Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शहरातील तिन्ही विधानसभा पिंपरी, चिंचवड, भोसरी या पूर्ण ताकतीने लढवण्याच्या निश्चय मनसेने केला आहे. तिन्ही विधानसभेमध्ये पक्षातील पदाधिकारी इच्छुक असल्याचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुक जवळ आली आहे. त्या अनुषंगाने पक्षाची संघटनात्मक बांधणी करतानाच, पक्षाच्या विविध अभियानांशी, आंदोलनाशी, नागरिकांना कशाप्रकारे जोडता येईल, याची नियोजनपूरक चर्चा झाली. तसेच नुकताच झालेल्या लोकसभेत अनेक मतदारांना कागदोपत्री गोंधळामुळे मतदानात अडथळे निर्माण झाले होते. ते पाहता नवमतदार नोंदणी अभियान जास्तीत जास्त प्रभावीपणे राबविण्याबाबतही नियोजन आखण्यात आले. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शहरातील तिन्ही विधानसभा पिंपरी, चिंचवड, भोसरी, या पूर्ण ताकतीने लढवण्याच्या निश्चय केलेला असून तिन्ही विधानसभेमध्ये…

Read More

भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवडमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व साजरा करण्याच्या अनुषंगाने भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी शहरातील सकल मातंग समाजाच्या शिष्टमंडळासह महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची शनिवारी भेट घेतली. विचार प्रबोधन पर्वच्या नियोजनाबाबत महापालिका प्रशासनाने तातडीने बैठक घ्यावी आणि निधीमध्ये वाढ करावी, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात दिमाखात साजरी करण्यात यावी, त्यांच्या विचार व कार्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी महापालिकेने कुठेही कमी पडू नये, अशा मागण्या आयुक्तांकडे करण्यात आल्या. आयुक्तांनी सकल मातंग समाज शिष्टमंडळाच्या सर्व मागण्या या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ||वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे || या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझरकरवाडी येथे जाळीसह वृक्षारोपण करण्यात आले. शाळेच्या परिसरात वड, पिंपळ, साग, चिंच, करंज, अशोक, बदाम, कडुलिंब अशी विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार, वेदांत गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष निवृत्ती महाराज बोरकर, रिहे केंद्राचे केंद्रप्रमुख मोरे साहेब, रिहे गावचे सरपंच सारिका मोरे, पोलीस पाटील सारिका मिंडे, ग्रामसेविका सारिका टाकळीकर, शाळेचे मुख्याध्यापक राऊत, अंगणवाडी, सुनंदा ओझरकर, सामाजिक कार्यकर्ते अनिल मोरे, गणपत ओझरकर, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य रामदास ओझरकर,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -एच. ए. स्कूल प्राथमिक विभागात आज वृक्ष दिंडीचे आयोजन, वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व कळावे या उद्देशाने झाडे लावण्याचा उपक्रम घेण्यात आला. डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स  स्कूल प्राथमिक विभागामध्ये आज शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांच्या संकल्पनेने वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक  संस्थेचे अध्यक्ष मा. रामा भोरखडे यांच्या सहकार्याने शाळेला विविध प्रकारची रोपे देण्यात आली. ही संस्था  विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप , रुग्णांना फळे वाटप , सफाई कर्मचारी डॉक्टर नर्स यांचा सन्मान अशा विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करते. यावेळी उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र  ब्रेकिंग न्यूज) – बेळगांव( कर्नाटक) येथील शिवगंगा स्केटिंग क्लबच्या वतीने घेण्यात आलेल्या १०० मीटर्स फास्टेस्ट बॅकवार्ड्स ऑन स्केट्स युझिंग टू व्हील्स ७२ आवर्स, अटेम्प्ट फॉर गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड विश्व विक्रम महोत्सवात पिंपळे सौदागर पिंपरी चिंचवड येथील नाना काटे सोशल फाउंडेशन ड्रीम्झ स्केटिंग क्लब, ए आई एस ड्रीम्झ व टॉपर्स स्पोर्ट्स क्लबच्या १८ स्केटर्सनी भाग घेवून तो रेकॉर्ड ॲटेम्ट पूर्ण केला. या रेकॉर्ड साठी संपूर्ण देशभरातील सुमारे तीनशे खेळाडू सहभागी झाले होते. हे सर्व स्केटर्स पिंपळे सौदागर येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल स्केटिंग ट्रॅक पिंपळे सौदागर व वाकड ताथवडे येथील अश्विनी इंटरनॅशनल स्कूल ड्रीम्झ स्केटिंग क्लब रिंग व…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भरत वाल्हेकरांसोबत पिंपरी चिंचवड काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी चिंचवड विधानसभेवर दावा ठोकला. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेवट्टीवर यांना याबाबत निवेदन दिले. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष भरत वाल्हेकर व त्यांच्यासोबत गेलेल्या पिंपरी चिंचवड मधील काँग्रेसचे पदाधिकारी यांनी नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेवट्टीवर यांना दिले. मुंबई येथे यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉल येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीच्या दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या नेत्यांना चिंचवड विधानसभा ही आपण जर लढवली तर कशी जिंकू या संदर्भात प्रोजेक्ट रिपोर्ट दाखवला. सन २००९ साली , व २०१४ साली चिंचवड विधानसभेत काँग्रेसचे उमेदवार…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील गीता मंदिर प्राथमिक शाळेत आज वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.सर्व प्रथम विद्यार्थ्यांनी पर्यावरण प्रतिज्ञा म्हटली .शाळेचे मुख्याध्यापक श्री महेंद्र भोसले यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व सांगितले.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयक घोषवाक्य, चारोळ्या, गांणी सादर केली.मुख्याध्यापकांच्या, शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेच्या बागेत फुलझाडांची रोपे लावण्यात आली.कार्यक्रमाचे संयोजन  मंदा कोकरे यांनी केले. संगिता शहासने, चंदा नामदे, ज्योत्स्ना वाव्हळ, राजश्री गायकवाड, सुनिता धोंडगे सर्व शिक्षक कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीच्या विद्युत दाहिनीचे काम पूर्ण होऊन देखील ती वापरासाठी खुली केली जात नाही. चाचणीसाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील शवागृहातून बेवारस मृतदेह मिळत नाही, तोपर्यंत विद्युत दाहिनी सुरु करण्यात येणार नसल्याचा खुलासा फ क्षेत्रीय कार्यालयाकडून करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विभागाकडून स्मशानभूमीचे काम पाहिले जाते. निगडीतील स्मशानभूमी महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत येते. याठिकाणी विद्युत दाहिनी सुरु करण्याचे काम कल्याणी एंटरप्राइजेस या ठेकेदार संस्थेला दिले होते. हे काम पूर्ण करुन एक वर्षाचा अवधी उलटला तरी, विद्युत दाहिनी वापरासाठी सुरु केली जात नाही. त्यामुळे निगडी गावठाण, चिखलीचा काही भाग,…

Read More

 पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजनेची अंमलबजावणी जलद गतीने होण्यासाठी तसेच महिलांच्या सोयीसाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालय स्तरावर शिबिरांच्या आयोजनाचे योग्य नियोजन करून त्यानुषंगाने कार्यवाही करावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच जास्तीत जास्त पात्र महिलांनी दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत  विहित मुदतीत अर्ज भरून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.           राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल कल्याण विकास विभागाच्या वतीने मुख्यमंत्री – माझी…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला ( एफ. वाय. बी. ए.) वर्गातील मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात लेखक कवी राजन लाखे यांचा शान्ता शेळके जन्म शताब्दी ग्रंथ –  बकुळगंध  समाविष्ट करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने या ग्रंथास संदर्भग्रंथ म्हणून मान्यता दिली आहे.        शान्ता शेळके यांच्या साहित्याशी निगडित असलेले तसेच त्यांच्याशी संबंधित असलेले, महाराष्ट्र व बृहन्महाराष्ट्रातील १०० मान्यवरांनी त्यांच्या साहित्यावर केलेले भाष्य, त्यांनी सांगितलेल्या साहित्यिक आठवणी आणि मानवंदना म्हणून शान्ता शेळके यांना अर्पण केलेल्या त्यांच्याच कविता असा एकूण १०० मान्यवर, १०० साहित्यभाष्य, १०० आठवणी, १०० कवितांचा साहित्यठेवा…

Read More