुण-तरुणी यांचा मोठा सहभाग होता. यावेळी महिलांनी ‘अबकी बार, चारसो पार’ शिवाजी दादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, ‘एकच वादा, शिवाजी दादा’ अशी घोषणाबाजी केली. ऐतिहासिक व जागृत असणाऱ्या कुकडेश्वराचे सकाळी दर्शन घेऊन आज जुन्नर तालुका दौऱ्याची सुरवात केली. यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. महिलांनी औक्षण करुन स्वागत केले. दौऱ्यात महिला, तरुण-तरुणी…
– पनवेल शहरात संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य कामगार मेळावा महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना कामगार संघटनांचा पाठिंबा पनवेल, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दहा वर्षे खासदार निवडून दिला. त्या “श्री”रंगाचे आपण रंग पहिले आहेत. एकदा निवडून आले की, ते परत तोंड दाखवायला सुद्धा येत नाहीत. त्यामुळे हे रंग दाखवणारे खासदार पुन्हा नको, हा निश्चय मावळ लोकसभेतील मतदारांनी केला आहे, अशी सडेतोड टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी केली आहे. तसेच, दुसरीकडे आपले उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी कोणतीही जबाबदारी मिळाल्यानंतर प्रशंसनीय काम करून दाखवलेले आहे. याची खात्री मतदारांना पटली असून त्यांचा विजय पक्का…
खासदार बारणे यांनी घेतले रत्नेश्वरी देवी व शांतेश्वरी देवी यांचे आशीर्वाद उरण, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी रात्री उरण तालुक्यातील श्रद्धास्थान असलेल्या श्री रत्नेश्वरी देवी व श्री शांतेश्वरी देवी यांचे यात्रेनिमित्त मंदिरात जाऊन पूजा केली व आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी जसखार व नवीन शेवा या गावांमधील मान्यवरांच्या निवासस्थानी जाऊन गाठीभेटी घेतल्या. उरण तालुक्यातील जसखार येथील श्री रत्नेश्वरी देवी यात्रा व पालखी सोहळ्यात खासदार बारणे दरवर्षी सहभागी होतात. या वर्षीही ते आवर्जून जसखारच्या मंदिरात जाऊन रत्नेश्वरी मातेचे दर्शन घेतले. त्यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मेघाताई दमडे…
कर्जतमध्ये बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यात निर्धार कर्जत, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसची राहील, अशी ग्वाही मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आज (शुक्रवारी) दिली. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याच्या निमित्ताने रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. व्यासपीठावर खासदार बारणे, आमदार शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत…
नैतिकतेने त्यांना मत मागण्याचा अधिकार राहिला नाही……..सुनील पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्ष संघटक शिरूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिरूर लोकसभेचा शहरी भाग म्हणून भोसरी आणि हडपसर विधानसभा येतात, भोसरी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत तर हडपसर पुणे महानगर पालिकेत येते. दोन्ही विधानसभा मिळून ११ लाखाच्या आसपास मतदान आहे. खासदार अमोल कोल्हे भोसरी विधानसभेतून मतदान मिळावे यासाठी, अमोल कोल्हे यांनी भोसरी विधासभेत गाठी भेटी दौरे सुरु केले आहेत, परंतु मागील पाच वर्षात गायब असणारे अमोल कोल्हे भोसरी विधासभेच्या गल्ली बोळात दिसू लागले आहेत, मागील पंचवार्षिक मध्ये भोसरी विधानसभेत त्यांनी किती नागरिकांच्या भेटी गाठी घेतल्या, किती नागरिकांचे प्रश्न…
मनपाच्या अग्निशमन विभागाने बजावलेल्या नोटिसावर कोणतीही कार्यवाही न केल्याने कारवाई… पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून शहरातील मिळकतींच्या सुरक्षेसाठी अग्निप्रतिबंधात्मक व जीवसंरक्षक सर्वेक्षण करण्यात येत आहे. शहरामध्ये औद्योगिक व व्यावसायिक मिळकतींना आग लागल्याने जीवित व वित्तहानीच्या घटना घडत असून अग्निशमन विभागाने घटना घडण्यामागील कारणांचे अवलोकन केले आहे. त्यानुसार, मनपा क्षेत्रातील बहुतांश व्यवसायिक मिळकतींमध्ये अग्नि प्रतिबंधात्मक उपाययोजना नसल्यामुळे सदर घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच व्यवसायाच्या ठिकाणीच वास्तव्य, धोकादायक पदार्थांचा साठा ई. केल्याचे दिसून आहे आहे. अशा दुर्घटना भविष्यात होऊ नये याकरीता पिंपरी चिंचवड शहरातील आद्योगिक, व्यावसायिक मिळकतींमध्ये अग्निप्रंतिबंधात्मक व जीवसंरक्षक सर्वेक्षण सुरु आहे. सदर सर्वेक्षणामध्ये,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नागरिकांमध्ये मतदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी तसेच मतदार नोंदणी आणि मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांमध्ये नागरिकांचाही प्रतिसाद तितकाच महत्वाचा असून लोकशाहीच्या महाउत्सवात सामिल होऊन देशाच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांमध्ये आपले म्हणणे मांडण्यासाठी मतदारांनी उस्फुर्तपणे आपल्या मताचा अधिकार बजवावा, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी २ एलईडी व्हॅनद्वारे प्रचार, प्रसिद्धी करण्यात येणार आहे. या व्हॅनचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या उद्घाटन प्रसंगी अतिरिक्त…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “स्वतःचे मन जिंकता आले पाहिजे मग जगातील कोणतीही गोष्ट तुम्हाला अशक्य वाटणार नाही!” असा संदेश ॲड. मयूरी पांचाळ यांनी (बुधवार, दिनांक ०१ मे) विद्यार्थ्यांना दिला. क्रांतिवीर चापेकर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चिंचवड यांच्यावतीने महाराष्ट्रदिन आणि सेवापूर्ती सोहळ्यात ॲड. मयूरी पांचाळ यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी पाटील, माधुरी कवी, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे सभासद सुभाष जोशी, गतिराम भोईर तसेच स्मारक समितीचे कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, सेवानिवृत्त उपशिक्षिका पुष्पा जाधव, दिनेश पेडणेकर, कृष्णानंद नाईक, सत्कारमूर्ती दीपाली नाईक आणि त्यांचे कुटुंबीय, माजी विद्यार्थी सौरभ जोशी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका वासंती तिकोने, माध्यमिक विभागाच्या प्रभारी मुख्याध्यापिका…
– शिवाजीराव आढळराव पाटील यांना मताधिक्य देण्याचा संकल्प पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भाजपाच्या वतीने भोसरी विधानसभा मतदार संघात “जनसंवाद” बैठकांचा धडाका सुरु आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्यावतीने भोसरी विधानसभा मतदारसंघातील विविध सोसायटी, वस्ती, गावठाण भागांमध्ये चौकाचौकात जनसंवाद बैठका घेण्यात येत असून नागरिकांचा या जनसंवाद मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिरूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात भाजपा- शिवसेना- राष्ट्रवादी- आरपीआय व घटक पक्ष महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील मैदानात आहेत. महायुतीच्या वतीने आढळराव पाटील यांचा प्रचाराचा जोर मतदारसंघात कायम आहे. त्यातच भोसरी विधानसभेचे भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी आढळराव…
