प्रभाग ४५मध्ये स्मार्ट सिटीतील नागरिकांचे प्रश्न घेऊन मेघराज लोखंडे ॲक्शन मोडवर
नवी सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कृष्णा चौक ते एम.के चौक नवी सांगवी (प्रभाग ४५ ) हा मुख्य रस्ता स्मार्ट सिटी अंतर्गत येत असल्याने या रस्त्यावरून सर्व वाहतूक जात असून गेले काही दिवसापासून त्या ठिकाणी खोल खड्डे व पाणीसाठा होत असल्याने रस्त्यांची कामे वर्षानुवर्ष रखडलेली होती. मेघराज लोखंडे यांनी ३ दिवसात कृष्णाचौक, क्रांती चौक, एम.के चौक खड्डे मुक्त केले पण म.न.पा (ह) क्षेत्रीय स्थापत्य विभाग यांनी त्या ठिकाणी पॅच मारून रस्त्याचे काम पूर्ण केले परंतु पॅच मारल्याने रस्त्याची पातळी वर खाली झाल्यामुळे वाहतुकीस व स्थानिक दुकानदार दुकानासमोर मोठा खड्डा व पाणी साठा होत असल्यामुळे.
याबाबत नागरिकांनी मेघराज लोखंडे (चिंचवड विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार) यांच्याकडे तक्रार केली.
मेघराज लोखंडे व प्रिया ताई देशमुख वरिष्ठ मार्गदर्शक राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पिं-चिं शहर (जिल्हा) यांनी मनपा (ह) क्षेत्रीय स्थापत्य विभाग अधिकाऱ्यांना निवेदने देऊन कृष्णा चौक, अखिल क्रांती चौक व एम.के चौक संपूर्ण रस्त्याचे एकसमान डांबरीकरण पूर्ण करण्याची मागणी केली यावेळी अवधूत कदम, आशिष खात्री व निखिल पवार उपस्थित होते व काम पूर्ण होईपर्यंत मी व माझे सहकारी पाठपुरवठा करणार असे मेघराज लोखंडे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.