- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
लोणी-काळभोर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मी आयुष्यभर हजारो रोमँटिक गाणी लिहिली आहेत. आशिकी, राजा हिंदुस्तानी, साजन, दिवाना, कुछ कुछ होता है या चित्रपटांतील गाणी आजही रसिकांकडून आवडीने ऐकली आणि गायली जातात. माझा चेहरा तितकासा परिचित नसला तरी मी लिहिलेली गाणी आणि त्या गाण्यांच्या ओळी आजच्या नवयुवकांच्या काळजाचाही ठाव घेतात. त्यामुळे, जोपर्यंत माझ्या लिखाणात रसिकांच्या काळजाला स्पर्श करण्याची ताकद आहे, तोपर्यंत मी लिहित राहणार. कारण लेखणात अमरत्वाची ताकद असते. सध्याचे युवकही खूप सुंदर लिहितात. त्यामुळे युवकांनी सुचेल ते लिहित राहायला हवे, असे आवाहन बॉलिवूडमधील हजारो प्रसिद्ध गाण्यांचे लेखक ज्येष्ठ सिनेगीतकार समीर अंजान यांनी केले. ते एमआयटी आर्ट, डिझाईन आणि…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राजमाता जिजाऊंच्या अंगाईतून स्वराज्याची बीजं रुजवणाऱ्या छत्रपती शिवबांचा इतिहास जेव्हा कवितेच्या शब्दांतून जिवंत होतो, तेव्हा मातृत्व, संस्कार आणि राष्ट्रनिर्मिती यांचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळतो. समई आणि वात जशी अंधार चिरून प्रकाशाची दिशा दाखवतात, तशीच जिजाऊंच्या संस्कारांची ज्योत आणि शिवबांच्या कर्तृत्वाची कहाणी आपल्या सशक्त शब्दांतून उलगडत लोककवी प्रा. प्रशांत मोरे यांनी ‘आई’ या विषयावरील आपल्या कवितांच्या सादरीकरणातून स्वराज्याच्या जडणघडणीतील मातृत्वाची भूमिका प्रभावीपणे अनुभवायला लावली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा व व्यापक विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १५ ते २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शहरातील विविध ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून इंद्रायणी नदीत प्रदूषण करणाऱ्या संबंधित कंपन्या व संस्थांवर प्रशासनामार्फत कडक कारवाई करण्यात येणार असून पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. इंद्रायणी नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांनीही सामूहिक जबाबदारी स्वीकारून पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे मत महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर रवि लांडगे,आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कु-हाडे, यांच्या उपस्थितीत सात मावळे संवर्धन संस्थेमार्फत इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा मुख्य उद्देश इंद्रायणी नदीतील वाढत्या प्रदूषणाच्या समस्येकडे लक्ष वेधणे तसेच नदी स्वच्छतेसाठी सामूहिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा होता.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत से.क्र. २३ येथील स्थापत्य व विद्युत विषयक कामे तसेच क्षेत्रीय स्तरावरील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील स्थापत्य व विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.या कामांसाठी सोमवार, दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी निगडी जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत कोणताही खंड पडू नये, यासाठी वेळोवेळी पाणीपुरवठा यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक असते. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत से.क्र. २३ येथील स्थापत्य व विद्युत विषयक कामे तसेच क्षेत्रीय स्तरावरील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील स्थापत्य व विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, महिलांमध्ये विपणन व विक्री कौशल्ये विकसित करणे तसेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरा आणि शहरी संस्कृतीचे जतन करणे या उद्देशाने दरवर्षी पवनाथडी जत्रा आयोजित करण्यात येते .यावर्षी पवनाथडी जत्रा दिनांक २५ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत सांगवी पी.डब्ल्यू.डी. मैदान येथे आयोजित करण्यात आली आहे.पवनाथडी जत्रा ही महिला बचत गटांसाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरली आहे. महिला उद्योजकांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी या जत्रेमुळे उपलब्ध होते. लकी ड्रॉ पद्धतीने आज रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पिंपरी मुख्य…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- कॉ. गोविंद पानसरे यांनी कामगार श्रमिक वर्गासाठी काम केले त्यांनी राज्याला दिलेले विचार ,दिशा नेहमीच स्मरणात राहील, सामन्यातील सामान्य, कामगार,कष्टकरी,विद्यार्थी, वंचित यांना समजेल अशा सोप्या भाषेत समजावून सांगून त्यांना संघर्षासाठी तयार तयार करनारे कॉ. पानसरे हे महाराष्ट्रातील चळवळीचे आधार होते. कष्टकरी संघर्ष महासंघ, रिक्षा- टॅक्सी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे स्मृतिदिनानिमित्त आज त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष कामगार नेते काशिनाथ नखाते,उपाध्यक्ष राजेश माने, रोहन मुरगुंड, मंगेश पालके, निरंजन लोखंडे,ओमप्रकाश मोरया , राज पवार , छाया साबळे, सुमन अहिरे, काजल मोरे, सुनंदा कुंभार,मुमताज शेख, अनिता जावळे आदीसह कामगार उपस्थित होते. कॉ. पानसरे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनने पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या हितासाठी एक महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. मार्च २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या लोकअदालतीत पिंपरी-चिंचवड येथेच प्रलंबित वाहतूक ई-चलन (Traffic E-Challan) निकाली काढण्यासाठी विशेष निवारण कक्ष (Special Desk) स्थापन करण्यात यावा, अशी अधिकृत मागणी यावेळी पुणे जिल्ह्याचे प्रमुख न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. के. महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण त्याचबरोबर पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने गाड्यांवरील प्रलंबित दंड जमा करण्यासाठी वाहन मालकांना ५०% सूट दिली जात होती, मागील काही लोकअदालती मध्ये हा कार्यक्रम प्रामुख्याने येरवडा येथे आयोजित करण्यात येत…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रत्येक मोहिमेत उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्याचे दर्शन घडते. शिवचरित्र संकटे दूर करत नाही, परंतु संकटांना कसे सामोरे जायचे हे शिकवते, असे प्रतिपादन शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा व व्यापक विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने १५ ते २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शहरातील विविध ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून, या अंतर्गत चिंचवड येथील…
माझी वसुंधरा अभियानात सलग तिसऱ्यांदा राज्यात अव्वल, महापालिकेस १० कोटीचे बक्षिस जाहिर हा सन्मान पिंपरी चिंचवड शहरवासियांचा-महापौर रवि लांडगे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास आणि हरित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावत सलग तिसऱ्यांदा अव्वल स्थान मिळविले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महापालिकेस १० कोटीचे बक्षिस जाहिर झाले असून आज राज्यस्तरीय आयोजीत सन्मान सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत व उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महापौर रवि लांडगे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल…
– भाजपा आमदार महेश लांडगे यांनी मानले पदाधिकारी-नगरसेवकांचे आभार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकीय व विकासाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणारा निर्णय महापालिका सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात “अजितसृष्टी” उभारण्याच्या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंजुरी दिली. याबाबत महापौर रवि लांडगे यांनी घोषणा केली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासात योगदान दिले आहे. त्यांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘अजितसृष्टी’’ उभारण्यात यावी, अशी सूचना भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली होती. यावर महापौर आणि सभागृहातील पदाधिकारी- नगरसेवकांनी सर्वानुमते पाठिंबा दिला आणि प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.…
