Author: maharashtrabreakingnews.com

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  चिंचवड येथील कमला शिक्षण संस्थेच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेज च्या ११ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून ‘गौरव गुणवंतांचा….सोहळा आनंदाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने डॉ.ज्योती परीहार-सोळंकी, संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका व प्रतिभा ज्युनियर महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे, प्रतिभा कॉलेज ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर सायन्स चे प्राचार्य डॉ. अरुणकुमार वाळूंज, समन्वयिका डॉ.जयश्री मुळे, प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम, समन्वयिका डॉ. सुवर्णा गायकवाड आदी उपस्थित होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. वृषाली…

Read More

पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दळवीनगर आणि भाेसरी अशा दाेन ठिकाणी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागामार्फत इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. या दाेन्ही शाळेत क्षमतेपेक्षा म्हणजे तब्बल 1200 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षकांची संख्या अतिशय कमी आहे. अपु-या शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांची माेठी गैरसाेय हाेत असून या दाेन्ही शाळांमध्ये तत्काळ मानधनावर शिक्षकांची नेमणूक करावी, अशी आगृही मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे पिंपरी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष विशाल बाळासाहेब काळभाेर यांनी केली आहे. याबाबत विशाल काळभाेर यांनी महापालिकेचे प्रभारी आयुक्त राहूल महिवाल, शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त विजयकुमार थाेरात यांना निवेदन दिले आहे. त्या निवेदनात क काळभोर यांनी म्हटले आहे…

Read More

– लक्ष्मीनारायण सोसायटीसह परिसरातील नागरिकांना दिलासा – भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने ‘मार्ग निघाला’ पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वेगाने विकसित होणाऱ्या चऱ्होली येथील लक्ष्मीनारायण सोसायटी परिसराची आता ‘वाहतूक कोंडीमुक्त’ होणार आहे. श्री. साई मंदिर आणि परिसरातील वाहतूक नियंत्रण आणि उपाययोजना याबाबत महापालिका, वाहतूक पोलीस, आरटीओ आणि मंदिर व्यवस्थापनाने एकत्रित पुढाकार घेतला आहे. त्यामुळे पुणे-आळंदी रस्त्यावरील साई मंदिर येथे होणाऱ्या ट्रॅफिक समस्येवरती उपाय आणि लक्ष्मीनारायण सोसायटीतील व परिसरातील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. आळंदी रोडवरील लक्ष्मीनारायण सोसायाटी व परिसरात सुमारे १० हजाराहून अधिक लोकवस्ती आहे. श्रीक्षेत्र आळंदी, औद्योगिक पट्टा चाकण, पुणे व पिंपरी-चिंचवडच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या याठिकाणी…

Read More

च-होली (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- समाजात वावरताना रस्त्याच्या कडेला वा इतरत्र ढिगाने कचरा दिसतो व अस्वच्छता दिसते. तसेच त्यामुळे आलेला बकालपणा अनुभवत असताना एका शिक्षकाला आपण यासाठी काही करावे असे मनोमन वाटू लागते. व त्याची धडपड चालू होते. पालिकेत जाऊन कचऱ्या संबंधी  अधिकाऱ्यांना भेटून  माहिती देणे व तसेच कचऱ्या  बाबतचा अभ्यास करणे त्यानंतर स्वतः त्याबाबत शाळा तसेच समाजात प्रबोधन करणे, जन-जागृती करणे, राजकीय व्यक्तींना भेटून चर्चा करणे वगैरे गोष्टीचा पाठपुरावा चालू होतो. सर्वच लोकांना विश्वासात घेऊन  अंतमूर्ख  करुन स्वत: हातात झाडू घेऊन आपल्या कामाला लागतो व सर्वांनाही सोबत घेऊन भोवतालच्या अस्वच्छ असलेल्या परिसरावर मात करतो ही या  ट्रॅश लघुपटाची कथा आहे.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. या निवडणुकीस काही महिने बाकी असतानाच राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीत वादळाची स्थिती निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुक ही अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या मतदार संघावर रस्सीखेच सुरू असल्याचं बघायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीचे बिगुल काही महिन्यात वाजणार आहे. त्या अगोदरच आमदारकीसाठी भाजपचे अनेक जण रिगणात आहे. चिंचवडमध्ये भाजपचे वर्चस्व मानणारा वर्ग आहे. चिंचवड विधानसभा सभेसाठी शंकर जगताप यांनी दावेदारी मागितली आहे. शंकर जगताप यांनी मागील काही महिन्यांपूर्वी धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारांशी जोडले गेले. तसेच श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी चिंचवड मधून…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुरणवस्ती येथे असंघटित कामगार विविध कंपन्यांमध्ये हमालीचे काम करणारे कामगार, भारतभर कंपन्यानी उत्पादित केलेल्या गाड्या व सुट्टे भाग घेऊन जाणारे वाहन चालक तसेच वाड्या वस्तीवरील रोजंदारीवर काम करणारे गोरगरीब कामगार यांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला यामध्ये जवळपास 150 नागरिकांनी फायदा घेतला यामध्ये शुगर, बीपी, हाडाची ठिसूळता, रक्तवाहिन्यातील चरबीचे प्रमाण, डोळे तपासणी बरोबर आपल्याला कोणता भविष्यात आजार होऊ शकतो त्यानुसार अदाज काढून डॉक्टरांनी त्यावरील उपचार व सल्ला देऊन, आहार कोणता घ्यायचा व घ्यावयाची काळजी याची माहिती शिबीरात दिल्याचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड  यांनी सांगितले . उपस्थित असलेल्या निघोजे गावच्या सरपंच सौ सुनीता येळवंडे म्हणाल्या की गावाच्या…

Read More

रॅकेटमध्ये व्यापाऱ्यांबरोबर जीएसटी अधिकाऱ्यांचा देखील समावेश जीएसटी विभागाची कार्यपद्धती संशयास्पद पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  व्यापारी आणि जीएसटी विभागातील अधिकारी यांची भ्रष्ट युती झाली असून संगणमताने यांनी कोट्यावधी रुपयांच्या महसुलावर डल्ला मारला आहे. यामध्ये नुकसान झालेल्या ग्राहक व व्यापाऱ्यांना दिलासा देणे ऐवजी कोट्यावधीचा  महसूल स्वतःच्या घशात घालण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीचे शहर उपाध्यक्ष गोपाल कचवे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.     यावेळी पिंपरी चिंचवड परिवर्तन वाहतूक विकास आघाडीचे अमित मोहिते, झोपडपट्टी सेलचे शहर अध्यक्ष सागर जाधव, सामुहिक गुंडगिरी, दहशतवाद तंटा भ्रष्टाचार विरोधी संघटनेचे  विशाल मिठे आदि उपस्थित होते.    चिखली, कुदळवाडी येथील काही…

Read More

पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  अनेक निवडणुकांमधील सततच्या पराभवांनंतर लोकसभा निवडणुकीत दिसलेला आशेचा एक किरण कॉंग्रेसमधील सरंजामशाहीला नवसंजीवनी देणारा ठरला असून, गांधी घराण्यातील नेतापूजनाची परंपरा पटोले पूजनापर्यंत पोहोचल्याचे आता पहावयास मिळत आहे. पराजयातही विजयाच्या उन्मादाने उन्मत्त झालेले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चक्क कार्यकर्त्याकरवी पाद्यपूजा करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळीमा फासणारा असून याचे जाहीर प्रदर्शन करणाऱ्या नाना पटोलेंनी ताबडतोब पदाचा राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घ्यावा, अशी मागणी भाजपाचे पिंपरी ‍चिंचवड शहर ( जिल्हा) अध्यक्ष शंकर जगताप यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. देशाच्या राजकारणात कॉंग्रेसने व्यक्तिपूजेची परंपरा सुरू केली. गांधी घराण्याचे हुजरे यामध्ये आघाडीवर राहिले. याच…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) — पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात “21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन” साजरा करण्यात येत आहे. २१ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे श्रीनगर येथे स्वतः योग शिबीरात उपस्थित राहणार असून, देश-विदेशातील करोडो जनतेस स्वस्थ जीवन जगण्याची प्रेरणा व संदेश देणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमीत्ताने पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) भाजपातर्फे शहरात ठिकठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी विविध शिबीरांमध्ये सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचे आवाहन संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी केले आहे.         आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यासह, २३ जून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान दिन ते ६ जुलै जन्मदिनानिमीत्त…

Read More

मंत्रिपदासाठी शहरातून मोर्चे बांधणी पिंपरी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आमदार अण्णा बनसोडे यांना मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये स्थान मिळावे यासाठी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी अजितदादा गट पक्षाच्या शहराध्यक्ष अजित गव्हाणे व विविध सेलच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे जोरदार मागणी केली आहे. राज्यस्तरावर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असताना आमदार अण्णा बनसोडे यांचे नाव मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आघाडीवर असून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खात्री आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या ७० वर्षाचा अनुशेष बनसोडे यांच्या मंत्रीपदामुळे भरून निघेल असा विश्वास पक्षाचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला. अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून राज्यभर…

Read More