ताज्या घडामोडीमनोरंजन
‘कचरा’ याविषयावर आधारित जनजागृती करणारा’ ट्रॅश’लघुचित्रपटाची निर्मिती
च-होली (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- समाजात वावरताना रस्त्याच्या कडेला वा इतरत्र ढिगाने कचरा दिसतो व अस्वच्छता दिसते. तसेच त्यामुळे आलेला बकालपणा अनुभवत असताना एका शिक्षकाला आपण यासाठी काही करावे असे मनोमन वाटू लागते. व त्याची धडपड चालू होते. पालिकेत जाऊन कचऱ्या संबंधी अधिकाऱ्यांना भेटून माहिती देणे व तसेच कचऱ्या बाबतचा अभ्यास करणे त्यानंतर
स्वतः त्याबाबत शाळा तसेच समाजात प्रबोधन करणे, जन-जागृती करणे, राजकीय व्यक्तींना भेटून चर्चा करणे वगैरे गोष्टीचा पाठपुरावा चालू होतो. सर्वच लोकांना विश्वासात घेऊन अंतमूर्ख करुन स्वत: हातात झाडू घेऊन आपल्या कामाला लागतो व सर्वांनाही सोबत घेऊन भोवतालच्या अस्वच्छ असलेल्या परिसरावर मात करतो ही या ट्रॅश लघुपटाची कथा आहे.
या लघुपटात सुमारे 35-40 कलाकारांनी उत्साहाने
सहभाग घेत असून यात पालिकेच्या कर्मचान्यांचेही प्रामुख्याने सहकार्य लाभले आहे. सदरील ट्रॅश ‘ लघुचित्रपट प्रबोधन म्हणून विविध विदयालयांत, खाजगी सामाजिक संस्था व इतरत्र प्रदर्शित करण्याचा विचार आहे.
या लघुचित्रपटात प्रामुख्याने अरुण काळे, सतिश पवार, नितिन कांबळे, सयाजी ठाकुर, एम. भरतराज, दिपाली पाटील, दिलीप पाटील,मनिषा जुन्नरकर, अशोक पालवे या कलकारांनी कामे केलेली आहेत.
निर्मिती अरुण काळे, नितीन कांबळे, अनिल बेन्द्रे यांचे असुन दिग्दर्शन अरुण काळे यांचे आहे. संकलन प्रशांत गायकवाड, संगीत केदार परमेश्वर, यांचे आहेत.
यामध्ये’ यंदा कर्तव्ये आहे. हे गीत असून हे गीत
आश्विनी कुमावत यांनी यांचे असून गौरी पाटील यांनी
ते गायलेले आहे. सदर लघुचित्रपटाचे नुकतेच पोस्टरचे अनावरण झाले असून काही दिवसांत हा लघुविनपट प्रदर्शित होईल.