ताज्या घडामोडीपिंपरीशिरूर

शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या दौऱ्यास जुन्नरमधील नागरिकांचा मोठा प्रतिसाद

Spread the love

 

निरगुडे येथील नागरिकांकडून उत्साहात स्वागत

जुन्नर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ऐतिहासिक व जागृत असणाऱ्या कुकडेश्वराचे दर्शन घेऊन आज जुन्नर तालुका दौऱ्याची सुरवात केली. यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. महिलांनी औक्षण करुन स्वागत केले.दौऱ्यात महिला, तरुण-तरुणी यांनी मोठा सहभाग घेतला.”शिवाजी दादा तुम आगे बढो, हम तुम्हा रे साथ है” असा नारा देत इथल्या नागरिकांनी महायुतीला प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा संकल्प केला. दरम्यान,शिवाजीराव आढळराव पाटील यांनी येथील अनेक पदाधिकाऱ्यांच्या घरी भेट दिली.

दरम्यान, या प्राचीन मंदिराच्या संवर्धन व देखभाल दुरुस्तीसाठी पालकमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे आमदार अतुल बेनके, नेत्या आशाताई बुचके आम्ही सर्वांनी निधी मागितला असता अजित दादांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत पावणे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ग्रामास्थांच्या मार्गदर्शनाखाली आता काम देखील सुरु झाले आहे. यावेळी आमदार अतुल बेनके यांनी प्रास्ताविक करताना मंदिराबाबत माहिती दिली.

निरगुडे येथील रोकडे फार्म हाऊस बेजवाट मध्ये कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे ढोल-ताशा वाजवत स्वागत करण्यात आले. या सभेला नागरिकांनी मोठी गर्दी केली. नागरिकांनी यावेळी ‘एकच वादा, शिवाजी दादा’, महायुतीचा विजय असो अशी घोषणाबाजी केली. दरम्यान परिसरातून जास्तीत-जास्त मताधिक्य देण्याचा शब्द सर्वच मान्यवरांनी व परिसरातील नागरिकांनी दिला.

यावेळी नागरिकांना संबोधित करताना महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले,”आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे देशाचा सर्वांगिण विकास होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत आपल्याला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक धोरणाला साथ देणारा खासदार निवडून द्यायचा आहे. २०१९ ला शिरुर मतदार संघात त्यांच्या विरोधातला खासदार निवडून देण्याचे परिणाम तुमच्यासमोर आहेत. कुठल्याही गावात मी गेलो की मला सांगितले जाते विद्यामान खासदार मागील पाच वर्षांत एकदाही गावात आले नाहीत. त्यांनी कोणतेच विकासाचे प्रश्न मार्गी लावले नाहीत, फक्त बोलघेवडेपणा केला. विरोधक सांगत आहेत आपले संविधान बदलले जाणार आहे. हे साफ खोटे आहे, असे काहीही होणार नाही. आरक्षणाबाबतही गैरसमज पसरवले जात आहे. कोणीही आरक्षण किंवा संविधान याला हात लावू शकत नाही. काही घटकांनी आदिवासी नागरिकांची दिशाभूल करून भीती दाखवून आदिवासी नागरिकांचा फायदा घेतला. त्यांच्या विकासासाठी काहीही केले नाही. मोदीजी यांना समाजातील सर्वच घटकांचा विकास करायचा आहे. त्यामुळे मोदी सरकारने आदिवासी समाजातील नागिकांच्या आशा- आकांक्षा पुर्ण करण्यासाठी धोरणांमध्ये दुरदर्शी पावले उचलली आहेत. 200 कोटींच्या बजेटमध्ये देशभरात आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालये उभारली जात आहेत. आदिवासी समाजासाठी बेजटमध्ये 86 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 2024 च्या बजेटमध्ये 15 हजार कोटी रुपयांचे विशेष पँकेज दिले आहे. देशभरात 740 एकलव्य माँडेल स्कूल तसेच 38800 शिक्षकांना नोकरी मिळणार आहे. एकलव्य स्कूलमुळे 3.50 लाखा आदिवासी विद्याथ्यांना शिक्षणाची संधी मिळाली आहे. हे सर्वं मोदीजी
यांच्यामुळे झाले. आता आपल्याला मोदीजी परत पंतप्रधान होणार असल्यामुळे त्यांच्या विचाराचा खासदार निवडून द्यायचा आहे, हे लक्षात असू द्या. त्यामुळे माझे चिन्ह असलेले घड्याळासमोरचे बटन दाबून मला विजयी कराल ही विनंती करतो.

यावेळी बोलताना आमदार अतुल बेनके म्हणाले की,आढळराव दादांनी खासदार नसतानाही मतदारसंघात मोठा निधी खेचून आणला.विद्यमान खासदार मागच्या पाच वर्षांत आपल्याला दिसलेही नाहीत.अभिनेत्याला निवडून देण्यापेक्षा आपल्याला लोकांच्या मनातील नेत्याला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे आहे. आपल्या तालुक्यातून दादांना जास्तीत-जास्त मताधिक्या देण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करु.”

भाजप नेत्या आशाताई बुचके म्हणाल्या की, “शिवाजी दादांना परत खासदार करण्यासाठी महायुतीतील सर्वच घटक पक्षांनी ताकद लावायला हवी. सर्वांनी १३ मे ला घड्याळ या निशाणी समोरील बटण दाबून नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक विचारांच्या खासदाराला संसदेत पाठवा.”

आमदार शरद सोनवणे म्हणाले की,आदिवासी भागात सर्वांत पहिले टाँवर शिवाजी दादांमुळेच झाले. शिवाजी दादांच्या विजयासाठी आपण सर्वांनी शर्थीचे प्रयत्न करूयात. दादा खासदार नसतानाही त्यांनी मोठा निधी आपल्या तालुक्याला मिळवून दिला आहे. आपला हक्काचा माणूस आपला खासदार झाला तर आपले सर्व प्रश्न हक्काने सोडविले जातील. एक नंबरचे घड्याळासमोरचे बटन दाबून शिवाजी दादांना मोठ्या मतांनी विजयी करा.

यावेळी महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,आमदार अतुल बेनके, भाजप नेत्या माजी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोषनाना खैरे, दिलीप आंधळे, सुनीताताई बोऱ्हाडे, दिलीप गांजळे, संतोष काळे, गणपतराव फुलवडे, पांडुरंग पवार, देवराम लांडे, भाऊसाहेब देवळे, बाळासाहेब खिल्लारी, अभिजीत बोराडे, दिलीपराव गांजरे, सूर्यकांत डोळे, साईनाथ ढमढेरे, सुप्रियाताई लेंढे, दत्ता गवारी, सुनिता बोराडे, अशोक बोथरे, विजय राक्षे, अमोल लांडे, सचिन चव्हाण, सुरेश तिकोणे, बबनराव तांबे, अनिल रावते, किसन अंभिरे, मंगेश गायकवाड व इतर महायुतीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी व नेते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button