बस मोफत पासच्या संदर्भातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान करणारा महापालिकेचा नवीन आध्यादेश त्वरित रद्द करा – नाना काटे
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बस मोफत पास संदर्भातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान करणारा महापालिकेचा नवीन आध्यादेश त्वरित रद्द करा, अशी मागणी नाना काटे यांनी आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहर महापालिका हद्दीतील ५ वी ते १० वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या शालेय विद्यार्थीना सन २००५ शिक्षण हक्क कायद्यानुसार गरजू व होतकरू विध्यार्थी यांना महानगरपालिका हद्दी बाहेरील शाळेमध्ये जाण्यासाठी बस प्रवास करताना मोफत पासची सवलत मिळत होती. परंतु आपल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने दि. १०/०६/२०२४ रोजी पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील रहिवासी व महानगरपालिका हद्दीत शिक्षण घेत असलेल्या ५ ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थीनाच मोफत बस पासच्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे असा आदेश काढलेला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातही चांगल्या उत्तम दर्जाचा शाळा व महाविद्यालये आहेत. परंतु महापालिका हद्दी बाहेर अनेक नामांकित व शासकीय शाळा, महाविद्यालये असून तिथे शिक्षण घेण्यास शहरातील अनेक गरजू व होतकरू विध्यार्थी जातात. त्यामुळे केवळ शिक्षणास प्राधान्य द्यावे. चांगले शिक्षण घेवून अनेक विद्यार्थी आपले उज्वल भविष्य घडवणार आहेत. विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवला तर आपल्याच पिंपरी चिंचवड शहराचे नाव देखील एका उंचीवर घेवून जातील.
त्यामुळे पालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या त्या आदेशाने अनेक गरजू व होतकरू विध्यार्थांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होणार आहे. यासाठी पूर्वीचा आदेश कायम ठेवत विद्यार्थीचा आर्थिक व शैक्षणिक नुकसान करणारा महापालिकेचा नवीन आध्यादेश त्वरित रद्द करणेबाबत योग्य विचार करावा, असे ही निवेदनात म्हटले आहे.