कन्या विद्यालयात नवागतांचा स्वागतोत्सव कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – किलबिल किलबिल पक्षी बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती, पानोपानी फुले बहरती , स्वप्नी आले काही एक मी गावं पहिला बाई
कवितेच्या या ओळीं सार्थ ठरविण्यासाठी , विद्यार्थिनींच्या किलबिलाटाने शाळेत चैतन्य निर्माण व्हावे म्हणून नवागतांचे स्वागत करण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालयात स्वागतोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
विद्यार्थिनींचे शाळेच्या पहिल्याच दिवशी स्वागत करण्यासाठी फुलांच्या माळा, रांगोळ्या, विविधरंगी फुगे , फ़ुलांच्या पाकळ्यांच्या पायघड्या व सनई चौघडा अशी जय्यत तयारी सर्व अध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी केली .
विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींचे विद्यालयाच्या प्रवेश द्वारा पासूनच सनई सूर ,रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्यां ची उधळण करत स्वागत करण्यात आले.
यानंतर कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाच्या आदरणीय प्रभारी मुख्याध्यापिका सौ उर्मिला पाटील यांनी विद्यालयातील विविध उपक्रम, स्पर्धा परीक्षा, एस एस सी बोर्ड परीक्षेचा उत्तुंग निकाल शालेय शिस्त या विषयीची माहिती देत विद्यार्थिनींनी सर्व उपक्रम, स्पर्धा परीक्षा यांत सहभागी होऊन एक संस्कारक्षम व्यक्तिमत्त्व घडविण्याच्या प्रयत्न करावा व आपल्या यशातून शाळा देखील गौरवशाली बनविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले.
यानंतर नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना विद्यालयाच्या आदरणीय प्रभारी मुख्याध्यापिका उर्मिला पाटील व सर्व अध्यापक वृंद यांचे हस्ते पेन व पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व अध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले. व कार्यक्रम संपन्न झाला.