शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आलेली संधी सोडू नका – डॉ.ज्योती परिहार-सोळंकी
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील कमला शिक्षण संस्थेच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेज च्या ११ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून ‘गौरव गुणवंतांचा….सोहळा आनंदाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने डॉ.ज्योती परीहार-सोळंकी, संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका व प्रतिभा ज्युनियर महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे, प्रतिभा कॉलेज ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर सायन्स चे प्राचार्य डॉ. अरुणकुमार वाळूंज, समन्वयिका डॉ.जयश्री मुळे, प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम, समन्वयिका डॉ. सुवर्णा गायकवाड आदी उपस्थित होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. वृषाली वाघमारे व प्राध्यापक सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात १२ वी मध्ये विज्ञान, वाणिज्य व कला शाखेच्या उत्कृष्ट गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सह.शिक्षण संचालक डॉ.ज्योती परीहार-सोळंकी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाल्या, अपयशाला न घाबरता जीवनात आलेली शैक्षणिक संधी कधीही सोडू नका, चुका झाल्यातरी प्रयत्नांची पराकाष्ठा करत रहा, यश तुमच्या हातात आहे हे सांगताना त्यांनी आपल्या आयुष्यातील खडतर प्रसंगातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर कथन केले.
संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांनीही आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर इतर कला, कौशल्य ही आत्मसात करावी, असे सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
डॉ. वनिता कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. वृषाली वाघमारे व प्राध्यापक सहकारी यांच्या सहकार्याने पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्तविक उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. जास्मीन फरास यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रवींद्र निरगुडे व प्रा. सुकन्या बॅनर्जी यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. सुनीता पटनाईक यांनी केले.