- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – इंद्रायणी नगर येथील श्री टागोर शिक्षण संस्थेचे श्री टागोर माध्यमिक विद्यालय, लालबहादूर शास्त्री प्राथमिक विद्यामंदिर आणि श्री स्वामी समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये आज 21 जून शासनाच्या आदेशानुसार योगा दीन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेतील शिक्षक राजू पवार यांनी सर्व विद्यार्थ्यांना योगा प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आले. यावेळी योगाचे महत्त्व, फायदे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले यामध्ये विद्यालयातील मुख्याध्यापक श्री हनुमंत आगे ,उद्धव ढोले, मनीषा गुरव आणि संतोष काळे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल बुळे यांनी केले तर आभार शरद तोरणे यांनी केले.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बस मोफत पास संदर्भातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान करणारा महापालिकेचा नवीन आध्यादेश त्वरित रद्द करा, अशी मागणी नाना काटे यांनी आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहर महापालिका हद्दीतील ५ वी ते १० वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या शालेय विद्यार्थीना सन २००५ शिक्षण हक्क कायद्यानुसार गरजू व होतकरू विध्यार्थी यांना महानगरपालिका हद्दी बाहेरील शाळेमध्ये जाण्यासाठी बस प्रवास करताना मोफत पासची सवलत मिळत होती. परंतु आपल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने दि. १०/०६/२०२४ रोजी पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील रहिवासी व महानगरपालिका हद्दीत शिक्षण घेत…
स्वभाव आणि आवडी निवडीनुसार करिअरची निवड करा – प्रा. विजयकुमार नवले पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – करियर म्हणजे भावी जीवन कसे जगायचे याची निवड करण्याचा मार्ग आहे. तुम्हाला जे आवडतं आणि जे करायला जमतं त्यात करिअर करण्याचा विचार करा, आपल्या स्वभाव आणि आवडी निवडीनुसार करिअरची निवड करून नियोजनबद्ध अभ्यास केल्यास नक्की यश प्राप्त होते असे मार्गदर्शन करिअर मार्गदर्शक प्रा. विजयकुमार नवले यांनी केले. आकुर्डी येथील श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) या संस्थांच्या वतीने आकुर्डी, निगडी परिसरातील दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र, स्मृतिचन्ह देऊन गौरव करण्यात आला. दर्शन प्रकाश भागवत या विद्यार्थ्याला पैकीच्या पैकी…
अतिक्रमण पथकाकडून झालेल्या मारहाणीचा फेरीवाल्यांनी केला निषेध पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाकडून व एमएसएफ जावानाकडून दापोडी येथे भाजीविक्रेत्या रेश्मा कांबळे यांना अमानुष मारहाण करण्यात आली, याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करत त्यांचा व्यवसाय व त्यांची कायदेशीर लढाई लढण्यासाठी शहरातील सर्व फेरीवाल्यांचा समर्थन राहील असा विश्वास कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज घटनास्थळी जाऊन मारहाण झालेल्या महिलेची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली.यावेळीकार्याध्यक्ष इरफान चौधरी,ज्ञानेश्वर शेळके ,रॉबिन गजभिव, दीपक साळवे,संदेश बोर्डे,रवींद्र कांबळे, हनुमंत कसबे, जगन्नाथ काटे,ओमप्रकाश मोरया, अंबालाल सुखवाल, मनोज यादव,गौतम कांबळे,मुकेश सूर्यवंशी, दत्ता चौधरी,शिवाजी कांबळे,सिकंदर सूर्यवंशी,अर्चना कुटे आदी उपस्थित होते. फेरीवाला…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयटीआय मोरवाडी व आयटीआय मुलींची कासारवाडी येथे विविध प्रकारचे इंजीनियरिंग, नॉन-इंजिनिअरिंग व्यवसाय उपलब्ध असून उमेदवारांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. महानगरपालिकेमार्फत किमान प्रशिक्षण शुल्क आकारून विद्यार्थ्यांना तांत्रिक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येते व रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून देण्यात येतात. संस्थेचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात रोजगार करत आहेत तसेच काही विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केलेले असून संस्थेचे कार्य यशस्वीपणे सुरू आहे यावर्षी, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया २०२४ अंतर्गत ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा दोन्ही संस्थांमध्ये निशुल्क उपलब्ध करून देण्यात आलेली असून फॉर्म भरणे व कन्फर्म करण्याची अंतिम तारीख ३० जून आहे, तरी प्रवेशउत्सुक उमेदवारांनी याबाबत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी महापालिका सज्ज असून पालखी मार्गावर, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती आयुक्त राहुल महिवाल यांनी दिली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे आगमन येत्या काही दिवसांत पिंपरी चिंचवड शहरात होणार आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळा स्वागत कक्ष आणि मुक्कामाच्या स्थळाची तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्ग, विसाव्याचे ठिकाण तसेच महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणा-या स्वागत कक्षाच्या ठिकाणाची पाहणी आयुक्त राहुल महिवाल यांनी केली. या पाहणी दौऱ्यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सह शहर अभियंता ज्ञानदेव…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध असली तरी क्रिडा, सांस्कृतिक, तंत्रज्ञान यांसारख्या विविध उपक्रमांतूनही शहराची वेगळी ओळख निर्माण होताना दिसून येते असे सांगून सुरज मुंढे यांच्या सायकलिंग क्षेत्रातील उत्तुंग भरारीमुळे पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकीकात भर पडली आहे तसेच त्यांच्यासारख्या अष्टपैलू खेळाडूचा सार्थ अभिमान वाटत असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी व्यक्त केले. भारतातील सर्वात खडतर मानली जाणारी दर ४ वर्षांनी होणारी गेट्स ऑफ हेवन या १ हजार २०० किलोमीटर सायकल स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहरातील रहिवासी सुरज मुंढे या सायकलपटूने स्पर्धेत सहभाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावला.आज त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात मटन, चिकन, मासे व मासळी विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात यावीत, अशी मागणी शिवसेनेचे संतोष सौंदणकर यांनी महापालिका आयुक्त राहुल महिवाल यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्या २८ जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. शनिवारी (दि. २९) रोजी पालखी सोहळा पिंपरी चिंचवड शहरात दाखल होणार आहे. आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात तो शनिवारी मुक्कामी असणार आहे. तर, दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुढे मार्गस्थ होईल. एक दिवस शहरात पालखी मुक्कामी असल्याने तीचे पावित्र्य जपले पाहिजे. शिवाय लाखो वारकरी, भक्त,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरातील विविध भागात १३ ठिकाणी योगा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, २१ जून रोजी सकाळी ६.३० वाजता शहरातील विविध बॅडमिंटन हॉल येथे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून योग दिन उत्साहात साजरा करावा, असे आवाहन आयुक्त राहुल महिवाल यांनी केले आहे. २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगभर साजरा करण्यात येतो. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध भागात क्षेत्रीय कार्यालयनिहाय योगा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये “अ” क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात निगडी प्राधिकरण येथे मदनलाल धिंग्रा मैदान बॅडमिंटन हॉल आणि नेताजी सुभाषचंद्र बोस बॅडमिंटन कोर्ट येथे योगा कार्यक्रमाचे अयोजन…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या इंद्रायणीनगर, भोसरी येथील पी. सी. एम. सी. पब्लिक स्कूलच्या श्री वैष्णोमाता प्राथमिक विद्यामंदिर येथे मंगळवार, दिनांक १८ जून २०२४ रोजी शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांच्या हस्ते विधिवत औक्षण करून तसेच खाऊ भरवून ढोल – लेजीमच्या गजरात चिमुकल्या विद्यार्थ्यांचे दणदणीत स्वागत करण्यात आले. पिंपरी विभाग समन्वयक संतोष जाधव, पर्यवेक्षिका सुनंदा मगर, माजी नगरसेवक राजेंद्र लांडगे, रवी लांडगे, माजी नगरसेविका नम्रता लोंढे, सामाजिक कार्यकर्ते योगेश लोंढे, शाला व्यवस्थापन समिती अध्यक्ष पवित्रा भद्रशेट्टी, मुख्याध्यापिका वंदना इन्नाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नूतनीकरण करण्यात आलेल्या बाला वर्ग खोल्या, स्वतंत्र संगणक…
