प्रतिभा ज्युनिअर कॉलेजचे बारावीच्या परीक्षेत विज्ञान, वाणिज्य व कला शाखेचा 100 टक्के निकाल – गुणवंत विद्यार्थ्यांचा डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते सत्कार
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत घेतल्या गेलेल्या इयत्ता बारावीच्या शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षीच्या परीक्षेत कमला शिक्षण संस्थेच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेज, चिंचवड मधील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले. विज्ञान शाखेतून : अमृतकर पियुषा विनायक 92.67 टक्के गुण, वाणिज्य शाखेतून गोगटे सृजन अमित याने 93.33 टक्के गुण, कला शाखेतून सिंग पौर्णिमा रवि 92.67 टक्के गुण यांनी गुण प्राप्त करून महाविद्यालयात प्रथम आले. त्याप्रित्यर्थ प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते विद्यार्थ्या समवेत त्यांच्या पालकांचा देखील भेटवस्तू देवून सत्कार केला. सालाबाद प्रमाणे या वर्षीही प्रतिभा ज्युनिअर कॉलेजचा विज्ञान, वाणिज्य व कला शाखेचा निकाल 100 टक्के लागला.
विज्ञान शाखेतून : अमृतकर पियुषा विनायक 92.67 टक्के गुण प्राप्त करुन प्रथम, चौधरी इशिता प्रवीण हिने 91.67 टक्के गुण प्राप्त करून व्दितीय तर कुकरेजा प्रियांका नरेश हिने 90 टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला.
वाणिज्य शाखेतून गोगटे सृजन अमित याने 93.33 टक्के गुण प्राप्त करुन प्रथम,.मेहता ऐश्वर्या रमेशकुमार हिने 93 टक्के गुण प्राप्त करुन द्वितीय तर मुंढे जयश्री भगवान हिने 91.67 टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला.
कला शाखेतून सिंग पौर्णिमा रवि 92.67 टक्के गुण यांनी गुण प्राप्त करुन प्रथम, देव अदिती श्रीकांत हिने 87.50 टक्के गुण प्राप्त करून द्वितीय तर चौधरी पूजा शेषाराम हिने 87.33 टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला.
विशेष गुणप्राप्त विद्यार्थी या गटात गोगटे सृजन अमित याने जर्मन आणि बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या दोन्ही विषयात 100 गुण प्राप्त केले. तसेच जांगिर हिमांशी राजेश हिने सुद्धा बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या विषयात 100 गुण मिळविले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत घेतल्या गेलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत तिन्ही शाखेतून 813 विदयार्थी प्रविष्ठ झाले होते. सर्व विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट च्या अध्यक्षा मा. प्रतिभा शहा, संस्थेचे सचिव मा.डॉ. दीपक शहा, खजीनदार डॉ भूपाली शहा, डॉं सुनिता पटनाईक, प्रतिभा ज्युनिअर कॉलेज च्या उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे, तसेच संस्थेचे सी.ए.ओ.डॉ राजेंद्र कांकरिया, प्रतिभा कॉलेज ऑफ बिझनेस मॅनेजमेंट चे डायरेक्टर डॉ. सचिन बोरगावे, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर सायन्स चे प्राचार्य डॉ. अरुणकुमार वाळूंज, प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर सायन्स च्या उपप्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, सर्व शाखेंचे समन्वयक, संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.