- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनच्या वतीने वकील बार रूम बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. या वेळी माजी अध्यक्ष ॲड.नारायण (नाना) रसाळ, ॲड.सुनिल कडूसकर, ॲड.प्रतिक जगताप,ॲड.अमोल लक्ष्मण खांडेकर, ॲड.अरुण (मामा) खरात, ॲड.बी.के कांबळे,ॲड. नारायण थोरात, ॲड.अजय यादव,ॲड.सूर्यकांत कोंडे,ॲड.एन.व्ही कुटे,ॲड. सागर पोवर इ.वकील मान्यवारांनी यांनी गौतम बुद्धानी आदर्श जीवन शैली जगण्याचे तत्व ज्याची आज सर्व जगाला गरज आहे या संदर्भात माहिती दिली. या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनच्या अध्यक्षा ॲड.प्रमिला गाडे, उपाध्यक्ष ॲड.गोरख कुंभार, महिला सचिव ॲड.वर्षा तिडके – कांबळे, सदस्य ॲड.जयेश वाकचौरे, ॲड.साक्षी धुमाळ, ॲड.तेजश चवरे, ॲड.विशाल पौळ यांच्याकडून करण्यात आले.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पावसाळ्यात रस्ते खोदाई बंदचा आदेश आयुक्तांनी दिलेला आहे त्यापूर्वी सर्व चालू कामे पूर्ण करावीत. मनपाच्या वतीने पावसाळा पूर्वीची कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲड. संदीप चिंचवडे यांनी आयुक्तांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील नाले सफाई करण्यात यावी.या अभावी रोगराई पसरू नये याची दक्षता घ्यावी.शहरातील सर्व ड्रेनेज लाईन्स साफसफाई करण्यात यावी.स्त्यावरील सर्व ड्रेनेज ची झाकणे दूरस्त करण्यात यावी. खराब झाकणांनी अपघात होत असतात नागरिकांच्या जीवितास धोका होऊ शकतो त्यामुळे झाकणे नव्याने बसविण्यात यावी. पावसाळी गटारे साफ सफाई व दुरुस्ती करण्यात यावी.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या वतीने लोणावळा सिंहगड इन्स्टिट्यूट येथे नवोदित वकील बंधू भगिनींसाठी चार दिवसीय दिं २३ ते २६ मे २०२४ पर्यंत निवासी अभ्यास शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, आज शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय माधव जामदार यांच्या हस्ते चार दिवसीय अभ्यास शिबिराचे उद्घाटन करण्यात आले, प्रसंगी प्रमुख पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश माननीय महेंद्र महाजन उपस्थित होते. पिंपरी चिंचवड ॲड. बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, सचिव ॲड. धनंजय कोकणे, सचिव ॲड. निखिल बोडके, ॲड. मंगेश खराबे यांच्या वतीने न्यायमूर्ती माधव जामदार साहेब, प्रमुख जिल्हा न्यायाधीश महाजन साहेब ,तसेच…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – समता नगर गल्ली नंबर १ रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे, अशी मागणी चिंचवड विधानसभा अध्यक्ष मेघराज लोखंडे यांनी उपअभियंता स्थापत्य विभाग ह क्षेत्रीय उपअभियंता स्थापत्य विभागाकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सी.सी.टीव्ही बसवण्यासाठी रस्त्यावर मशीन ब्रेकर ने खोदकाम करत असताना सी.एम.ई कॉलनी येथील मुख्य पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा विभागाने पूर्ण पीव्हीसी ब्लॉक तसेच रस्ता खोदत काम केले पण कामादरम्यान जे काही पी.व्ही.सी ब्लॉक काढले ते तसेच ठेवण्यात आले आहे. कामासाठी केलेले खड्डे तसेच असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून आपत्कालीन अपघात होण्याची दाट शक्यता असल्याच्या देखील तक्रारी मेघराज लोखंडे यांला मिळताच…
25 टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर दहा ते वीस टक्के सवलत, कर सवलतीच्या योजनांचा लाभ घ्या आयुक्त शेखर सिंह यांचे मालमत्ताधारकांना आवाहन पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत महिलांच्या नावाने असलेल्या निवासी मिळकतींवर सामान्य करात 30 टक्के, दिव्यांगाना 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. माजी सैनिकांना 100 टक्के सवलत लागू आहे. यापूर्वी लाभ घेतलेल्या महिला, दिव्यांग आणि माजी सैनिकांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. तसेच 2024-25 या आर्थिक वर्षाच्या अवघ्या दीड महिन्यात 25 टक्के मालमत्ता धारकांनी दाेनशे काेटी रूपयांचा कर महापालिका तिजाेरीत जमा केला आहे. त्यामुळे नागरिकांनी 30 जूनपर्यंत विविध मालमत्ता कर सवलतीच्या लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा…
पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अध्यापन ही अध्यापकाच्या जीवनातील तरुण पीढिला घडविण्याची महत्त्वपूर्ण आणि आनंददायी प्रक्रिया आहे. मात्र नियत वयोमानानुसार निवृत्ती अटळ आहे. निवृत्ती म्हणजे सर्व कामकाजातून मुक्तता नसते. काही ना काही कार्य जीवनभर करावेच लागते, त्यामुळे निवृत्ती म्हणजे कामातील बदल असतो, असे प्रतिपादन मा. प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे यांनी केले. प्रा. शहाजी मोरे व ग्रंथालय परिचर दत्तात्रय गणगे यांच्या सेवापूर्ती शुभेच्छा समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष विशाल मासुळकर होते. महाविद्यालयाच्या संख्यात्मक आणि गुणात्मक वाढीसाठी प्रा. शहाजी मोरे यांनी केलेल्या कार्याचा लेखाजोखा प्राचार्य प्रो. डॉ. माधव सरोदे यांनी मांडला. तसेच प्राध्यापक मोरे यांनी विज्ञान…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने मतमोजणी केंद्रात व त्याच्या १०० मीटर परिसरात ४ जून रोजी पहाटे ००.०१ ते मतमोजणी संपेपर्यंत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मनाई आदेश निर्गमित केले आहे. मावळ लोकसभा मतदार संघाची मजमोजणी बालेवाडी स्टेडीयम, पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी एफसीआय गोडावून कोरेगांव पार्क तर शिरुर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी स्टेट वेअरहाऊस, गोदाम क्र., ब्लॉक पी-३९, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ रांजणगाव (कारेगांव), ता. शिरूर येथे होणार आहे. जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्रात आणि १०० मीटर परिसरात सदर वेळेत भ्रमणध्वनी, लॅपटॉप,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत घेतल्या गेलेल्या इयत्ता बारावीच्या शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षीच्या परीक्षेत कमला शिक्षण संस्थेच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेज, चिंचवड मधील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले. विज्ञान शाखेतून : अमृतकर पियुषा विनायक 92.67 टक्के गुण, वाणिज्य शाखेतून गोगटे सृजन अमित याने 93.33 टक्के गुण, कला शाखेतून सिंग पौर्णिमा रवि 92.67 टक्के गुण यांनी गुण प्राप्त करून महाविद्यालयात प्रथम आले. त्याप्रित्यर्थ प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते विद्यार्थ्या समवेत त्यांच्या पालकांचा देखील भेटवस्तू देवून सत्कार केला. सालाबाद प्रमाणे या वर्षीही प्रतिभा ज्युनिअर कॉलेजचा विज्ञान,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “मनाला मिळते ते समाधान, शरीराला मिळते ते सुख, आणि आत्म्याला मिळते तो आनंद. भौतिक सुखापेक्षा आत्मिक आनंद महत्त्वाचा आहे. आचार, विचार, आहार, विहार यांच्या द्वारे आदर्श आचरणाने जीवन सुंदर होऊ शकते. आपले जीवन आपणच सुंदर बनवू शकतो.” असे प्रतिपादन लेखक आणि व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी केले आहे. मोरवाडी येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित महात्मा गांधी व्याख्यानमालेत “जगणे सुंदर आहे” या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी आर माडगूळकर हे होते. तर व्याख्यानमाला समन्वय समितीचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दिलीप गरुड, उद्योजक भगवान पठारे, संघाचे मार्गदर्शक यशवंत आपटे यांची प्रमुख उपस्थिती…
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन ; प्रख्यात गायक डॉ.अभिजीत कोसंबी, प्रसेनजीत कोसंबी आणि छोटे उस्ताद फेम श्रेया मयुराज यांची गायनसेवा पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आज मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. गणपती बाप्पांना तब्बल ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला.अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली. आज पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक झाला . त्यानंतर पहाटे ४ वाजता प्रख्यात गायक डॉ.अभिजीत कोसंबी, प्रसेनजीत कोसंबी आणि छोटे उस्ताद फेम श्रेया मयुराज यांचा स्वराभिषेक कार्यक्रम सादर केला त्यानंतर गणेशयाग होणार आहे.…
