ताज्या घडामोडीपिंपरी

पारदर्शी स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवा – भाऊसाहेब भोईर

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पात निविदा प्रक्रिया पारदर्शीपणे राबविण्यात यावी अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी मनपा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मनपाच्या शिक्षण विभागाच्या प्राथमिक शाळा तसेच शिक्षण विभाग व आकांक्षा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येणा-या १०२ प्राथमिक शाळा व माध्यमिक विभागाचे १८ माध्यमिक विद्यालय तसेच मनपाचे २ औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) यांचे इमारती, परिसराची तसेच इमारतीमधील स्वच्छतागृहांची यांत्रिकीकरणाव्दारे साफसफाई करणे कामकाज करणेकामी निविदा नोटीस क्र. ९/२०२३-२४ प्रसिध्द करणेत आलेली आहे.

          सदर निविदेबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने याबाबत सविस्तर माहिती घेतली असता असे निदर्शनास येते कि ठराविक एका निविदाधारकाला डोळ्यासमोर ठेऊन त्याला निविदा मिळवून देण्याच्या उद्धीष्टाने स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया न करता सदर प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेल्या इतर निविदाधारकांना अपात्र ठरवण्याचा थाट आरोग्य विभागामार्फत चालविलेला आहे. सदर कामकाज हे साफसफाई करावायचे असताना देखील पात्रते कामी एका विशिष्ट शब्दाचा शब्दप्रयोग करून इतर सहभागी निविदाधारक अपात्र ठरविण्याचे कट कारस्थान चालू असल्याचे दिसून येते.

सदर कामी साल २०२१ मध्ये याच कामा करिता निविदा नोटीस क्र. ०६/२०२१-२२ अन्वये निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यामध्ये फक्त साफसफाई कामी मनुष्यबळ पुरवठा करणे अनुभव मागितला होता मग सध्याची निविदा हि त्याच कामाची व कामाचे स्वरूप देखील सारखे असताना Attendant व Assistance असा शब्द प्रयोग करून इतर सहभागी निविदाधारक यांना अपात्र कशामुळे करत आहात? कमी निविदाधारक पात्र झाल्यास आर्थिक लिफाफ्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा होऊ शकणार नाही व त्याचा फटका सर्वसामान्य जनतेच्या कररुपी रकमेतून जमा झालेल्या महानगरपालिकेच्या आर्थिक तिजोरीवर होईल.

          सदर कामी मोठ्या प्रमाणात निविदाधारक पात्र झालेस पारदर्शी स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया होऊ शकेल जेणेकरून महानगरपालिकेचा आर्थिक फायदा देखील होईल. तरी सदर निदेनामार्फत आपणास विनंती करण्यात येते कि कुठल्याही गरज नसलेल्या शब्धाचा प्रयोग करून एखाद्या निविदाधारकाला अपात्र ठरविण्यापेक्षा मोठ्या प्रमाणात निविदाधारक पात्र होऊन पारदर्शी स्पर्धात्मक निविदा राबवणे करिता संबंधित विभागास सूचना देण्यात याव्यात,  असे ही निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button