पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- कॉ. गोविंद पानसरे यांनी कामगार श्रमिक वर्गासाठी काम केले त्यांनी राज्याला दिलेले विचार ,दिशा नेहमीच स्मरणात राहील, सामन्यातील सामान्य, कामगार,कष्टकरी,विद्यार्थी, वंचित यांना समजेल अशा सोप्या भाषेत समजावून सांगून त्यांना संघर्षासाठी तयार तयार करनारे कॉ. पानसरे हे महाराष्ट्रातील चळवळीचे आधार होते.
कष्टकरी संघर्ष महासंघ, रिक्षा- टॅक्सी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे स्मृतिदिनानिमित्त आज त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष कामगार नेते काशिनाथ नखाते,उपाध्यक्ष राजेश माने, रोहन मुरगुंड, मंगेश पालके, निरंजन लोखंडे,ओमप्रकाश मोरया , राज पवार , छाया साबळे, सुमन अहिरे, काजल मोरे, सुनंदा कुंभार,मुमताज शेख, अनिता जावळे आदीसह कामगार उपस्थित होते.
कॉ. पानसरे हे सामाजिक विषमतेच्या क्षेत्रात आणि व्यवस्थेविरुद्ध ची लढाई व संघर्ष ही परिवर्तनवादी विचारांची चळवळ अनेक दिवस अशीच ज्वलंत राहिली . मोठा जनसंपर्क, ठाम मत , चिकित्सक तत्त्वज्ञानाच्या आधारे आपले मत व्यक्त करणारे, सर्व प्रकारचे कष्टकरी असंघटित कामगार यांच्यासाठी लढाई करणे, शोषणाच्या प्रत्येक संघर्षामध्ये आघाडीवर असणारे नेतृत्व म्हणजे कॉम्रेड पानसरे असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही. त्यांचे कार्य स्मरणात राहील.

