राज्यस्तरीय दौऱ्यातून विविध जिल्ह्यातील कामगारांकडून प्रश्नांची जाण होते – काशिनाथ नखाते
वाशिम व अकोला जिल्हा दौऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असंघटित कामगार विभाग व कष्टकरी संघर्ष महासंघकडून आयोजन
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्यातील कामगारांचे विभागवार अनेक प्रश्न आहेत मात्र त्यातही विविध जिल्ह्यांमध्ये विविध प्रकारच्या समस्या आहेत, कष्टकरी कामगारांना भेटूनच त्यांच्याशी समजून घेतल्यानंतर अनेक प्रश्नांची उकल होते जाण येते आणि लढाईसाठी एक वेगळी प्रेरणा मिळते असे मत राष्ट्रवादी या असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार,नॅशनलिस्ट ट्रेड फेडरेशन, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे १५ व १६ जून रोजी वाशिम जिल्हा व अकोला जिल्हा येथे कष्टकरी कामगार संवाद दौरा आयोजित करण्यात आला.
यावेळी कष्टकरी कामगारांनी त्यांचे हार्दिक स्वागत केले. आणि आपले मत व्यक्त केले.
त्यावेळी प्रदेश सचिव तुषार घाटूळे,वाशिम जिल्हा अध्यक्ष रवी जाधव, अकोला जिल्हा निमंत्रक विनोद गवई,अनिल गोरे,विशाल पाटील,विष्णू राठोड, गणेश धोटे,राजेश गवई अनिल जाधव आदीसह कामगार बांधव उपस्थित होते.
वाशीम आणि अकोला जिल्ह्यातील कामगारांना रोजगाराच्या संधीची कमतरता असल्याने पाहिजे तसे राबवून घेतले जात असून वाढती महागाई आणि सरकारी योजनांची अपुरी अंमलबजावणी यामुळे येथील कामगारांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
शासकीय नोंदणी अत्यंत कमी असून शासनाचे आणि संबंधित जिल्हा कामगार आयुक्त यांचे याकडे दुर्लक्ष झालेले आहे सदर जिल्ह्यामध्ये किमान व समान वेतनही मिळत नाही त्यामुळे कामगारांचे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अंगमेहनतीचे काम करून घेऊन सुद्धा कामाचा मोबदला देण्यास वारंवार टाळाटाळ केली जात आहे ही व्यवस्था बदलण्यासाठी कामगार आयुक्तांची जबाबदारी महत्त्वाची आहे मात्र ते याकडे दुर्लक्ष करत आहेत तुम्ही दिलेली माहिती नक्कीच महत्वाची आहे म्हणून सर्व असंघटीत कामगाराकडून शासनाकडे पत्राद्वारे त्वरित मागणी करण्यात येणार आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल, कामगार सेल प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे यांचे उपस्थितीत मुंबईत लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.