Author: maharashtrabreakingnews.com

– राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नियमावलीत बदलाची मागणी पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवडमधील देहुरोड डेपो, मॅगझीन डेपोपासून घोषित केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात (रेडझोन) मध्ये एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमध्ये सुधारणा करावी. बाधित भूमिपुत्रांना त्यांच्या हक्कांसाठी न्याय मिळावा, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. मुंबई येथे महाराष्ट्र राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणीचे पत्र दिले. त्यावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. आमदार लांडगे यांनी निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगत देहूरोड दारुगोळा भांडार आणि दिघी मॅगझिन डेपोच्या सीमाभिंतीलगत संरक्षण विभागाने ‘रेड झोन’ घोषीत केला आहे. रेड झोन प्रभावित…

Read More

उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांवर व्यक्त केला संताप पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)-इयत्ता बारावीनंतरचे शिक्षण घेण्याचे मुलींचे प्रमाण कमी असल्याने ते वाढवण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींना बारावीनंतरचे शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला. मिंदे सरकारमधील मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात राणा भिमाच्या थाटात महाराष्ट्राच्या समोर येऊन ही वल्गना केली. आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले असताना त्याची अंमलबजावणी करण्याचा सरकारला विसर पडल्याचे दिसते. आश्वासनांची पुर्तता करता येत नसेल तर देता कशाला ? असा संतप्त सवाल शिवसेना (उध्दव ठाकरे) शहर संघटक  संतोष सौंदणकर यांनी राज्य सरकारला केला आहे. यासंदर्भात शिवसेना शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी प्रसिध्दी पत्रक दिले आहे.…

Read More

मुलींच्या मोफत शिक्षणासाठी केलेल्या घोषणेचा पडला विसर म्हणून पोस्टाने पाठवले बदाम पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी  खडसे यांच्या सूचनेनुसार पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने खोटारड्या आणि थापाड्या सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.शिक्षण मंत्री जे घोषणा करतात त्या घोषणेचा त्यांना विसर पडला की काय यासाठी त्यांची स्मरणशक्ती वाढावी म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने त्यांना निवेदन आणि त्यात बदाम पाठवण्यात आला आहे. खरंतर 9 फेब्रुवारी रोजी चंद्रकांत दादा पाटील यांनी जी घोषणा केली होती की ज्या पालकाचे उत्पन्न वार्षिक आठ लाखापेक्षा कमी आहे त्या मुलींना बारावी नंतरचे उच्च शिक्षण मोफत देणार. महाराष्ट्रातील तमाम गरजू…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यात आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पुणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘होल्ड’ कायम आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह ‘पीएमआरडी’च्या अंतर्गत प्रलंबित कामांना गती देण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ केला आहे. त्यामुळे निवडणुकीत मतदारांसमोर ‘डेव्हलपमेंट ॲन्ड डेडिकेशन’ असा अजेंडा ठेवण्यात आला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण च्या आयुक्तपदी राहुल महिवाल यांच्याजागी योगेश म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए ) आयुक्त पदी योगेश म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज (२७ जून) ही नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन…

Read More

गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन पुणे , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ज्ञानोबा माऊली तुकाराम… माऊली माऊली आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनोखी मानवंदना दिली. अश्वांनी मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करुन गणरायाला वंदन केले. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अश्वांचे पूजन करीत श्री गणेश आणि माऊली चरणी प्रार्थना केली. तसेच मंदिरात भाविकांनी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. कर्नाटक बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचे आगमन पुण्यामध्ये झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपळे सौदागर स्थित उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे होतकरू नीट परीक्षार्थी विद्यार्थी कु.समीर महादेव धनवे याला कॉम्प्युटर संच प्रदान करण्यात आला. तसेच शालेय विद्यार्थ्यांना वह्या , पुस्तके , स्कूल शूज यांचे वाटप करण्यात आले. पिंपळे सौदागर येथे राहणारा कु.समीर महादेव धनवे ह्याला इ.१० वी ला ८१% गुण प्राप्त असून , त्याचे शालेय शिक्षण अण्णासाहेब मगर महाविद्यालयातून पूर्ण झाले आहे. सध्या तो , औंध येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिक्षण घेत असून , मेडिकल प्रवेश परीक्षा ‘नीट’ ची तयारी करत आहे. या विद्यार्थ्याला अभ्यासात मदत व्हावी म्हणून , उन्नती सोशल फाऊंडेशन…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी महापालिका उत्सुक असून प्रत्यक्ष पालखी शहरात दाखल झाल्यानंतर ज्या विभागप्रमुखांना जबाबदारी सोपविली आहे त्यांनी ती चोखपणे पार पाडावी. तसेच प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून संपुर्ण कामकाज त्यांच्या नियंत्रणाखाली सर्वांच्या समन्वयाने व्यवस्थित पार पाडण्याच्या सूचना आयुक्त राहूल महिवाल यांनी दिल्या. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने वारकऱ्यांकरिता पुरविण्यात येणा-या विविध सेवासुविधांचे आणि इतर नियोजनाचा आढावा घेण्यासाठी आयुक्त राहुल महिवाल यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत मधुकरराव पवळे सभागृह येथे आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी आयुक्त महिवाल बोलत होते. यावेळी…

Read More

नवी सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कृष्णा चौक ते एम.के चौक नवी सांगवी (प्रभाग ४५ ) हा मुख्य रस्ता स्मार्ट सिटी अंतर्गत येत असल्याने या रस्त्यावरून सर्व वाहतूक जात असून गेले काही दिवसापासून त्या ठिकाणी खोल खड्डे व पाणीसाठा होत असल्याने रस्त्यांची कामे वर्षानुवर्ष रखडलेली होती. मेघराज लोखंडे यांनी ३ दिवसात कृष्णाचौक, क्रांती चौक, एम.के चौक खड्डे मुक्त केले पण म.न.पा (ह) क्षेत्रीय स्थापत्य विभाग यांनी त्या ठिकाणी पॅच मारून रस्त्याचे काम पूर्ण केले परंतु पॅच मारल्याने रस्त्याची पातळी वर खाली झाल्यामुळे वाहतुकीस व स्थानिक दुकानदार दुकानासमोर मोठा खड्डा व पाणी साठा होत असल्यामुळे. याबाबत नागरिकांनी मेघराज लोखंडे (चिंचवड…

Read More

डासांच्या आळ्या आढळळेल्या ५८५ आस्थापनांना नोटीस पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  महापालिकेच्या किटकनाशक आणि औष्णिक धुरीकरण विभागाच्या वतीने १ ते २२ जून २०२४ या कालावधीत केलेल्या तपासणीत शहरातील विविध ठिकाणी डासांच्या अळ्या आढळून आल्याने १४ जणांवर “डास उत्त्पत्ती स्थानांची निर्मिती” या शिर्षकाखाली दंड प्रमाणांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच ५८५ विविध आस्थापनांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या कारवाईमध्ये एकूण ७२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तपासणी पथकाच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी पाहणी करून एकूण १ लाख १ हजार १९५ घरे तसेच २८० बांधकामांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण १ हजार ४५० घरांमध्ये डासांच्या आळ्या आढळल्या. तसेच…

Read More

 पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन शहराध्यक्ष अजित दामोदर गव्हाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे अभ‍िवादन करतांना म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज ही अशी व्यक्ती होती की ज्यांनी राजा असूनही दीन-दलित आणि शोषित वर्गाचे दुःख समजून त्यांच्याशी सदैव जवळीक ठेवली. समाजा-समाजामध्ये जातीभेदाच्या भिंती पाडण्यासाठी शाहू महाराजांनी निरनिराळे प्रयत्न केले. राजर्षी शाहू महाराज स्वतः कोणत्याही प्रकारचा जातीभेद मानत नव्हते. श‍िक्षण, सामाजिक प्रबोधन, सर्वसामान्य माणसांचा विचार करणारा राजा, पुरोगामी विचार जोपासणारा राजा म्हणून राजर्षी शाहू…

Read More