समता नगर गल्ली नंबर १ रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे- चिंचवड विधानसभा अध्यक्ष मेघराज लोखंडे यांची यांची मागणी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – समता नगर गल्ली नंबर १ रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे, अशी मागणी चिंचवड विधानसभा अध्यक्ष मेघराज लोखंडे यांनी उपअभियंता स्थापत्य विभाग ह क्षेत्रीय उपअभियंता स्थापत्य विभागाकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सी.सी.टीव्ही बसवण्यासाठी रस्त्यावर मशीन ब्रेकर ने खोदकाम करत असताना सी.एम.ई कॉलनी येथील मुख्य पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा विभागाने पूर्ण पीव्हीसी ब्लॉक तसेच रस्ता खोदत काम केले पण कामादरम्यान जे काही पी.व्ही.सी ब्लॉक काढले ते तसेच ठेवण्यात आले आहे.
कामासाठी केलेले खड्डे तसेच असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून आपत्कालीन अपघात होण्याची दाट शक्यता असल्याच्या देखील तक्रारी मेघराज लोखंडे यांला मिळताच उपअभियंता स्थापत्य विभाग ह क्षेत्रीय कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.
समता नगर गल्ली नंबर १ नवी सांगवी रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी मेघराज लोखंडे ( चिंचवड विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार ) यांनी केली यावेळी नवी सांगवी प्रभाग ४५ अध्यक्ष अभिषेक मेमजादे व प्रतीक पातूरकर उपस्थित होते.









