- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ठेकेदार, कंत्राटदार यांना सोबत निवडणुका जिंकता येत नाहीत श्रमिक आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवून त्या जिंकता येतात अशी टीका भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तसेच ज्येष्ठ कामगार नेते यशवंत भोसले यांनी भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील महायुती सरकारवर केली आहे. यशवंत भोसले हे पत्रकार परिषदेत बाेलत हाेते. यशवंत भोसले म्हणाले गेल्या १० वर्षात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला श्रमिक आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी साधी वेळ देखील दिली नाही. आता तरी राज्यातील भाजप नेत्यांनी आत्मपरीक्षण करावं तरच आगामी काळातील विधानसभा निवडणुकीत यश मिळवता येईल असा भाजपला घरचा आहेरच यशवंत भोसलेनी दिला. लोकसभा निवडणुकीत भारतीय…
– महापालिका प्रशासन नवे पोर्टल विकसित करणार! – आमदार महेश लांडगे यांच्या बैठकीत आयुक्तांचे निर्देश पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अति धोकादायक झाडांबाबतच्या तक्रारींचा आता ‘२४ तासांत’ निपटारा होणार आहे. त्यासाठी प्रशासन ‘सारथी’ हेल्पलाईनच्या धर्तीवर नवीन ऑनलाईन पोर्टल विकसित करणार आहे. यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी उद्यान विभागाला तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. भोसरी विधानसभा मतदार संघातील पावसाळा पूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी ऑटो क्लस्टर येथे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची भेट घेतली. यावेळी नालेसफाई, नागरी आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आदी विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पावसाळा सुरू होत असल्यामुळे…
भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या वतीने आयोजन पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पिंपरीतील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवारी (दि. ८) सकाळी दहा वाजता दहावी व बारावीनंतर काय? या करिअर मार्गदर्शन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये देशातील प्रख्यात एमपीएससी व युपीएससी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणारे व्याख्याते, चाणक्य मंडल परिवारचे संस्थापक संचालक व निवृत्त आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी हे दहावी आणि बारावी नंतरचे करिअर, व्यक्तिमत्व विकास आणि स्पर्धा परीक्षांवर पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. दहावी आणि बारावीचा निकाल नुकताच लागला आहे. या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांचे आयुष्याचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पात निविदा प्रक्रिया पारदर्शीपणे राबविण्यात यावी अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी मनपा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मनपाच्या शिक्षण विभागाच्या प्राथमिक शाळा तसेच शिक्षण विभाग व आकांक्षा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येणा-या १०२ प्राथमिक शाळा व माध्यमिक विभागाचे १८ माध्यमिक विद्यालय तसेच मनपाचे २ औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) यांचे इमारती, परिसराची तसेच इमारतीमधील स्वच्छतागृहांची यांत्रिकीकरणाव्दारे साफसफाई करणे कामकाज करणेकामी निविदा नोटीस क्र. ९/२०२३-२४ प्रसिध्द करणेत आलेली आहे. सदर निविदेबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने याबाबत सविस्तर माहिती…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिवंगत महापौर कै.भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ३८ व्या पुण्यतिथी निमित्त पिंपरी वाघेरे गाव येथील कै. भिकु वाघेरे – पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप , माजी विरोधी पक्ष नेते विठ्ठल उर्फ नाना काटे व काँग्रेस शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करण्यात आला. सालाबादप्रमाणे कै.भिकू वाघेरे प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्कार देहू संस्थानचे मा.अध्यक्ष ह.भ.प नितीन महाराज मोरे यांच्या आध्यात्मिक व सामाजिक कार्यक्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात १०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कै.भिकू वाघेरे…
जागतिक पर्यावरण दिना औचित्याने उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या १०० वृक्षांचे रोपण
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर आणि परिसरात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे ,ऑक्सिजनचा उत्तम पुरवठा करणाऱ्या स्वदेशी वाणाच्या , वड , पिंपळ , चिंच , कडुलिंब , औदुंबर , सुबाभळ या १०० वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच , या या रोपण केलेल्या वृक्षांची निगा देखील उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे राखण्यात येणार आहे. या विषयी अधिक माहिती देताना उन्नती सोशल फाऊंडेशन च्या अध्यक्षा डॉ.कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या , “पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात उन्नती सोशल फाऊंडेशन नेहमीच प्रयत्नशील असते. वाढते शहरीकरण आणि सिमेंटच्या जंगलामुळे तापमान वाढ झालेली आपल्या सर्वांनाच त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटने तर्फे सेक्टर क्रमांक ०७, PCNTDA भोसरी येथे वड, पिंपळ, कडूनिंब, चिंच अशा विविध ५१ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, संचालक प्रमोद राणे, सचिन आदक, स्वीकृत संचालक माणिक पडवळ, सुरेश गवस, संजय भोसले, तसेच लघुउद्योजक प्रकाश ढमाले, संजय बन्सल, हेमंत मोरे, बबनराव दळवी, माणिक ढोकळे, विजय निमसे, सतीश कदम, संदीप फटांगडे, श्रीमंत राठोड आणि अनेक लघुउद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चालू वर्षी उन्हाळा खूपच कडक जाणवला असून याकरिता झाडांची लागवड करणे अत्यंत गरजेचे आहे. झाडांचे मानव जातीला व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी खूप फायदे आहेत. पिंपरी चिंचवड लघुद्योग संघटनेने झाडांचे महत्व ओळखून ऐन पावसाळा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संगीत अकादमी वर्धापन दिनानिमित्त अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनातून “भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी महोत्सव २०२४” चे आयोजन दि.०७ ते ०९ जून २०२४ या कालावधीत सायं ५.३० ते रात्री १० अखेर आकुर्डी येथील ग. दि. माडगुळकर नाट्यगृह करण्यात आलेले असून सदर कार्यक्रम नागरीकांसाठी विनामूल्य आहे. कार्यक्रमाचा तपशील व रुपरेषा खालील प्रमाणे.कार्यक्रमांचा तपशीलशुक्रवार दि. ०७ जून, २०२४ सायं ५.३० वा. “भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी महोत्सव २०२४ या कार्यक्रमाचे उदघाटन, दिपप्रज्वलन व पाहुण्याचे स्वागत सायं ६.०० वा. डॉ. भरत बलवल्ली यांचे शास्त्रीय गायन सायं ७.३० वा.डॉ. आश्विनी भिडे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आपले शहर स्वच्छ,सुंदर तसेच पर्यावरणपूक ठेवण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे, शहरवासियांचा देखील याबाबतीत सहभाग मिळत आहे असे सांगून आयुक्त शेखर सिंह यांनी पर्यावरण दिनानिमित्त फक्त वृक्षारोपण करून दिवस साजरा न करता प्रदुषण टाळण्यासाठी प्लॅस्टिक मुक्ती, वायू प्रदूषण रोखण्यासाठी वाहनांऐवजी सायकलचा वापर यासारखे उपक्रम घेण्याचे आवाहन केले. ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.या दिनानिमित्त दुर्गादेवी टेकडी उद्यान येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाच्या वतीने वृक्षारोपण तसेच १० हजार वृक्षरोपट्यांचे मोफत वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त शेखर सिंह बोलत होते. सदर कार्यक्रमास अतिरिक्त…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “वृक्षसंवर्धनामुळे आत्मिक आनंद मिळतो!” असे मत ज्येष्ठ पर्यावरण कार्यकर्ते विश्वास साळुंखे यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. आनंद ज्येष्ठ नागरिक संघ आणि गोलांडे इस्टेट मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना विश्वास साळुंखे बोलत होते. सेवानिवृत्त महापालिका नगररचना उपसंचालक प्रभाकर नाळे, आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर, कार्याध्यक्ष प्रिया जोशी, खजिनदार रवींद्र झेंडे, गोलांडे इस्टेट मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची प्रमुख उपस्थित होती. विश्वास साळुंखे पुढे म्हणाले की, “सहा वर्षांपूर्वी घोरावडेश्वर डोंगरावर पहिल्यांदाच एका वटवृक्षाचे रोपण केल्यावर मनस्वी आनंद झाला. त्यानंतर दररोज पहाटे पाच वाजता घोरावडेश्वर परिसरात…
