- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नेहरूनगर येथील पिंपरी न्यायालयात नवीन भारतीय न्याय सहिता (BNS) या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. पूर्वीचा इंडियन पिनल कोड (IPC) या कायद्यामध्ये बदल करून शासनाने नवीन भारतीय न्याय सहिता (BNS) हा कायदा अस्तित्वात आणलेला असून या कायद्याची लवकरच अमलबजावणी केली जाणार आहे. या कायद्यामधील झालेले बदल या विषयी वकील बंधू व भगिनी यांना मार्गदर्शन व्हावे या हेतूने असोसिएशन च्या वतीने पुणे जिल्हा न्यायालयाचे सरकारी वकील ॲड.पी.व्ही.चौरे यांना नवीन भारतीय न्याय सहिता (BNS) या कायदा विषयी चर्चा व मार्गदर्शन करण्याकरिता निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी असोसिएशनच्या अध्यक्षा ॲड.प्रमिला हरीश गाडे, उपाध्यक्ष ॲड.गोरख भागवत कुंभार,…
– तळवडे, चऱ्होली अन् दिघीतील प्रस्तावित कामे मार्गी – आमदार महेश लांडगे यांच्याहस्ते ६ ठिकाणी भूमिपूजन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सोसायटी, कॉलनीमधील अंतर्गत रस्ते, सभांडप आणि मंदिर सुशोभिकरणाच्या कामासह विविध ६ विकासकामांना आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने चालना देण्यात आली. त्यामुळे प्रस्तावित विकासकामांसाठी भोसरीत ‘सुपर संडे’ ठरला, अशा भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. भोसरी विधानसभा मतदार संघातील तळवडे, चऱ्होली, मोशी आणि दिघी या भागातील विविध प्रस्तावित विकासकामांचे भूमिपूजन आमदार महेश लांडगे यांच्या ‘आमदार निधी’तून करण्यात आले. यावेळी स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नागरिक उपस्थित होते. रुपीनगर तळवडे येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर सभामंडप, शिवशक्ती हाउसिंग सोसायटी, सहयोगनगर…
आंतरराष्ट्रीय घरेलु कामगार दिन उत्साहात साजरा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती, कष्टकरी संघर्ष महिला महासंघातर्फे आज चिंचवड येथील कार्यालयासमोर घरेलू काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या व विशेष नैपुण्य मिळवणाऱ्या लक्ष्मी रणदिवे, वैशाली गोंदिल या घरेलू कामगारानां श्रमप्रतिष्ठा गौरव पुरस्कार २०२४ देऊन सन्मानीत करण्यात आले. महिला अध्यक्षा माधुरी जलमूलवार ,पुणे शहराध्यक्ष सुनीता दिलपाक, माया शेटे,अश्विनी कळमकर, उज्वला साळुंखे,यमुना वंजारी, मालन गायकवाड,वनमाला कांबळे,विजया मोरे,बदाम कांबळे,सुजाता टेकाळे, सुरेखा आढाव, रेखा शिंदे,उषा आव्हाड,दीक्षा सुरवसे,कमल पालके, मायादेवी गायकवाड, सुनंदा साबळे, सुनंदा साबळे, जया देवाडीगा आदी सह बहुसंख्य महिला उपस्थित होते. रज्यातील घरेलू कामगार बहुतांश असूशिक्षित व अकुशल असून परिस्थितीमुळे…
वाशिम व अकोला जिल्हा दौऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असंघटित कामगार विभाग व कष्टकरी संघर्ष महासंघकडून आयोजन पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्यातील कामगारांचे विभागवार अनेक प्रश्न आहेत मात्र त्यातही विविध जिल्ह्यांमध्ये विविध प्रकारच्या समस्या आहेत, कष्टकरी कामगारांना भेटूनच त्यांच्याशी समजून घेतल्यानंतर अनेक प्रश्नांची उकल होते जाण येते आणि लढाईसाठी एक वेगळी प्रेरणा मिळते असे मत राष्ट्रवादी या असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार,नॅशनलिस्ट ट्रेड फेडरेशन, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे १५ व १६ जून रोजी वाशिम जिल्हा व अकोला जिल्हा येथे कष्टकरी कामगार संवाद दौरा आयोजित करण्यात आला. यावेळी कष्टकरी कामगारांनी त्यांचे हार्दिक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – किलबिल किलबिल पक्षी बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती, पानोपानी फुले बहरती , स्वप्नी आले काही एक मी गावं पहिला बाई कवितेच्या या ओळीं सार्थ ठरविण्यासाठी , विद्यार्थिनींच्या किलबिलाटाने शाळेत चैतन्य निर्माण व्हावे म्हणून नवागतांचे स्वागत करण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालयात स्वागतोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . विद्यार्थिनींचे शाळेच्या पहिल्याच दिवशी स्वागत करण्यासाठी फुलांच्या माळा, रांगोळ्या, विविधरंगी फुगे , फ़ुलांच्या पाकळ्यांच्या पायघड्या व सनई चौघडा अशी जय्यत तयारी सर्व अध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी केली . विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींचे विद्यालयाच्या प्रवेश द्वारा पासूनच सनई सूर…
खासदारकीच्या ‘हॅटट्रिक’चे श्रेय सर्वसामान्य मतदारांना – श्रीरंग बारणे मावळ मतदारसंघातील विजयात शिवसैनिकांचा मोठा वाटा – बारणे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यात वेगळे वारे वाहत असतानाही मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची खासदारकीची हॅटट्रिक झाली याचे सर्व श्रेय सर्वसामान्य व सूज्ञ मतदारांना जाते, असे उद्गार मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी काढले. निवडणुकीत प्रचंड मेहनत घेणारे शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांचा आपल्या विजयामध्ये मोठा वाटा असल्याचे बारणे यांनी यावेळी सांगितले. मावळ लोकसभा मतदारसंघातून विजयाची हॅटट्रिक केल्याबद्दल पिंपरी-चिंचवड शिवसेनेच्या वतीने खासदार बारणे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसैनिकांच्या वतीने फुलांनी सजवलेला मोठा धनुष्यबाण देऊन मोठ्या जल्लोषात बारणे यांना गौरविण्यात आले.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेकडून दूषित व गढूळ पाणीपुरवठा झाल्याने भोसरी परिसरातील तीन रुग्णांना पटकीची (कॉलरा) लागण झाली होती. त्यानंतर शुक्रवारी (दि.४) चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, त्यांच्यावर वायसीएम आणि भोसरी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. रुग्णांची संख्या ७ वर पोहोचली असून सर्वच रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. भोसरी येथील धावडे वस्ती परिसरात महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या जलवाहिनीतून एका नागरिकाने नळजोड घेतले होते. मात्र, नळजोड घेताना खबरदारी न घेतल्यामुळे वाहिनीला गळती झाली. यातून दूषित पाणीपुरवठा होऊन संबंधित परिसरातील रुग्णांना कॉलराची लागण झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. परिसरात महापालिकेच्या वतीने घरोघरी सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “प्रतिभावंतांना काळाच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी असते!” असे विचार शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. सेवानिवृत्त मुख्याध्यापिका उज्ज्वला ढमढेरे लिखित ‘हरिबंध’ या कवितासंग्रहाचे आणि ‘रत्नांजली’ या चारोळीसंग्रहाचे प्रकाशन करताना नाना शिवले बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दिलीप गरुड अध्यक्षस्थानी होते; तसेच ह. भ. प. किसनमहाराज चौधरी, साहित्यिक श्रीकांत चौगुले, राजेंद्र घावटे आणि कवयित्री उज्ज्वला ढमढेरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. नाना शिवले पुढे म्हणाले की, “शब्दांची पूजा करणार्या व्यक्तींचे जीवन नेहमी समृद्ध असते. उज्ज्वला ढमढेरे यांच्या कविता हृदयस्पर्शी आहेत!” किसनमहाराज चौधरी यांनी, “प्रत्येक शिक्षक हा साहित्यिक असला पाहिजे तरच तो…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटीच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. पीसीएमसी स्मार्ट सारथी हे पिंपरी चिंचवड महापालिका आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. यांचे अधिकृत मोबाइल अप आहे. पीसीएमसी स्मार्ट सारथी अंतर्गत नागरिकांसाठी १ जॉब पोर्टल ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पोर्टल सर्व लघु उद्योजकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे आणि सचिवबजयंत कड यांनी केले आहे. जॉब पोर्टलवर पिंपरी चिंचवड शहरातील रोजगार संधींची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जॉब पोर्टल हे केवळ रोजगाराची माहिती देणारे पोर्टल आहे. जॉब पोर्टलमुळे नागरिकांना रोजगाराची माहिती सुलभपणे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्था संचालित राजर्षी शाहू महाराज विद्यालयामध्ये उन्हाळी सुट्टीनंतर चा पहिला दिवस असल्याने सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय गोकुळजी गायकवाड , संस्थेचे सचिव सन्माननीय एल.एस. कांबळे शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष पोपट आरणे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबाजी शिंदे आवर्जून उपस्थित होते. यावर्षी नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि शिक्षिका यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. विद्यालयामध्ये यावर्षी बदलीने नव्याने रुजू झालेले संतोष घरडे , प्रमोद डोंगरदिवे , आनंद गोंदिल तसेच स्वप्निल पठारे काका यांचाही मुख्याध्यापकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.…
