ताज्या घडामोडीपिंपरी
महानगरपालिका शाळेत आरोग्य तपासणी शिबीर राबविण्यात यावी – दिनेश यादव
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डेंग्यू,मलेरिया,टायफड सारखे आजार पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात पसरत आहे. महानगरपालिका शाळेत आरोग्य तपासणी शिबीर राबविण्यात यावे, अशी मागणी दिनेश यादव यांनी शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांच्याकडे लेखी निवेदनाने केली आहे.
प्रत्येक शाळेत आरोग्य तपासणी शिबीर तसेच सर्व शाळेत मधे धूर फवारणी आणि औषध छिडकाव व डेंग्यू,मलेरिया,टायफड ची तपासणी शाळेत जाऊन मोठ्या प्रमाणात सुरू करावी.
टायफड हा संसर्गजन्य रोग आहे अनेक जणांना या रोगाची लागण होत आहेत हजारो विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत आहेत त्यांना बाधा होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात यावी, असे ही निवेदनात म्हटले आहे.