संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास कोठी सजली :- सरनाईक
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येथील माउलीचे आषाढ वारीसाठी श्रींचे मंदिरातून २९ जूनला प्रस्थान होत आहे. यासाठी महिना भराची प्रवासातील आवश्यक साहित्य, किराणा,:मानपान, श्रींचे वैभवी पालखी सोहळ्यातील वैभवी लवाजमा साहित्याची जमवा जमव अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती सेवक व्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांनी दिली.
आळंदी देवस्थानच्या जुन्या भक्त निवासाचे जागेतील श्रींची कोठी लहान मोठ्या सुमारे हजारावर वस्तू साहित्याने भरवलेली आहे. गेल्या महिना भरापासून यासाठी तयारी सुरु असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
या साहित्यात सुई दोऱ्या पासून श्रींचे पूजा साहित्य, श्रींचे महाप्रसाद नैवेद्यासह भाविक, मानकरी यांचे सोहळ्या तील भोजन व्यवस्थेतील किराणा, वाहतूक व्यवस्था, बैठक व्यवस्था, श्रींचा वैभवी तंबू ,श्रीचे पोशाख, पूजा साहित्य, विद्युत व्यवस्थेचे साहित्य, सोहळ्याचे कर्ण्यापासून ते संपर्काच्या अत्याधुनिक साहित्या पर्यंत सर्व प्रकारची चीज वस्तू जिन्नस मसाल्याचे पदार्थ, मानक-याचे मानपान साहित्य अशा विविध साहित्याने श्रींची कोठी सजली आहे. यासाठी आळंदी देवस्थानच्या प्रथा परंपरांचे पालन करीत कामकाज करण्यात आले आहे. आळंदीतून पंढरीस जाण्यासाठी श्रीचे मंदिरात सर्वत्र लगबग सुरू आहे. यातीलच एक भाग म्हणून अनुभवी प्रभारी म्मजी व्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांचे मार्गदर्शन खाली श्रीची कोठी सर्व आवश्यक वस्तुंनी सुसज्ज सजली आहे. प्रवासाची सुरक्षेची साधने, महाप्रसाद किराणा, सोहळ्यातील वैभवी लवाजमा आदींचा समावेश असल्याचे श्रीधर सरनाईक यांनी सांगितले. चांदीच्या रथातूंन श्रीची पालखी पंढरीस जाण्यास नेण्यात येणार आहे. या रथाचे देखभाल आणि दुरुस्तीचे काम झाले आहे. रथास पॉलिश करण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. भक्त निवासाचे जागेत श्रीचा रथ असून येथेच सजविण्यात येणार आहे. आळंदी मंदिरात देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड राजेंद्र उमापं, विश्वस्त योगी निरंजन नाथजी, भावार्थ देखणे, व्यवस्थापक माऊली वीर यांचे मार्गदर्शना खाली श्रीचे पालखी सोहळ्यासाठी तयारी करीत आहे. मंदिरात विद्युत रोषणाईची कामासाठी सुरुवात झाली आहे. दर्शनबारीतील मार्गिकेचे काम अंतिम टप्यात आले आहे. श्रींची कोटी साजल्याने सोहळा समीप आल्याचे दिसते आहे. २९ जून ला प्रस्थान एक दिवसाचा मुक्काम पाहुणचार घेवून सोहळा ३० जून ला भल्या पहाटे पंढरीस जाण्यास पुण्यनगरी कडे मार्गस्थ होईल.