ताज्या घडामोडीपिंपरी

स्मार्ट सारथी जॉब पोर्टलला लघुउद्योजकांनी सहकार्य करावे – पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे आवाहन

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटीच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. पीसीएमसी स्मार्ट सारथी हे पिंपरी चिंचवड महापालिका आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. यांचे अधिकृत मोबाइल अप आहे. पीसीएमसी स्मार्ट सारथी अंतर्गत नागरिकांसाठी १ जॉब पोर्टल ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पोर्टल सर्व लघु उद्योजकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे आणि सचिवबजयंत कड यांनी केले आहे.

जॉब पोर्टलवर पिंपरी चिंचवड शहरातील रोजगार संधींची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जॉब पोर्टल हे केवळ रोजगाराची माहिती देणारे पोर्टल आहे. जॉब पोर्टलमुळे नागरिकांना रोजगाराची माहिती सुलभपणे उपलब्ध होणार रोजगार शोधणारे तरुण आणि कामगारांची आवश्यकता असलेल्या उद्योगांमध्ये हे पोर्टल सेतूचे काम करेल. यासाठी लघु उद्योजकांनी एकूण पदांची संख्या पदांची नावे, कंपनीचे नाव, संपर्क व्यक्तीचेनाव, ई मेल आयडी, एकूण रिक्त पदे, कामाचेस्वरूप, कंपनी लोगो (PNG फाइल), रिक्त पदांचीप्रारंभ तारीख आणि शेवटची तारीख हा तपशील pdf स्वरुपात cep@pcmcindia.gov.in या ईमेल आयडीवर पाठवावेत.

तसेच विविध आस्थापनांना कुशल मनुष्यबळ मिळण्यासाठी.देखील सहाय्य होणार आहे. या
जॉब पोर्टलमुळे रोजगाराच्या शोधात असणारे नागरिक आणि शहरातील आस्थापना यांच्या दरम्यान एकसेतू निर्माण होणार आहे. तसेच नागरिकांना रोजगार उपलब्ध होऊन स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत मिळणार आहे. प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या माहितीस संबधित कंपनी सर्वस्वी
जबाबदार असेल.

या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी लघु उद्योजकांचा सहभाग आवश्यक आहे. सभासद
असणाऱ्या आस्थापनामध्ये उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांच्या रिक्त जागांची माहिती द्यावी. या
रिक्त जागा पिंपरी चिंचवड स्मार्ट सारथी जॉब पोर्टलवर प्रसिद्ध केल्या जातील. ज्यामुळे ही माहिती
व्यापक स्वरुपात नागरिकांपर्यंत पोहोचेल आणि भरती प्रक्रिया सुलभ होईल. हा उपक्रम सुलभ
करण्यासाठी तपशील pdf स्वरुपात cep@pcmcindia.gov.in या ईमेल आयडीवर
पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button