- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डेंग्यू,मलेरिया,टायफड सारखे आजार पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात पसरत आहे. महानगरपालिका शाळेत आरोग्य तपासणी शिबीर राबविण्यात यावे, अशी मागणी दिनेश यादव यांनी शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांच्याकडे लेखी निवेदनाने केली आहे. प्रत्येक शाळेत आरोग्य तपासणी शिबीर तसेच सर्व शाळेत मधे धूर फवारणी आणि औषध छिडकाव व डेंग्यू,मलेरिया,टायफड ची तपासणी शाळेत जाऊन मोठ्या प्रमाणात सुरू करावी. टायफड हा संसर्गजन्य रोग आहे अनेक जणांना या रोगाची लागण होत आहेत हजारो विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत आहेत त्यांना बाधा होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात यावी, असे ही निवेदनात म्हटले आहे.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दोन दिवसात पंढरपूर पायी पालखी सोहळ्याचे प्रस्थान होत आहे.या पालखी सोहळ्यास मोठ्या प्रमानात वारकरी, भाविक पायी वारी करीत असतात. वारकरी,भाविकांचे आरोग्य योग्य राहावे यासाठी मधुकर बच्चे युवा मंच,चैतन्य ग्रुप व वूई टुगेदर फौंडशेन यांच्या पुढाकाराणे लोकसहभागातून मोठ्या प्रमानात औषधे दिली जातात.यावर्षी सुद्धा या वारीतील वारकरी व भाविकासाठी मोठ्या प्रमाणात औषधे देण्यात आली. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने गेली 30 वर्षे या दिंडी सोहळ्यात पूर्ण वेळ आरोग्य सेवा देत आहे.अनेक डॉ. नर्स,ऍम्ब्युलन्स, स्वयंसेवक,कार्यकर्ते पूर्णवेळ आरोग्य सेवा देतात . मधुकर बच्चे युवा मंच,चैतन्य ग्रुप,व वूई टुगेदर फौंडेशन च्या वतीने गेली 15 वर्षे विश्व हिंदू परिषेधेकडे सर्व औषधे सुपूर्द…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य हे संतांची भूमी असून वारीची मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहर हे जगदगुरु संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माउली तसेच श्री मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. आषाढी वारी काळात संपूर्ण शहर वारीमय होऊन जाते. यंदा यावेळी आषाढी वारी दि. २८ जून २०२४ रोजी प्रस्थान करणार आहे. आषाढी वारी या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने ३३९ व्या आषाढी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने दि. २७ जून २०२४ रोजी ग.दि. माडगुळकर नाट्यगृह, प्राधिकरण निगडी येथे पिंपरी चिंचवड शहर व परिसरातील दिंडी प्रमुख व भजनी मंडळ यांचा…
काँग्रेसने देशात आणीबाणी लादून भारतीय संविधानावरच प्रहार केला – डॉ. सतीश बोरकर पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वातंत्र्यानंतर अवघ्या 28 वर्षांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निर्णयामुळे देशाला आणीबाणीच्या झळा सोसाव्या लागल्या होत्या. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिलेल्या संविधानाला पायदळी तुडवित देशात इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली. भारतीय संविधानावरच मोठा प्रहार हा २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू करून करण्यात आला. हा निर्णय देशातील व्यक्तीस्वातंत्र्यावर एक मोठा आघात होता. या घटनेच्या कटू आठवणी स्मरणात ठेवून भारतीय जनता पार्टीतर्फे चापेकर चौक चिंचवड गाव येथे ‘आणीबाणी एक काळा दिवस’ हे प्रबोधनात्मक अभियान राबविण्यात आले. काँग्रेसकडून समाजामध्ये जे मनभेद…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने सुरु असलेली अंतिम टप्प्यातील कामे प्रगतीपथावर असून आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त येणाऱ्या भाविकांना सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी व्यक्त केले. आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पिंपरी चिंचवड शहरातून जाणार आहे. या पालखी मार्गाची पाहणी आज अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केली,त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, बाबासाहेब गलबले, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, उप आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी…
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येथील माउलीचे आषाढ वारीसाठी श्रींचे मंदिरातून २९ जूनला प्रस्थान होत आहे. यासाठी महिना भराची प्रवासातील आवश्यक साहित्य, किराणा,:मानपान, श्रींचे वैभवी पालखी सोहळ्यातील वैभवी लवाजमा साहित्याची जमवा जमव अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती सेवक व्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांनी दिली. आळंदी देवस्थानच्या जुन्या भक्त निवासाचे जागेतील श्रींची कोठी लहान मोठ्या सुमारे हजारावर वस्तू साहित्याने भरवलेली आहे. गेल्या महिना भरापासून यासाठी तयारी सुरु असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. या साहित्यात सुई दोऱ्या पासून श्रींचे पूजा साहित्य, श्रींचे महाप्रसाद नैवेद्यासह भाविक, मानकरी यांचे सोहळ्या तील भोजन व्यवस्थेतील किराणा, वाहतूक व्यवस्था, बैठक व्यवस्था, श्रींचा वैभवी तंबू ,श्रीचे पोशाख, पूजा…
महाविद्यालयाकरिता विविध संवर्गातील २४ पदे निर्माण करणार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात बीएससी नर्सिंग महाविद्यालय आणि पॅरामेडिकल कोर्सेस सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने तत्वत: मंजूरी दिली आहे. यामुळे आता महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णसेवाकरिता कार्यरत नर्सिंग व इतर विभागाच्या कामकाजामध्ये मदत होणार असून पिंपरी चिंचवड शहरातील आणि शहराबाहेरील विद्यार्थ्यांना अल्प दरात नर्सिंग शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच या नर्सिंग महाविद्यालयासाठी विविध संवर्गातील २४ पदांची निर्मितीही करण्यात येणार आहे. शहरातील वैद्यकीय सुविधा आणखी बळकट करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्याचा महापालिकेचा…
दापोडी ,फुगेवाडी कासारवाडी परिसरातील १०वी व १२वी तील २२४ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कलारंग संस्था व अमित गोरखे युथ फाऊंडेशनचा उपक्रम पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “पिं. चिं. मधील एक साधा काकडी विक्रेता ते नॉवेल ग्रुप ऑफ़ इन्स्टिट्यूटचा संस्थापक अध्यक्ष हा प्रवास खडतर होता. माझ्या मनातील शिक्षणाची प्रबळ इच्छा व ध्येय निश्चित केल्यानेच यशाच्या शिखरा पर्यंत पोहचू शकलो. आपल्या यशस्वी होण्यात शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी आणि आई – वडिलांनी आपल्या मुलांसाठी प्रचंड परिश्रम घेतलेले असतात. हे विद्यार्थ्यांनी नक्किच लक्षात घावे. स्पर्धेचे जग असल्याने शिक्षणाच्या स्पर्धेत मुलांनी एकमेकांविषयी द्वेष न ठेवता स्पर्धा करावी. कोणाला कमी लेखू नये.” असे मत नॉवेल ग्रुप ऑफ़…
पालखी प्रस्थानाच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची मागणी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शुक्रवार दि. 28 जून रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज व शनिवार दि. 29 जून रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान अनुक्रमे देहू व आळंदी येथून होणार आहे, त्यासाठी लाखो वारकरी भाविक भक्त पिंपरी चिंचवड शहरात दाखल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर इंद्रायणी नदीचे पाणी अत्यंत दूषित असून त्यात स्नान केल्यास वारकरी बांधवांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी येत्या दोन दिवसात इंद्रायणी नदीचे पाणी वापरण्यायोग्य करा अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा दिला आहे. राज्याचे मुखमंत्री…
– पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारचे लक्ष वेधणार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – इंद्रायणी नदी प्रदूषण आणि पुनरूज्जीवन हा पिंपरी-चिंचवडसह सभोवतालच्या परिसरासाठी अत्यंत कळीचा मुद्दा बनला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नदी सुधार प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू असून, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नदीकाठाच्या पुनरूज्जीवनाचे काम प्रगतीथावर आहे. मात्र, महापालिका, पाटबंधारे विभाग, पीएमआरडीए, एमआयडीसी, लोणावळा नगरपरिषद, देहू नगरपरिषद आणि आळंदी नगरपरिषद यास पुणे जिल्हा प्रशासन अशा सर्व शासकीय अस्थापनांच्या माध्यमातून ‘कॉमन ॲक्शन प्लॅन’ हाती घेवून त्याची प्रभावी अंमलबजावणी केल्याशिवाय नदी प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्त होणार नाही, अशी भूमिका भाजपा आमदार महेश लांडगे यांनी घेतली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून इंद्रायणी व पवना अशा दोन नद्या वाहतात. शहराची लोकसंख्या सुमारे…
